Wednesday, July 13, 2016

दुसऱ्या महायुद्ध लाभार्थींनी हयातीचे दाखले सादर करावे
जिल्हा सैनिक कार्यालयाचे आवाहन
       अमरावती, दि.13 : शासनाचे नियमाप्रमाणे दरवर्षी 1 मे आणि 1 नोव्हेंबर रोजी दुसरे महायुद्ध लाभार्थींनी हयातीचे दाखले जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, अमरावती येथे सादर करणे आवश्यक आहे. बरेच माजी सैनिक विधवा लाभार्थींनी अद्याप पावेतो आपले हयातीचे दाखले जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात जमा केले नाही. हयातीचे दाखला अप्राप्त असल्यास जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत कोषागार कार्यालयातून अनुदान आहरीत करण्यात बऱ्याच अडचणी निर्माण होत आहेत.
          तरी सर्व दुसरे महायुद्ध लाभार्थींना कळविण्यात येते की, त्यांनी आपल्या हयातीचा दाखला जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, अमरावती यांचेकडे आपली सही/अंगठा लावून तसेच दाखल्यावर संबंधित बँकेच्या अधिकाऱ्यांची सही व शिक्का घेवुन विना विलंब सादर करावा. हयातीचा दाखला वेळेत सादर न केल्यास लाभार्थींचे अनुदान रोखण्यात येईल याची सर्व लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, अमरावती यांनी कळविले आहे.
00000
वाघ/गावंडे/दि.13-7-2016/13-05 वाजता

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 10.06.2026

  शुक्रवारी जागतिक बाल कामगार प्रथाविरोधी दिन अमरावती, दि. 10 (जिमाका) : बालमजुरी या अनिष्ठ प्रथेविरूद्ध विस्तृत प्रमाणात जनजागृती करणे आवश्...