Official Blogger Account of District Information Office, Amravati DGIPR, Government of Maharashtra
Saturday, October 10, 2026
राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे अधिक अचूक आणि वस्तुनिष्ठ मूल्यमापन करण्यासाठी शासनाने आणखी १८ तालुक्यांमध्ये दुष्काळाच्या तीव्रतेची प्रत्यक्ष पडताळणी (ग्राऊंड ट्रुथिंग) करण्यास मान्यता
राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे अधिक अचूक आणि वस्तुनिष्ठ मूल्यमापन करण्यासाठी शासनाने आणखी १८ तालुक्यांमध्ये दुष्काळाच्या तीव्रतेची प्रत्यक्ष पडताळणी (ग्राऊंड ट्रुथिंग) करण्यास मान्यता दिली आहे. या तालुक्यांतील प्रमुख पाच पिकांचे २० टक्के सर्वेक्षण करण्यात येणार असून, उपग्रह छायाचित्रे व संगणकीय माहितीची प्रत्यक्ष क्षेत्रीय परिस्थितीशी पडताळणी केली जाणार आहे. यामुळे दुष्काळाच्या तीव्रतेचे वास्तव चित्र स्पष्ट होण्यास मदत होणार आहे. मंत्रिमंडळ उपसमितीच्या २९ सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या बैठकीतील निर्देशांनुसार जून ते सप्टेंबर २०२६ या कालावधीतील पर्जन्याची तूट आणि अन्य घटकांचा विचार करून आणखी १८ तालुक्यांमध्ये प्रत्यक्ष पाहणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये नांदेड-: मुदखेड, मुखेड, चंद्रपूर-: जिवती, ब्रह्मपुरी, बल्लारपूर, गोंदिया-: आमगाव, देवरी, सालेकसा, गोंदिया, वर्धा-: कारंजा, भंडारा-: मोहाडी, तुमसर, नाशिक-: त्र्यंबकेश्वर, चांदवड, निफाड, सातारा-: पाटण, सांगली-: शिराळा, वाळवा या तालुक्यांचा समावेश आहे. मदत व पुनर्वसन विभागाने याबाबत शासन निर्णय जारी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाने दुष्काळी परिस्थितीचे अचूक मूल्यमापन करून शेतकऱ्यांना आवश्यक मदत व सवलती उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. खरीप हंगाम २०२६ मधील परिस्थितीच्या आधारे २५ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यातील २६५ तालुक्यांत ट्रिगर-१ निकषांनुसार दुष्काळ जाहीर करून विविध १२ उपाययोजना व सवलती लागू करण्यात आल्या आहेत. शासन निर्णय : gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Go #दुष्काळ #शेतकरी #FarmerWelfare
Subscribe to:
Post Comments (Atom)
अमरावती (ग्रामीण) पोलीस चे #CyberAwarenessCampign विशेष जनजागृती अभियान. ऑन लाईन गुरर्मिंग काय असते!, ते समजून घेऊया. #सेवासंकल्पअभियान
अमरावती (ग्रामीण) पोलीस चे #CyberAwarenessCampign विशेष जनजागृती अभियान. ऑन लाईन गुरर्मिंग काय असते!, ते समजून घेऊया. #सेवासंकल्पअभियान
-
महसूल दिनी एक लाख वृक्षारोपण होणार *आजपासून महसूल सप्ताहाचे आयोजन; विविध कार्यक्रमांची रेलचेल अमरावती, दि. ३१ : महसूल दिनाच्या निमित्ताने १ ...
-
खाजगी व सार्वजनिक क्षेत्रातील आस्थापनांनी ई-आर-1 सादर करण्याची अंतिम मुदत 31 जुलैपर्यंत अमरावती, दि. 08 (जिमाका) : उद्योजक,...
-
जिल्हाधिकारी कार्यालयात वाचन प्रेरणा दिनानिमित्त ग्रंथप्रदर्शन अमरावती, दि. 15 (जिमाका) : भारतरत्न डॉ. ए...

No comments:
Post a Comment