Wednesday, November 1, 2023

माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

 




माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

अमरावती, दि. ३१ : माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आणि माजी उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी  कार्यालयात प्रभारी जिल्हाधिकारी सुरज वाघमारे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

           माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने ‘राष्ट्रीय संकल्प दिवस’ व माजी उपपंतप्रधान लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ‘राष्ट्रीय एकता दिवस’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त श्री. वाघमारे यांनी राष्ट्राची एकता, अखंडता व सुरक्षा अबाधित राखण्यासाठी समर्पित भावनेने काम करण्याची शपथ उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना यावेळी दिली.

           निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. विवेक घोडके, उपजिल्हाधिकारी रणजित भोसले, उपविभागीय अधिकारी अनिल भटकर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते. उपस्थितांनीही इंदिरा गांधी व वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

00000

No comments:

Post a Comment

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार

  ‘ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ ’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार