Friday, May 26, 2023

वसतिगृहासाठी भाड्याच्या इमारती मिळण्याबाबत समाज कल्याण विभागाचे आवाहन

 

वसतिगृहासाठी भाड्याच्या इमारती मिळण्याबाबत

समाज कल्याण विभागाचे आवाहन

 

अमरावती, दि. 26 : विमुक्त जाती व भटक्या जमाती इतर मागास व प्रवर्ग विशेष कल्याण विभागामार्फत राज्यामध्ये मुला-मुलींचे जिल्हास्तरावर प्रत्येकी एक या प्रमाणे एकूण 36 वसतिगृह सुरु करण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे. त्या अनुषंगाने सद्य:स्थितीत जमीन प्राप्त न झाल्याने प्रत्येक जिल्ह्यात एक मुलांचे व एक मुलींचे असे एकूण दोन वसतिगृह भाड्याच्या इमारतीमध्ये सुरु करण्याचे निर्देश दिले आहेत.

शासनाला 100 विद्यार्थी तसेच विद्यार्थीनींच्या दोन स्वतंत्र वसतिगृहांसाठी 20 हजार चौ.फु. परीपूर्ण बांधकाम असलेली तसेच निवासी वापरासाठी सर्व सोई-सुविधेसह इमारती भाड्याने घ्यावयाच्या आहेत. या इमारतीचे भाडे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ठरविण्यात येईल.

यासाठी स्थानिक इच्छुक मालकाने सहायक आयुक्त समाज कल्याण सामाजिक न्याय भवन,पोलीस आयुक्तालयाच्या मागे, चांदुररेल्वे रोड, अमरावती येथे प्रत्यक्ष अथवा दुरध्वनी क्रमांक 0721-2661261 यावर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त माया केदार यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार

  ‘ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ ’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार