Friday, May 26, 2023

जिल्हा दक्षता समितीची बैठक संपन्न

 



जिल्हा दक्षता समितीची बैठक संपन्न

अमरावती , दि. २६ अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ अंतर्गत जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची सभा नुकतीच संपन्न झाली. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ . विवेक घोडके यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक संपन्न झाली. गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक  ए. बी. ठोसरे, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक तपन कोल्हे ,पोलीस निरीक्षक पी.पी. पाचकवळे, शासकीय अभियोक्ता जे .व्ही. मठाळ, समाज कल्याण सहायक आयुक्त माया केदार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते .

          दक्षता समितीच्या बैठकीमध्ये माहे एप्रिल २०२३ पर्यंतच्या दाखल झालेल्या व प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा आढावा घेण्यात आला .शहर विभागात १० गुन्हे व ग्रामीण विभागात १४ गुन्हे दाखल झाले आहेत. पोलीस विभागाकडे माहे एप्रिल महिन्याअखेर, ६१ गुन्हे प्रलंबित आहेत. न्यायालयात अद्याप ६११  प्रकरणे प्रलंबित असल्याची माहिती पोलीस विभाग व शासकीय अभियोक्ता यांनी  दिली.

           निवासी उपजिल्हाधिकारी डॉ . घोडके यांनी प्रलंबित प्रकरणांचा लवकरात लवकर तपास पूर्ण करून दोषारोप न्यायालयात दाखल करण्याबाबत संबंधितांना सूचना दिली .तसेच निधी अभावी प्रलंबित प्रकरणांना अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करण्याबाबत निर्देश दिले.

000000

No comments:

Post a Comment

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार

  ‘ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ ’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार