Saturday, July 23, 2016

दिवंगत नेते रा.सु.गवई यांच्या स्मारकाबाबत
समितीची बैठक संपन्न
       अमरावती, दि. 23 : दिवंगत नेते रा.सु.गवई यांच्या स्मारक संकुल उभारण्याबाबत समितीची बैठक पालकमंत्री प्रविण पोटे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात संपन्न झाली.
          बैठकीस न्या.भुषण गवई, आ.डॉ.सुनिल देशमुख, जिल्हाधिकारी किरण गित्ते, मनपा आयुक्त हेमंत पवार, पोलिस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, पोलिस अधिक्षक (ग्रामीण) लखमी गौतम, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, अधिक्षक अभियंता बनगीनवार, कार्यकारी अभियंता श्रीमती वैद्य, अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
          जिल्हाधिकारी गित्ते म्हणाले, स्मारक संकुल उभारणीचे काम शासनाच्या प्रचलित नॉर्मस् प्रमाणेच करण्यात येईल. मागील बैठकीत निर्देशाप्रमाणे आर्किटेक्ट नेमुन स्मारक संकुलाचे अंदाजपत्रक तयार करण्यात येईल. सदरचे अंदाजपत्रक मागवून त्यास लागणाऱ्या निधीची पुरक मागणी त्वरित करण्यात येईल असे सांगितले. यावेळी पालकमंत्री पोटे आणि न्या.भुषण गवई यांनी स्मारक संकुला संदर्भात उपयुक्त सुचना केल्या.
          दिवंगत नेते रा.सु.गवई यांच्या स्मारक संकुलाचा भुमिपूजन समांरभ दि.25 जुलै, 16 रोजी सुमारे सकाळी 10 वाजता होणार आहे. मा.मुख्यमंत्री महोदय या समारंभासाठी येणार असुन भुमिपुजनाची सर्व तयारी झाली आहे. संबंधितांना निमंत्रण पत्रिका पाठविण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी मोहन पातुरकर यांनी यावेळी दिली.      
00000

No comments:

Post a Comment

बँकांनी उद्योगांना कर्जवाटप करताना सकारात्मक रहावे - जिल्हाधिकारी आशिष येरेकर

बँकांनी उद्योगांना कर्जवाटप करताना सकारात्मक रहावे    - जिल्हाधिकारी आशिष येरेकर *उद्दिष्ट प...