Friday, May 26, 2023

अग्निपथ योजनेतंर्गत सैन्य भरती मेळावा 5 ते 11 जुलै दरम्यान

 

अग्निपथ योजनेतंर्गत सैन्य भरती मेळावा 5 ते 11 जुलै दरम्यान

 

        अमरावती, दि.26: विदर्भातील सर्व जिल्ह्यातील मुलांसाठी नागपूर येथे दि. 5 ते 11 जुलै 2023 दरम्यान अग्निपथ सैन्य भरती मेळावा आयोजित करण्यात येत आहे. त्यासाठी लेखी परीक्षा दि. 17 एप्रिल 2023 रोजी घेण्यात आली आहे. लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना या भरतीमध्ये भाग घेता येईल.

यासाठी प्रत्येक तालुक्यात तहसिलदार यांच्या अधिपत्त्याखाली व इच्छुक माजी सैनिकांच्या मदतीने भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र तालुका क्रिडा संकुल येथे सुरू करण्यात यावे. या शिबिराच्या नियोजनसाठी सर्व संबंधितांची सभा तहसिलदार यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात यावी. जिल्ह्यातील जास्तीत-जास्त पात्र मुले सैन्यात भरती होण्याचे दृष्टीने शिबिराचे नियोजन करावे. तसेच अमरावती जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी प्रत्येक तालुक्यामध्ये तालुका क्रीडा अधिकारी यांना सूचित करावे व त्यासाठी लागणारे साहित्य उपलब्ध करून देण्यात यावे. शिक्षणाधिकारी यांच्यामार्फत क्रीडा शिक्षकांना सूचित करण्यात येते की, त्यांनी या शिबिरात स्वेच्छेने सहभागी होऊन भरती पूर्व प्रशिक्षण शिबिरात मार्गदर्शन करावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी व सैनिक कल्याण अधिकारी आशिष बीजवल यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार

  ‘ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ ’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार