Monday, July 11, 2016

आकाशवाणी वरील दिलखुलास कार्यक्रमात
अमरावतीचे जिल्हाधिकारी किरण गित्ते यांची मुलाखत
* 12, 13, 14 जुलै रोजी सकाळी 7-25 ते 7-40 पर्यंत मुलाखत
          अमरावती, दि.11 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात अमरावतीचे जिल्हाधिकारी किरण गित्ते यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. आकाशवाणीच्या राज्यातील सर्व केंद्रांवरून ही मुलाखत दि.12, 13 आणि 14 जुलै रोजी सकाळी 7-25 ते 7-40 या वेळेत प्रसारित होईल. मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांची महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियान ही योजना अमरावती जिल्ह्यात यशस्वी ठरली आहे. या पार्श्वभूमीवर या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे.
      दिलखुलास कार्यक्रमातील या मुलाखतीत जलयुक्त शिवार अभियानाचे अमरावती जिल्ह्यातील यश, शासन स्तरावरील नियोजन, अभियानातील लोकसहभाग, शेतकऱ्यांचे आत्मबल उंचावण्यासाठी जिल्ह्यात राबविण्यात येत असलेले नवे प्रकल्प / योजना आदी विषयांची माहिती गित्ते यांनी या मुलाखतीत दिली आहे. सूत्रसंचालक हेमंत बर्वे यांनी ही मुलाखत घेतली आहे.
00000
काचावार/गावंडे/दि.11-7-2016/19-14 वाजता


No comments:

Post a Comment

बँकांनी उद्योगांना कर्जवाटप करताना सकारात्मक रहावे - जिल्हाधिकारी आशिष येरेकर

बँकांनी उद्योगांना कर्जवाटप करताना सकारात्मक रहावे    - जिल्हाधिकारी आशिष येरेकर *उद्दिष्ट प...