Friday, May 19, 2023

स्त्रीशक्ती समाधान शिबिर 22 मे रोजी

 

स्त्रीशक्ती समाधान शिबिर 22 मे रोजी

अमरावती, दि. 18: एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प चिखलदरामार्फत 22 मे 2023 रोजी सकाळी 11 वाजता पंचायत समिती सभागृह, चिखलदरा येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे तसेच त्यांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा मिळावी यासाठी हे  शिबिर उपयुक्त ठरणार आहे. या शिबिरामध्ये तहसिलदार, बाल विकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, पोलीस अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, विधी सेवा प्राधिकरण तसेच अन्य विभागातील अधिकारी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. महिलांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन एकात्मिक बालविकास सेवा योजना बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी  केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

#अमरावती_विभाग_शिक्षक_मतदारसंघ_निवडणूक_2026 दिनांक 23 ऑक्टोबर, 2026 रोजी सकाळी 08.00 वा. ते दुपारी 16.00 वाजे पर्यंत झालेल्या अंतीम मतदानाची आकडेवारी

  # अमरावती _ विभाग _ शिक्षक _ मतदारसंघ _ निवडणूक _2026 दिनांक 23 ऑक्टोबर, 2026 रोजी सकाळी 08.00 वा. ते दुपारी 16.00 वाजे पर्यंत झालेल्या...