अटल
भूजल योजना भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेत
जरुड
ग्रामपंचायतीचा राज्यात दुसरा क्रमांक
अमरावती, दि. 10 (जिमाका): अटल भूजल योजनेअंतर्गत भूजल समृद्ध ग्राम स्पर्धा
सन 2022-23 चा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये जरुड ग्रामपंचायतने राज्यात दुसऱ्या क्रमांक
तर जिल्ह्यात प्रथम क्रमांक आणि झटामझिरी ग्रामपंचायतने
दुसरा तर अंबाडा ग्रामपंचायतने तिसरा क्रमांक पटकाविला आहे. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे हस्ते या ग्रामपंचायतींना
धनादेश, सन्मानचिन्ह देऊन नुकतेच सन्मानित
करण्यात आले.
अटल भूजल योजनेअंतर्गत सन 2022-23 या वर्षात
भूजल समृद्ध ग्रामस्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते . त्यामध्ये जरुड ग्रामपंचायतने
राज्यात दुसऱ्या क्रमांकाचे 50 लाख रुपयांचे बक्षिस प्राप्त केले तसेच जिल्ह्यात प्रथम
क्रमांक प्राप्त करुन जिल्ह्याचे 50 लाख रुपये असे एकत्रितरित्या एक कोटी रुपयांचे
बक्षीस प्राप्त केले. तसेच वरुड तालुक्यातील झटामझिरी ग्रामपंचायतने दुसरा क्रमांक
प्राप्त करुन 30 लाख रुपयांचा पुरस्कार प्राप्त केला तर मोर्शी तालुक्यातील अंबाडा
ग्रामपंचायतने तिसऱ्या क्रमांकाचे 20 लाख रुपयांचा पुरस्कार प्राप्त केला.
दि. 9 सप्टेंबर 2024 रोजी नाशिक (मित्रा) मंत्री
सार्वजनिक बांधकाम मंत्री दादासाहेब भुसे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या पुरस्कार
वितरण सोहळ्यात पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, भूजल सर्वेक्षण आणि विकास
यंत्रणा आयुक्त पवनीत कौर याच्या हस्ते या
ग्रामपंचायतींना सन्मानित करण्यात आले.
00000
शासकीय
वसतिगृहातील प्रवेश प्रक्रियेला 16 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
अमरावती, दि. 10 (जिमाका): जिल्ह्यातील सर्व
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विजाभज, इतर मागासवर्ग आणि आर्थिक मागास प्रर्वगातील
उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अमरावती जिल्ह्यामध्ये न्याय विभागाअंतर्गत कार्यरत
असलेल्या मागासवर्गीय मुला, मुलींचे शासकिय वसतिगृहात प्रवेशित विद्यार्थ्यांना सर्व
सोयी सुविधा मोफत पुरविण्यात येतात. सन 2024-25 साठी व्यावसायिक अभ्यासक्रम शिकत असलेल्या
ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावयाचा आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी https://hmas.mahait.org या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज
भरण्याची प्रक्रीया सुरु करण्यात आलेली आहे. चालू वर्ष सन 2024-25 करिता व्यावसायिक
अभ्यासक्रमात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन तसेच ऑनलाईन भरलेले अर्ज पोर्टलवरुन
डाऊनलोड करुन त्याची प्रिंट घेवून संबंधित वसतिगृहामध्ये ऑफलाईन अर्ज सादर करावा.
तसेच अमरावती जिल्ह्यात महाविद्यालयीन पदवी,
पदविका, पदव्युत्तर (व्यावसायिक अभ्यासक्रम) प्रवेशाकरिता विभागीय स्तरावरील मागासवर्गीय
1 हजार मुलांकरीता शासकिय वसतिगृह, युनिट क्र.1,
2, 3 निभोरा, गुणवंत मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, निभोरा व संत गाडगे महाराज
मुलांचे शासकीय वसतिगृह, निभोंरा तसेच मुलींकरिता मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह
,कॅम्प, अमरावती, गुणवंत मुलींचे शासकीय वसतिगृह, जेल रोड, अमरावती तसेच विभागीय स्तरावरील
250 मुलींचे युनिट क्र.4 अमरावती तसेच तालुका स्तरावरील मुला -मुलींचे शासकीय वसतिगृहामध्ये
महाविद्यालयीन पदवी, पदविका, पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमाकरिता प्रवेश अर्ज स्वीकारण्याची
मुदतवाढ दि.16 सप्टेंबर 2024 पर्यंत करण्यात आलेली असून अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया
सुरु आहे.
विद्यार्थ्यांनी
प्रवेश अर्ज संबंधित वसतिगृहाकडे सादर करावे . अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्रमांक
0721-2661261 यावर संपर्क साधावा, असे आवाहन
समाज कल्याण सहायक आयुक्त माया केदार यांनी केले आहे.
00000
जागतिक
आत्महत्या प्रतिबंध दिन साजरा
अमरावती, दि. 10 (जिमाका): दरवर्षी जागतिक
आत्महत्या प्रतिबंध दिन म्हणून 10 सप्टेंबर
हा दिवस साजरा करण्यात आला. अध्यक्ष तथा
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.
प्रमोद निरवणे, डॉ. प्रिती मोरे, मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अमोल गुल्हाने, डॉ. चंद्रशेखर
पाटील, डॉ. सृष्टी देऊळकर, प्रमोद भक्ते, सुनिल कळतकर, अधिसेविका ललिता अटाळकर, आहारतज्ज्ञ वृषाली चव्हाण,भावना पुरोहित,
श्रध्दा हरकंचे, सारा बांगर, विशाल झामरे, मंगेश घोडेस्वार, व परीचर्या महाविद्यालयामधील
विद्यार्थी व विद्यार्थींनी मोठ्या संख्याने कार्यक्रमास उपस्थित होते.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.
सौंदळे, डॉ. अमोल गुल्हाने, श्री. .अटाळकर, भावना पुरोहित यांनी उपस्थितांना आत्महत्या
प्रतिबंधक दिनानिमित्य मार्गदर्शन केले. या कार्यक्रामाचे संचालन प्रमोद भक्ते व आभार
प्रदर्शन श्रीमती श्रध्दा हरकंचे यांनी केले.
0000
माता
बनल्या अंगणवाडी ताई..... मुलांना शिकवली अ आ इ ई.....
राष्ट्रीय
पोषण महानिमित्त महिनाभर विविध कार्यक्रमांची मेजवानी
- मुख्य
कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा
अमरावती, दि. 10 (जिमाका) : 'राष्ट्रीय पोषण महा'निमित्त
महिला बाल विकास विभागामार्फत संपूर्ण महिनाभर वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येतात. यावर्षीही
महिला बालविकास विभागामार्फत वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये
'माता बनल्या अंगणवाडी ताई , .मुलांना शिकवली अ आ इ ई... 'या उपक्रमांतर्गत गावातील
मातांनी अंगणवाडी केंद्रात जाऊन बालकांसोबत संवाद साधला . काही मातांनी बालकांना गाणी
शिकवली, काहींनी मातीकाम तर काहींनी लिहायला - वाचायला शिकवले .त्यामुळे मुलांना नवीन
अंगणवाडी ताई भेटल्याचा आनंद झाला.
यावर्षी प्रामुख्याने राष्ट्रीय पोषण
महानिमित्त ॲनेमिया कमी करणे, बालकांची वजन वाढ मोजणे, बालकांना योग्य तो आहार खाऊ
घालणे, पोषण भी और पढाई भी, तंत्रज्ञानाची ओळख आणि सर्वांगीण पोषण या महत्त्वाच्या
बाबीवर राष्ट्रीय पोषण महा अंतर्गत उपक्रम राबविले जाणार आहे . याअंतर्गत महिला बालविकास
विभाग अमरावती विभागामार्फत महिनाभराच्या कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये
एक पेड माँ के नाम, हजार दिवस उपवास बंद चळवळ, हाट बाजार, इलेक्ट्रॉनिक उपवास, अक्षय
पात्र आणि मटका फ्रीज, मातांची पाककृती स्पर्धा, अन्नसाक्षरता, एक दिवस मेळघाटासाठी,
माता -बालक संयुक्त योगा, मासिक पाळी व्यवस्थापन काळाची गरज, पोषणावर बोलू काही, लोकप्रतिनिधी
दिवस, वृद्धांचे वाढदिवस, नवविवाहितांचे समुपदेशन,
आजीबाईंची अंगणवाडी अशा विविध कार्यक्रमांचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले असून संपूर्ण
महिनाभर या कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
या उपक्रमात अंगणवाडीताई ऐवजी गावातील मातांनी
अंगणवाडी ताई म्हणून मुलांना शिकवल्यामुळे मुलांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद दिसून
आला. त्याचबरोबर नवीन बाबी शिकायला मिळाल्यामुळे मुले उत्साहित होती. काही मातांनी
मुलांना खाऊही आणला होता ज्यामुळे मुलांना आणखी आनंद झाला. राष्ट्रीय पोषण महानिमित्त
जे वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येतील त्यामध्ये पालकांनी सहभागी व्हावे , असे आवाहन
उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास घोडके
यांनी केले आहे.
"महिला
बाल विकास विभागाने राष्ट्रीय पोषण महा निमित्त अतिशय दर्जेदार कार्यक्रमांचे नियोजन
केलेल आहे. अंगणवाडी ताईंच्या मार्फत सदर कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यात येणार असून
गावातील पालक, युवक, स्वयंसेवी संस्था, शाळा, महाविद्यालय यांनीही या कार्यक्रमात सहभागी
होऊन राष्ट्रीय पोषण आहार थाटामाटात साजरा करावा."
संजिता मोहपात्रा
00000
अल्पसंख्यांक
मुलींच्या वसतिगृहातील कंत्राटी पदांची भरती
अमरावती, दि. 10 (जिमाका): अल्पसंख्याक विभागाद्वारे
संचालित शासकीय अल्पसंख्याक मुलींचे वसतिगृहातील कंत्राटी पदांसाठी अत्यंत तात्पुरावा
स्वरुपात एकत्रित मानधनावर कंत्राटी पध्दतीने 11 महिने मुदतीकरिता खालील पदे भरावयाची आहेत. त्यासाठी अर्ज मागविण्यात येत
आहेत. या पदांसाठी आवेदन करण्यासाठीचा अर्ज
व शैक्षणिक पात्रता तसेच अटी व शर्तीबाबत संपूर्ण माहिती
https://amravati.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध
करून देण्यात आलेली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी नमूद संकेतस्थळावरुन अर्जाचा नमुना
प्राप्त करून घ्यावा व शैक्षणिक पात्रतेच्या व अनुभवाच्या आवश्यक कागदपत्रासह अर्ज
कार्यालयीन वेळेमध्ये अल्पसंख्याक शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती येथे सादर करावा,
उमेदवारांनी दि. 25 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज
सादर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले आहे. एकुण पदांमध्ये अधीक्षक
महिला (मानधन 15000/-), लिपीक महिला (मानधन 8000/-), शिपाई महिला (मानधन 6500/-), सफाई
कामगार महिला (मानधन 6000/-), सुरक्षा रक्षक पुरूष (मानधन 9000/-) अशा प्रकारे प्रतिमाह
मानधन देण्यात येईल, संबंधितांनी त्याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने
केले आहे.
00000
No comments:
Post a Comment