Friday, May 26, 2023

अनोळखी मृत इसमाची ओळख पटविण्याबाबत आवाहन

 

अनोळखी मृत इसमाची ओळख पटविण्याबाबत आवाहन

        अमरावती, दि. 26 : सिटी कोतवाली अमरावती (शहर) अंतर्गत एका अनोळखी  पुरुषाचा मृतदेह, वय अंदाजे 40 ते 45 वर्षे हे राजकमल चौककडून रेल्वे पुलाकडे जाणाऱ्या मार्गाने पुलाचे डाव्या बाजूला फुटपाथवर आढळले. मृतकाचा बांधा सडपातळ, रंग सावळा, उंची 5 फुट 5 इंच,  छातीवर डावे बाजूने सोनू व किरण नाव गोंदलेले आहे. अंगामध्ये गडद निळया रंगााचा चौकडीचा अर्ध्या बाहीचा जुना वापरता मळकट शर्ट तसेच पांढऱ्या रंगावर काळया रंगाच्या रेषांची पॅन्ट घातलेला आहे. मृतकाच्या नातेवाईकाचा शोध लागावा व अनोळखी इसमाची ओळख पटविण्यास सहकार्य करण्यासाठी दुरध्वनी 0721-2672001 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन वरिष्ठ पोलीस उपनिरीक्षक पोलीस स्टेशन सिटी कोतवाली, अमरावती (शहर) यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

#अमरावती_विभाग_शिक्षक_मतदारसंघ_निवडणूक_2026 दिनांक 23 ऑक्टोबर, 2026 रोजी सकाळी 08.00 वा. ते दुपारी 16.00 वाजे पर्यंत झालेल्या अंतीम मतदानाची आकडेवारी

  # अमरावती _ विभाग _ शिक्षक _ मतदारसंघ _ निवडणूक _2026 दिनांक 23 ऑक्टोबर, 2026 रोजी सकाळी 08.00 वा. ते दुपारी 16.00 वाजे पर्यंत झालेल्या...