Friday, May 26, 2023

शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना

 

शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना

अमरावती, दि. 26 : राज्यातील इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताच्या दृष्टीकोणातून शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना शासनाने सुरु केली आहे.

शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनेमध्ये उच्च शिक्षणासाठी राज्य, देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमासाठी, प्रवेश घेण्याकरिता इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थी, विद्यार्थीनींना बँकेमार्फत उपलब्ध होणाऱ्या शैक्षणिक कर्ज रकमेवरील व्याजाचा परतावा करण्यात येईल. याशिवाय इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थी, विद्यार्थींनींना उच्च शिक्षणासाठी बँकेकडून राज्यांतर्गत व देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी 10 लक्ष व परदेशी अभ्यासक्रमासाठी 20 लक्ष इतके महत्तम कर्ज अदा करण्यात येईल. यासाठी विद्यार्थ्यांचे वय 17 ते 30 वर्षे या दरम्यानचे असावे. व इमाव प्रवर्गातील महाराष्ट्राचा रहिवासी असावा. अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक मर्यादा ग्रामीण व शहरी भागासाठी 8 लक्ष पर्यंत व शासनाच्या सक्षम प्राधिकरणाने वेळोवेळी निर्धारित केलेल्या नॉन क्रिमिलेअरच्या मर्यादेत असावे. अर्जदार इयत्ता बारावीची परीक्षा 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण असावा.

राज्य व देशांतर्गत अभ्यासक्रमामध्ये आरोग्य विभाग, अभियांत्रिकी, व्यवसायिक व व्यवस्थापन अभ्यासक्रम, कृषी तसेच अन्न प्रक्रिया व पशुविज्ञान या अभ्यासक्रमाचा समावेश आहे. यात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी बँकेने उपलब्ध करुन दिलेल्या कर्जामध्ये शैक्षणिक शुल्क, पुस्तके, साहित्य खरेदी व अर्जदाराच्या निवासाचा व भोजनाचा खर्च याचा समावेश राहील. परदेशी अभ्यासक्रमामध्ये आरोग्य विभाग, अभियांत्रिकी, व्यावसायिक व्यवस्थापन, विज्ञान आणि कला या अभ्यासक्रमाचा समावेश आहे. यात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी बँकेने उपलब्ध करुन दिलेल्या कर्जामध्ये फक्त शैक्षणिक शुल्क, पुस्तके, साहित्य खरेदीचा समावेश राहील.

अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, पोलीस आयुक्तालया मागे, अमरावती येथे प्रत्यक्ष अथवा दुरध्वनी क्रमांक 0721-2550339 यावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

बँकांनी उद्योगांना कर्जवाटप करताना सकारात्मक रहावे - जिल्हाधिकारी आशिष येरेकर

बँकांनी उद्योगांना कर्जवाटप करताना सकारात्मक रहावे    - जिल्हाधिकारी आशिष येरेकर *उद्दिष्ट प...