Monday, July 4, 2016


लोकशाही दिनात दोन तक्रारींची सुनावणी
     
      अमरावती, दि.04 : जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही दिनाचे कामकाज करण्यात आले. या जिल्हा लोकशाही दिनात 2 तक्रारींची सुनावणी होती. दोन्ही तक्रारी संबंधित विभागांकडे आवश्यक कार्यवाही करीता पाठविण्यात आल्या. 7 प्रलंबित प्रकरणांपैकी 1 प्रकरणाचा अहवाल संबंधित कार्यालयाकडून प्राप्त झाला आहे तसेच 17 निवेदने प्राप्त झाली. लोकशाही दिनाच्या कामकाजासाठी निवासी उपजिल्हाधिकारी मोहन पातुरकर, संबंधित विभागाचे जिल्हाप्रमुख उपस्थित होते. महसुल विभागातर्फे 3, जिल्हा परिषद अमरावतीशी संबंधित 2, अधिक्षक भुमि अभिलेख अमरावती 1, कृषि विभाग 1 व इतर कार्यालय 2 अशा एकूण 9 तक्रारी प्राप्त होत्या पैकी 1 प्रकरण निकाली निघाले.     
          प्राप्त निवेदनावर संबधित कार्यालय प्रमुखांनी तातडीने कारवाई करुन निवेदन कर्त्याचे समाधान करण्याबाबत अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिले.
00000
वाघ/सागर/गावंडे/दि.04-07-2016/16-16 वाजता





No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 10.06.2026

  शुक्रवारी जागतिक बाल कामगार प्रथाविरोधी दिन अमरावती, दि. 10 (जिमाका) : बालमजुरी या अनिष्ठ प्रथेविरूद्ध विस्तृत प्रमाणात जनजागृती करणे आवश्...