Thursday, October 22, 2026

शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी जिल्ह्यात २५ मतदान केंद्र; १० हजार ९७ मतदार अमरावती शहरात ११ मतदान केंद्र


 

शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी जिल्ह्यात २५ मतदान केंद्र; १० हजार ९७ मतदार

अमरावती शहरात ११ मतदान केंद्र

 

अमरावती, दि.२२ (जिमाका) : विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक  शुक्रवार, २३ ऑक्टोबर रोजी विभागातील ५ जिल्ह्यांमध्ये पार पडणार असून अमरावती शहरात ११ मतदान केंद्रांसह जिल्ह्यात एकूण २५ मतदान केंद्र सज्ज झाले आहेत. जिल्ह्यात ६ हजार २३६ पुरुष तर ३ हजार ८६१ महिला असे एकूण १० हजार ९७ शिक्षक मतदार हे मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

 

शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजे दरम्यान जिल्ह्यातील १४ तालुक्यांमधील एकूण २५ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. धारणी येथील नवीन प्रशासकीय इमारत,चिखलदा येथील तहसिल कार्यालय,दर्यापूर तहसिल कार्यालय,अंनगाव सुर्जी तहसिल कार्यालयातील बैठक कक्ष,अचलपूर उपविभागीय अधिकारी कार्यालयाची परतवाडा येथील कोर्ट रोड स्थित नवीन प्रशासकीय इमारत आणि तहसिल कार्यालय,चांदूरबाजार येथील तहसिल कार्यालयाची नवीन इमारत,मोर्शी तहसिल कार्यालय, वरुड येथील तहसिल कार्यालयाची खोली क्र.१ आणि नायब तहसिलदार चेंबर खोली क्र.२, तिवसा तहसिल कार्यालयाचे सभागृह क्र.१, नांदगाव खंडेश्वर येथील तहसिल कार्यालयाचे जुने सभागृह, चांदूररेल्वे तहसिल कार्यालयाची आस्थापना शाखा आणि धामनगाव रेल्वे तहसिल कार्यालयाचे बैठक सभागृह येथे मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत.

 

अमरावती शहरात एकूण ११ ठिकाणी मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत.यात तिवसा व भातकुली उपविभागीय अधिकारी कार्यालय (भातकुली तालुक्यासाठी),जिल्हा परिषद माध्यमिक उर्दू शाळेची खोली क्र. १, खोली क्र.२ आणि खोली क्र.३ येथे स्वतंत्र मतदान केंद्र उभारण्यात आले आहेत. जिल्हा परिषद मुलींच्या माध्यमिक शाळेत खोली क्र. २, खोली क्र.४ आणि खोली क्र.५ तसेच गोल्डन किड्स इंग्रजी शाळेची खोली क्र. ६, खोली क्र. ७ आणि खोली क्र. ८ तसेच गणेशदास राठी उच्च माध्यमिक शाळेच्या खोली क्र. ४ मध्ये मतदान केंद्र उभारण्यात आले आहे.

 

विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघांच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी एकूण २६ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. विभागातील पाच जिल्ह्यांत ८१ मतदान केंद्रांवर २४ हजार ७३२ पुरुष तर ११ हजार ७८ महिला असे एकूण ३५ हजार ८१०शिक्षक मतदार हे मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी अमरावती विभागातील निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.

             ०००००

No comments:

Post a Comment

#अमरावती_विभाग_शिक्षक_मतदारसंघ_निवडणूक_2026 मतदान UPDATE 👇 (दुपारी १२ वाजता) #अमरावती विभागातील एकूण ५ जिल्ह्यातील ८१ मतदान केंद्रांवर ३६.२४ टक्के मतदान

  #अमरावती_विभाग_शिक्षक_मतदारसंघ_निवडणूक_2026 मतदान UPDATE (दुपारी १२ वाजता) #अमरावती विभागातील एकूण ५ जिल्ह्यातील ८१ मतदान केंद्रा...