Monday, May 8, 2023

सामाजिक न्याय पर्व अभियानातंर्गत वसतिगृहात विविध उपक्रम

 सामाजिक न्याय पर्व अभियानातंर्गत वसतिगृहात विविध उपक्रम

अमरावती, दि. ८ : सामाजिक न्याय पर्व अभियातंर्गत दि. १ एप्रिल ते १ मे २०२३ या कालावधीत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत कार्यरत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, चांदुररेल्वे येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये दि. ७ एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांना आरोग्य विषयक मार्गदर्शन करून त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त ११ एप्रिल रोजी त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्यावर मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच १२ ते १३ एप्रिल या कालावधीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित वाचन उपक्रम व प्रश्नमंजुषेचे आयोजन करण्यात आले होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे सामाजिक व शैक्षणिक कार्य यावर मार्गदर्शनपर व्याख्यान तसेच 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक क्षेत्रातील योगदान' या विषयावर विद्यार्थ्यांची निबंध स्पर्धा घेण्यात आली होती.  तसेच विद्यार्थ्यांशी हितगूज साधणारा 'संवाद उपक्रम' राबविण्यात आला. दिनांक २२ ते २३ एप्रिल या दोन दिवसात वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी एकूण १८ तास अभ्यास केला.

           सामाजिक न्याय पर्व अभियानांतर्गत अमरावती जिल्ह्यातील सर्व शासकीय वसतिगृह व निवासी शाळा येथील गृहपाल व मुख्याध्यापकांचे आढावा बैठक व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ३० एप्रिल रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती साजरी करून स्वच्छता अभियान राबविण्यात आले. १ मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा करून विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. अशी माहिती चांदुररेल्वे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृहाचे गृहपाल रि.क. यादव यांनी पत्रकाव्द्वारे दिली .

00000

 


No comments:

Post a Comment

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार

  ‘ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ ’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार