Thursday, October 8, 2026

अमरावती तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियानांतर्गत महाराजस्व समाधान शिबिर



 अमरावती तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियानांतर्गत महाराजस्व समाधान शिबिर

       अमरावती, दि.8 (जिमाका) : ‘सेवा संकल्प अभियानां’तर्गत  अमरावती तहसील कार्यालयात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ आयोजित करून नागरिकांना विविध शासकीय व निमशासकीय योजनांचा लाभ एकाच छताखाली सुलभतेने उपलब्ध करून देण्यात आला. 

     उपविभागीय अधिकारी अनिल भटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालय, मोर्शी रोड, अमरावती येथे ६ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वा. हे शिबिर आयोजित करण्यात आले.  

     या अनुषंगाने अमरावती तालुक्यातील शिबिराचे आयोजन तहसील कार्यालय, मोर्शी रोड, अमरावती येथे ६ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ३ वाजता करण्यात आले. शिबिरात प्रलंबित फेरफार नोंदींचा निपटारा, गावठाणातील नागरिकांना स्वामित्व सनद वाटप, पाणंद रस्ते उपलब्ध करून देणे, पात्र लाभार्थ्यांना शिधापत्रिका व नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र देणे, वन हक्क दावे मंजूर करणे, मालमत्ता हस्तांतरण नोंद घेणे, नळ जोडणी देणे, मालमत्ता कराची आकारणी व मागणीपत्र देणे, वीज जोडणीसाठी मालमत्ताधारकाचे नाव नोंदविणे, शासकीय जमिनीवरील अतिक्रमण नियमानुकूल करणे आदी महसूलविषयक सेवा देण्यात आल्या.

      यासोबतच बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेंतर्गत सिंचन विहिरीसाठी पात्र लाभार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी, दिव्यांग व विवाह नोंदणी प्रमाणपत्र, आधार कार्ड, जन्म-मृत्यू नोंदणी व प्रमाणपत्र, शिकाऊ वाहन चालक परवाना, महिला बचत गट नोंदणी, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, महिला शेतकऱ्यांना प्रमाणपत्र वाटप, ७/१२ व ८-अ नोंदी अद्ययावत करणे तसेच इतर खात्यांच्या विशेष सहाय्य योजनांची अंमलबजावणी करण्यात आली.

     या विविध सेवांचा नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला. शिबिराच्या माध्यमातून विविध शासकीय सेवा आणि योजनांचा लाभ नागरिकांना एकाच ठिकाणी मिळाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. 

०००००

No comments:

Post a Comment

दुष्काळ, पाऊस, पीक नुकसान, पिण्याचे पाणी, जनावरांच्या चाऱ्याबाबत राज्य शासनाकडून केंद्रीय पथकाकडे सविस्तर सादरीकरण

  दुष्काळ, पाऊस, पीक नुकसान, पिण्याचे पाणी, जनावरांच्या चाऱ्याबाबत राज्य शासनाकडून केंद्रीय पथकाकडे सविस्तर सादरीकरण · केंद्रीय पथका...