Thursday, May 25, 2023

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना अर्ज सादर करण्यास 31 मे पर्यंत मुदतवाढ

 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना

अर्ज सादर करण्यास 31 मे पर्यंत मुदतवाढ

अमरावती, दि. 25 : सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे सन 2022-23 वर्षातील अनुसूचित जाती, प्रवर्गातील सन 2022-23 नविन तसेच नुतनीकरणाची, सन 2021-22 चे दुसऱ्या टप्प्यातील अर्ज भरण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. त्यानुसार अनुसूचित जाती, प्रवर्गातील, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेस पात्र विद्यार्थ्यांना व संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांना सूचित करण्यात येत की, या योजनेचे अर्ज सादर करण्यासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत दि. 31 मे 2023 पर्यंत अंतिम मुदत देण्यात येत आहे. 

त्यासाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, या कार्यालयातून या योजनेसाठी पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांनी आवश्यक त्या कागदपत्रासह परिपूर्ण अर्ज भरून विहित वेळेत सादर करण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांची राहील. दि. 31 मे 2023 रोजी पर्यंत अर्ज सादर करण्यासाठी अंतिम मुदत दिलेली आहे. तरी या योजनेसाठी विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत अर्ज या कार्यालयास सादर करावे, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त माया केदार यांनी केले आहे. 

00000

No comments:

Post a Comment

#अमरावती_विभाग_शिक्षक_मतदारसंघ_निवडणूक_2026 दिनांक 23 ऑक्टोबर, 2026 रोजी सकाळी 08.00 वा. ते दुपारी 16.00 वाजे पर्यंत झालेल्या अंतीम मतदानाची आकडेवारी

  # अमरावती _ विभाग _ शिक्षक _ मतदारसंघ _ निवडणूक _2026 दिनांक 23 ऑक्टोबर, 2026 रोजी सकाळी 08.00 वा. ते दुपारी 16.00 वाजे पर्यंत झालेल्या...