केंद्र सरकारच्या आंतरमंत्रालयीन केंद्रीय पथकाने आज अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांतील दुष्काळी परिस्थिती आणि पिकांच्या नुकसानीचा बैठकीद्वारे आढावा घेतला. त्यानंतर पथकाने वाशिम जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी केली.
बैठकीत अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीबाबत सादरीकरण करण्यात आले. पावसाच्या कमतरतेमुळे निर्माण झालेली स्थिती, पीक नुकसान, पाणी उपलब्धता व टँकर्सची संभाव्य गरज, शेतीवर अवलंबून असलेले शेतमजूर व जमीनधारकांचे प्रश्न, मजुरांची स्थलांतराची शक्यता या बाबींकडे जिल्हाधिकाऱ्यांनी केंद्रीय पथकाचे लक्ष वेधले.
विभागातील पाचही जिल्ह्यातील पावसाची स्थिती, शेतीपिकांचे नुकसान, जनावरांच्या चाऱ्याची सद्यस्थिती तसेच आगामी सात महिन्यांसाठीच्या संभाव्य परिस्थितीची माहितीही यावेळी पथकाने घेतली.


No comments:
Post a Comment