Official Blogger Account of District Information Office, Amravati DGIPR, Government of Maharashtra
Wednesday, October 21, 2026
राज्यातील दुष्काळग्रस्त भागांमध्ये बालकांचे #कुपोषण रोखण्यासाठी तसेच गर्भवती आणि स्तनदा मातांना पोषण व आरोग्यविषयक सुविधा अखंडितपणे उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे.
राज्यातील दुष्काळग्रस्त भागांमध्ये बालकांचे #कुपोषण रोखण्यासाठी तसेच गर्भवती आणि स्तनदा मातांना पोषण व आरोग्यविषयक सुविधा अखंडितपणे उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे. अंगणवाड्यांना दररोज भेट देऊन कामाचा आढावा घ्यावा आणि दुष्काळी परिस्थितीत अंगणवाड्या सुरू ठेवण्याबाबत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार कार्यवाही करावी, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमार्फत राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा दूरदृश्यप्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी मंत्री आदिती तटकरे यांनी विविध जिल्ह्यांतील समस्या जाणून घेतल्या. यावेळी विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव, सहसचिव वि. रा. ठाकूर, सहआयुक्त संगीता लोंढे, अवर सचिव सरदार उपस्थित होते. आयुक्त माधवी सरदेशमुख यांनी विभागाच्या कामकाजाचे सादरीकरण केले. #दुष्काळ
Subscribe to:
Post Comments (Atom)
DIO NEWS AMRAVATI 21.10.2026
मतमोजणीचे पहिले प्रशिक्षण संपन्न शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी समन्वयाने पार पाडावी -विभागीय आयुक्त नयना गुंडे यांचे आवाहन अमरावत...
-
महसूल दिनी एक लाख वृक्षारोपण होणार *आजपासून महसूल सप्ताहाचे आयोजन; विविध कार्यक्रमांची रेलचेल अमरावती, दि. ३१ : महसूल दिनाच्या निमित्ताने १ ...
-
खाजगी व सार्वजनिक क्षेत्रातील आस्थापनांनी ई-आर-1 सादर करण्याची अंतिम मुदत 31 जुलैपर्यंत अमरावती, दि. 08 (जिमाका) : उद्योजक,...
-
भूजल उपशावर निर्बंध ; सार्वजनिक पाणी स्रोतांपासून ५०० मीटरपर्यंत नवीन विहिरींना बंदी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी निर्गमीत केले...


No comments:
Post a Comment