Friday, May 19, 2023

अनोळखी मृत इसमाची ओळख पटविण्याबाबत आवाहन

 

अनोळखी मृत इसमाची ओळख पटविण्याबाबत आवाहन

            अमरावती, दि. 19 : अमरावती शहर सिटी कोतवाली पोलिस ठाणे अंतर्गत एका अनोळखी इसमाचा मृतदेह, वय 50 वर्षे लावारिस स्थितीमध्ये दि. 15 मे 2023 रोजी दुपारचे 1 वाजता घटनास्थळ इर्विन चौक, देशमुख यांच्या वाड्यासमोर, सुरज कॅफेजवळ, अमरावती येथे आढळून आला.  बांधा सडपातळ, रंग सावळा, उंची 5 फुट 5 इंच, दाढी व डोक्याचे केस काळे-पांढरे वाढलेले, अंगामध्ये कपडे मळकट केसरी रंगाचा टी शर्ट, ग्रे रंगाचा मळकट जिन्स पॅन्ट घातलेल्या मृताअवस्थेत आढळले. मृतकाच्या नातेवाईकाचा शोध लागावा व अनोळखी इसमाची ओळख पटविण्यास सहकार्य करण्याचे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन सिटी कोतवाली अमरावती (शहर) यांनी केले आहे.

0000

No comments:

Post a Comment

#अमरावती_विभाग_शिक्षक_मतदारसंघ_निवडणूक_2026 दिनांक 23 ऑक्टोबर, 2026 रोजी सकाळी 08.00 वा. ते दुपारी 16.00 वाजे पर्यंत झालेल्या अंतीम मतदानाची आकडेवारी

  # अमरावती _ विभाग _ शिक्षक _ मतदारसंघ _ निवडणूक _2026 दिनांक 23 ऑक्टोबर, 2026 रोजी सकाळी 08.00 वा. ते दुपारी 16.00 वाजे पर्यंत झालेल्या...