Tuesday, May 23, 2023

सहकार खात्याची परीक्षा 26 ते 28 मे या कालावधीत

 

सहकार खात्याची परीक्षा 26 ते 28 मे या कालावधीत

अमरावती, दि. 22 : सहकार खात्यामार्फत घेण्यात येणारी जी. डी. सी. आणि ए. व सी. एच. एम. परीक्षा 2023 साठी दि. 26, 27 व 28 मे 2023 रोजी सकाळी 10 ते 5 या वेळेत गणेशदास राठी विद्यालय, पंचवटी चौक, मोर्शी रोड, अमरावती केंद्रावर घेण्यात येत आहे. परीक्षेला बसलेल्या परीक्षार्थींना त्यांची प्रवेशपत्रे पोष्टाव्दारे पाठविण्यात आलेली आहेत. ज्या परीक्षार्थींची नावे परीक्षेस पात्र यादीमध्ये आहेत, परंतु प्रवेशपत्र वेळेवर प्राप्त झालेले नाही, अशा परीक्षार्थींना अन्य ओळखपत्र (पॅनकार्ड, मतदान कार्ड, ड्राइव्हिंग लायसन्स, आधार कार्ड, पासपोर्ट) सादर केल्यास परीक्षेस बसता येईल.

            अधिक माहितीसाठी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, अमरावती तसेच सहकार संकुल, कांता नगर, अमरावती येथील दुरध्वनी क्रमांक 0721-2661633 व भ्रमणध्वनी क्रमांक 9370103913 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन सहकारी संस्थेचे केंद्रप्रमुख  तथा विभागीय उपनिबंधक देवयानी भारस्वाडकर यांनी केले आहे.

0000

No comments:

Post a Comment

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार

  ‘ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ ’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार