प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना पहिला हप्ता
*15 सप्टेंबरला होणार वितरीत
अमरावती,
दि. 12 (जिमाका) : प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना दि. 15 सप्टेंबर रोजी
पहिला हप्ता वितरीत करण्यात येणार आहे.
केंद्र
शासनाच्या ग्रामीण विकास मंत्रालयाने 2024-25 या आर्थिक वर्षाकरीता राज्यासाठी
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2.0 अंतर्गत 6 लाख 36 हजार 89 उदिद्ष्ट
दिले आहे. सदर उद्दिष्टे जिल्हा, तालुका आणि ग्रामपंचायतनिहाय आवास सॉफ्ट प्रणालीवर
वितरीत करण्यात आले आहे. त्यानुसार सर्व लाभार्थ्यांना मंजुरी देवून पहिला हप्ता
दि. 15 सप्टेंबर 2024 रोजी पंतप्रधानांच्या हस्ते देशातील 10 लाख लाभार्थ्यांना
एका क्लिकवर पहिला हप्ता वितरीत करण्यात येणार आहे. यात राज्यातील किमान 2 लाख 50
हजार लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरीत करण्यात येणार आहे.
जिल्ह्यासाठी
26 हजार 166 लाभार्थ्यांना घरकुल उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. यापैकी 40
टक्के घरकुल लाभार्थ्यांना दि. 15 सप्टेंबर 2024 रोजी लाभ मिळणार आहे. योजनेचा लाभ
घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी घरकूल योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे पंचायत समिती
कार्यालयात जमा करावीत, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी
यांनी केले आहे.
00000
रिक्षाचालकांसाठी
धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळाची स्थापना
अमरावती,
दि. 12 (जिमाका) : राज्य शासनातर्फे धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र ऑटो-रिक्षा आणि
मीटर टॅक्सीचालक कल्याणकारी मंडळ स्थापना करण्यात आली आहे.
ऑटो-रिक्षा
परवानाधारक, ऑटो-रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालकांसाठी सामाजिक सुरक्षा आणि
कल्याणकारी योजनेंतर्गत जीवन विमा अपंगत्व विमा योजना, आरोग्य विषयक लाभ,
कर्तव्यावर असताना दुखापत झाल्यास 50 हजारापर्यंत अर्थसहाय्य योजना, पाल्याच्या
शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना, कामगार कौशल्यवृद्धी योजना, 65 वर्षावरील
ऑटोरिक्षा मिटर्ड टॅक्सी परवानाधारक यांना निवृत्ती सन्मान योजनेंतंर्गत सानुग्रह
अनुदान, नवीन ऑटोरिक्षा मिटर्ड टॅक्सी खरेदी, गृह खरेदीसाठी घेण्यात येणारे कर्ज
इत्यादी, ऑटोरिक्षा परवानाधारक ऑटो-रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालकांसाठी केंद्र
शासन आणि राज्य शासनामार्फत रावण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजना राबविणे.
मंडळाच्या कल्याणकारी निधीचे विनियोजन व व्यवस्थापन करणे इत्यादी मंडळाचे उदिष्टे
आहे.
मंडळाच्या
योजनांच्या लाभासाठी ऑटो-रिक्षा परवानाधारक, ऑटो-रिक्षा आणि मिटरटॅक्सी चालकांनी
मंडळाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील परिवहन कार्यालयामार्फत याबाबतची
नोंदणी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. नोंदणीकृत चालकांना लाभ देण्यासाठी
मंडळाच्या जिल्ह्यातील कार्यालयाकडून ओळखपत्र जारी करण्यात येणार आहे. मंडळाचा
सभासद होण्यासाठी अर्जदाराने राज्यामध्ये नोंदणी असलेल्या ऑटोरिक्षा आणि मिटर्ड
टॅक्सी अनुझप्ती व बॅज धारण केले असणे बंधनकारक राहिल. पात्र अर्जदाराच्या
कुटुंबातील व्यक्ती मंडळाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र असतील. तथापि,
कुटुंबातील सदस्य संख्या ही मुले मिळून 4 पर्यंत मर्यादित राहणार आहे.
सभासद सलग
एक वर्षापेक्षा जास्त काळ मंडळाची वर्गणी अथवा मंडळानी विहीत केलेली इतर रक्कम
मंडळाकडे अदा करणार नाही, अशा सभासदाचे सभासदत्व सुनावणीची एक संधी देऊन रद्द
करण्यात येणार आहे. परवानाधारक अपंग झाल्यास तो परवानाधारक देखील कल्याणकारी
योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र राहील. परवानाधारकाचा मृत्यू झाल्यास त्याची
अनुज्ञप्ती त्याच्या कायदेशिर वारसास हस्तांतरीत करण्यात येणार आहे. मयत
परवानाधारकाला कायदेशीर वारस त्याच्याकडे अनुज्ञप्ती, बॅज नसेल तर सदर कायदेशीर
वारस कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र राहिल.
नोंदणी
शुल्क आणि ओळखपत्र शुल्काची रक्कम रूपये 500 राहणार आहे. सदर नोंदणी शुल्क
अर्जासोबत जमा करण्यात येणार आहे. तसेच नोंदणी शुल्क आणि ओळखपत्र शुल्काची रक्कम
राज्यस्तरीय मंडळांनी निश्चित केल्याप्रमाणे असणार आहे. वार्षिक सभासद शुल्क रक्कम
300 राहणार आहे. तसेच वार्षिक सभासद शुल्काची रक्कम राज्यस्तरीय मंडळांनी वेळोवेळी
निश्चित केल्याप्रमाणे असेल.
ऑटो रिक्षा
व मिटर्ड टॅक्सी परवानाधारकांनी कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन
प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment