अमरावती विभाग
शिक्षक मतदारसंघ निवडणूक
मतदारांना ओळख पटविण्यासाठी १० पर्यायी कागदपत्रे पुरावा
म्हणून ग्राह्य
अमरावती दि.२२
- महाराष्ट्र विधानपरीषदेच्या द्विवार्षिक पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणूक-२०२६
करीता भारत निवडणूक आयोगाने मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या
(EPIC) व्यतिरिक्त खालील नमूद १० पर्यायी कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याबाबत
आदेश दिले आहेत. अशी माहिती अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी
तथा विभागीय आयुक्त श्रीमती नयना गुंडे यांनी दिली.
भारत निवडणूक
आयोगाच्या वतीने मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांनी २१ ऑक्टोबर २०२६ च्या
पत्राव्दारे सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना या १० पर्यायी कागदपत्रांबाबत
कळविले आहे. यानूसार महाराष्ट्र राज्यातील औरंगाबाद, पुणे व नागपूर विभागातील पदवीधर
आणि अमरावती व पुणे विभागातील शिक्षक मतदारसंघातील विधानपरिषदेच्या द्विवार्षिक निवडणूकीकरीता
मतदान करतांना मतदान केंद्रावर मतदारांची ओळख पटविण्यासाठी जे मतदार ओळखपत्र सादर करु
शकत नाहीत, अशा मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त
पुढील १० पर्यायी कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याबाबत आयोगाने आदेश दिले आहेत.
(१) आधार कार्ड (२) ड्रायव्हींग लायसन्स,(३) पॅन कार्ड,(४) भारतीय पासपोर्ट,(५) राज्य
/ केंद्र सरकार, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, स्थानिक स्वराज्य संस्था किंवा इतर
खाजगी औद्योगिक संस्थांद्वारे त्यांच्या कर्मचाऱ्यांना दिलेले सेवा ओळखपत्र,(६) खासदार
/ आमदार / विधान परिषद सदस्य यांना दिलेली अधिकृत ओळखपत्रे, (७) संबंधित शिक्षक / पदवीधर
मतदारसंघातील मतदार ज्या शैक्षणिक संस्थांमध्ये कार्यरत आहेत, त्या शैक्षणिक संस्थांनी
जारी केलेले सेवा ओळखपत्र, (८) विद्यापीठाद्वारा वितरीत मुळ पदवी / पदविका प्रमाणपत्र,
(९) सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले शारीरिक दिव्यांगत्वाचे मूळ प्रमाणपत्र, (१०) भारत
सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाने जारी केलेले युनिक डिसॅबिलीटी ओळखपत्र
(UDID).
छायाचित्रासह
मतदार ओळखपत्रान्वये मतदाराची ओळख पटत असेल तर मतदार ओळखपत्रातील किरकोळ विसंगती दुर्लक्षित
करण्यात याव्यात. तसेच, छायाचित्रासह मतदार ओळखपत्रावरील विसंगत छायाचित्रामुळे मतदाराची
ओळख पटणे / पटविणे शक्य नसल्यास मतदारास वरील १० पर्यायी कागदपत्रांपैकी एक ओळख कागदपत्र
सादर करणे आवश्यक राहील. मतदार ओळखपत्र व पर्यायी ओळखपत्र याबाबत काही संभ्रम असल्यास
भारत निवडणुक आयोगाचे दि.२९.०९.२०२६ रोजीचे मुळ आदेश अंतिम राहतील. भारत निवडणूक आयोगाचे
सदर आदेश सर्व निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सर्व संबंधित अधिकारी व सर्व मतदान केंद्राध्यक्ष
यांच्या निदर्शनास आणून द्यावेत.असेही मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांनी
कळविले आहे.
अमरावती विभाग
शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शुक्रवार २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या
वेळेत मतदान होणार आहे. तरी सर्व मतदारांनी मतदार ओळखपत्र नसल्यास वरील १० पर्यायी
कागदपत्रांपैकी एक ओळख पटविण्यासाठी दाखवून मतदानाचा आपला अमुल्य हक्क बजावावा असे
आवाहनही निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त श्रीमती नयना गुंडे यांनी केले
आहे.
00000

No comments:
Post a Comment