शहरात प्रतिबंधात्मक आदेश लागू
अमरावती, दि. 18 (जिमाका) : शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी अमरावती शहर पोलिस आयुक्त यांनी महाराष्ट्र पोलिस कायद्याचे कलम 37 (1) व (3) नुसार प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहे.
सदर प्रतिबंधात्मक आदेश शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी पोलिस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रात लागू करण्यात आला आहे. सदर कलम दि. 2 ऑक्टोबर 2024 रोजी मध्यरात्रीपर्यंत लागू राहणार आहे. या कलमाचा भंग करणाऱ्यांविरूद्ध कारवाई करण्यात येणार आहे, असे अमरावती शहर पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांनी कळविले आहे.
00000
सण-उत्सवाच्या काळात जमावबंदी आदेश जारी
अमरावती, दि. 18 (जिमाका) : जिल्ह्यात येत्या काळात सण उत्सव साजरे होणार आहेत. या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस आयुक्तालयाच्या परिसरात जमावबंदी आदेश जारी करण्यात आला आहे.
सदर आदेशाची अंमलबजाणी करण्यासाठी सर्व पोलिस ठाणेदार, अंमलदार त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना महाराष्ट्र पोलिस अधिनियमाच्या कलम 36 मधील पोटकलमानुसार कार्यवाही करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.
रस्त्यावरून जाणारी मिरवणूक सुरळीत ठेवणे, उपासनास्थळी गर्दी होणार असल्यास किंवा अडथळ्यांचा संभव असल्यास अडथळा होऊ देऊ नये, मिरवणूकांचे मार्ग विहित करणे, मोर्चे, निदर्शने, सभा, पदयात्रा, वाद्यांबाबत नियम आणि नियंत्रण ठेवणे, सार्वजनिक जागेत ध्वनिक्षेपकाच्या वापराबाबत नियम व नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. सक्षम अधिकाऱ्यांनी या अधिनियमाच्या कलम 33, 35, 37 ते 40, 44 व 45 अन्वये कार्यवाही करावी, असे पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांनी कळविले आहे.
0000
आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे
प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन
अमरावती, दि. 18 (जिमाका) : कौशल्य विकास या संकल्पनेचा लाभ युवकांना व्हावा, यासाठी नामांकित महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा हस्ते वर्धा येथून राज्यातील एक हजार आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे शुक्रवार, दि. 20 सप्टेंबर रोजी उद्घाटन होणार आहे. यात जिल्ह्यातील 13 केंद्रांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील ज्योशबा सिव्हील सर्विसेस महाविद्यालय, वरुड, जी. एस. टोम्पे कॉलेज, चांदूर बाजार, अमरावती येथील बबनराव देशमुख महाविद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, श्री शिवाजी सायंस कॉलेज, आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, चिखलदरा, वाय डीव्हीडी आर्ट्स, कॉमर्स कॉलेज, तिवसा, राम मेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, बडनेरा, जी. एच. रायसोनी युनिर्व्हसिटी, अमरावती, महिला महाविद्यालय, अमरावती, फातिमा कॉलेज ऑफ नर्सिंग, तिवसा, सुशीला सुर्यवंशी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲडव्हॉन्समेंट, अमरावती केंद्रांचा समावेश आहे.
आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजनेचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वर्धा येथील स्वावलंबी शाळेच्या प्रागंणात करण्यात येणार आहेत. यावेळी अन्य जिल्ह्यातील कौशल्य विकास केंद्राचे दूरदृष्यप्रणालीद्वारे ऑनलाईन उद्घाटन करण्यात येणार आहे. आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रात उमेदवारांनी नोंदणी करावी, तसेच महाविद्यालयातील कार्यक्रमात उमेदवारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटीयार यांनी केले आहे.
0000
No comments:
Post a Comment