Tuesday, October 6, 2026

DIO NEWS AMRAVATI 06.10.2026


                                            स्वाधार नूतनीकरणासाठी 15 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

 

अमरावती, दि. 6 (जिमाका): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नूतनीकरणासाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्यास  १५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती समाज कल्याण सहाय्यक आयुक्त राजेंद्र जाधवर यांनी केले आहे.

 

      सामाजिक न्याय व विशेष

 

सहाय्य विभागाने स्वाधार योजनेच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले असून, नवीन नियमानुसार सन २०२६-२७ मध्ये स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांनी hmasnew.mahait.org या संकेतस्थळावर रितसर ऑनलाइन अर्ज करणे बंधनकारक आहे.पात्र विद्यार्थ्यांनी मुदतीपूर्वी अर्ज प्रक्रिया पूर्ण करून योजनेचा लाभ घ्यावा.अधिक माहितीसाठी सामाजिक न्याय भवन, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, अमरावती यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.  तसेच ई-मेल speldswo_amtrediffmail.com आणि दूरध्वनी क्रमांक ०७२१-२६६१२६१ वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

००००००





अमरावती डाक विभागात 9 ऑक्टोबरला 'पेन्शन अदालत'

 

अमरावती, दि. 6 (जिमाका): टपाल विभागातील निवृत्तिवेतनधारक तसेच कुटुंबनिवृत्तिवेतनधारकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी अमरावती विभागाच्या प्रवर अधीक्षक डाकघर कार्यालयात ९ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता पेन्शन अदालत आयोजित करण्यात आली आहे.

 

     टपाल विभागातून निवृत्त झालेले किंवा सेवेत असताना मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांशी संबंधित निवृत्तिवेतनाच्या तक्रारी, तसेच महाराष्ट्र व गोवा राज्यातील टपाल विभागाच्या निवृत्तिवेतनधारकांच्या मागील तीन महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या प्रकरणांवर पेन्शन अदालतीत विचार केला जाणार आहे.मात्र, वारसा प्रमाणपत्र, वेतनश्रेणी वाढविणे, शिस्तभंगाची प्रकरणे तसेच डी.पी.सी.च्या पुनरावलोकनाशी संबंधित प्रकरणांवर पेन्शन अदालतीत विचार केला जाणार नसल्याचे डाक विभागाने स्पष्ट केले आहे.

 

     पेन्शनधारकांनी आपली तक्रार वैयक्तिकरित्या (एकत्रित स्वरूपात किंवा इतरांच्या वतीने नव्हे) सादर करावी. तक्रार तीन प्रतींमध्ये तयार करून ८ ऑक्टोबर २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी प्रवर अधीक्षक डाकघर, अमरावती विभाग, अमरावती-४४४६०२ या पत्त्यावर सादर करावी. ९ ऑक्टोबर २०२६ नंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा पेन्शन अदालतीत विचार केला जाणार नाही, असे प्रवर अधीक्षक डाकघर, अमरावती विभाग यांनी कळविले आहे.

०००००

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी ऑफलाईन अर्जास 10 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

 

अमरावती, दि. 6 (जिमाका) : इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळवण्यासाठी १० ऑक्टोबर २०२६ पर्यंत ऑफलाईन अर्ज करण्यास मुदत वाढ देण्यात आली आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करिता१२ वी नंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाच्या प्रवेशासाठी संबंधित वसतिगृहामध्ये

अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

                इतर मागास  बहुजन कल्याण विभागांतर्गत जिल्ह्यात कार्यरत मुला-मुलींच्या वसतिगृह योजनेनुसार प्रवेशित विद्यार्थ्यांना  मोफत सोई –सुविधा पुरविण्यात येतात.आवश्यक कागदपत्रांसह वसतिगृहप्रवेशासाठीचा अर्ज कालमर्यादेत मुलांनी  इतर मागास  बहुजन कल्याण मुलांचे शासकीय वसतिगृह, ब्लॉक एच, राम लक्ष्मण संकुल, दुसरा माळा, रामपुरी कँप अमरावती  येथे  तर मुलींनी  बहुजन कल्याण मुलींचे  शासकीय वसतिगृह, ब्लॉक ए, राम लक्ष्मण संकुल, तिसरा माळा, रामपुरी कँप अमरावती या वसतीगृहांमध्ये सादर करावा असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण अमरावतीच्या सहायक संचालक सरिता बोबडे यांनी केले आहे.

 

         ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले  आधार व पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेअंतर्गत इच्छुक विद्यार्थ्यांनी ऑफलाईन अर्ज  भरून आवश्यक त्या कागदपत्रांसह दिलेल्या दिनांकापर्यंत सादर करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी  सहायक संचालक,इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, सामाजिक न्याय भवन, (पोलीस आयुक्तालयाच्या मागे) येथे तसेच adobbwoamravati@gmail.com वर ईमेलवर तसेच ०७२१-२९९०३५९ या दूरध्वनी क्रमांकावर  संपर्क करता येणार आहे.

००००००


शासकीय व खासगी आस्थापनांनी ई-आर-1 विवरणपत्र ऑनलाइन सादर करावे

 

अमरावती, दि. 6 (जिमाका) : सर्व शासकीय व सार्वजनिक क्षेत्रातील आस्थापनांनी त्रैमासिक रोजगारविषयक ई-आर-1 विवरणपत्र ऑनलाइन सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ई-आर-1 विवरणपत्र सादर करण्याची अंतिम मुदत ऑक्टोबर 2026 असून निर्धारित वेळेत विवरणपत्र सादर करण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे.

 

             विहित मुदतीत ई-आर-1 ऑनलाइन सादर न करणाऱ्या आस्थापनांवर संबंधित नियमांनुसार कार्यवाही करण्यात येणार असल्याने सर्व संबंधित आस्थापनांनी वेळेत विवरणपत्र सादर करावे, असेही सांगण्यात आले आहे.

 

            रोजगारविषयक सर्व सेवा आता ऑनलाइन करण्यात आल्या असून, त्यासाठी www.mahaswayam.gov.in  हे संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. सेवायोजन कार्यालय कायदा 1959 व नियमावली 1960 मधील तरतुदींनुसार संबंधित आस्थापनांनी त्रैमासिक ई-आर-1 विवरणपत्र ऑनलाइन सादर करणे बंधनकारक आहे.सप्टेंबर 2026 अखेर संपलेल्या त्रैमासिकासाठी ई-आर-1 प्रपत्राची माहिती संबंधित संकेतस्थळावर सर्व शासकीय, निमशासकीय, खासगी उद्योग/आस्थापनांनी आपल्या यूजर आयडी व पासवर्डच्या माध्यमातून लॉगिन करून ऑनलाइन सादर करावी. तसेच त्याबाबतचे प्रमाणपत्र संकेतस्थळावरून प्राप्त करून घ्यावे.ई-आर-1 ऑनलाइन सादर करताना काही अडचण आल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अमरावती या कार्यालयाशी संपर्क साधावा असेही कळविण्यात आले आहे.

००००००

No comments:

Post a Comment

निवडणूक विशेष * मंगळवार ६ ऑक्टोबर*

  निवडणूक विशेष * मंगळवार ६ ऑक्टोबर*   *विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी आज शेवटच्या दिवशी २० उमेदवारांची...