जिल्हाधिकारी कार्यालयात वाचन प्रेरणा दिनानिमित्त ग्रंथप्रदर्शन
अमरावती, दि. 15 (जिमाका) : भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात वाचन प्रेरणा दिवसानिमित्त ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आले. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंद दानेज, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, उपजिल्हाधिकारी विवेक जाधव, प्रसेनजित चव्हाण, श्रद्धा उदावंत, जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी डॉ. सुरज मडावी, सहायक ग्रंथालय संचालक डॉ. राजेश पाटील, अधीक्षक निलेश खटके, तहसिलदार रूपेश खंडारे आदी उपस्थित होते.
माजी राष्ट्रपती स्व. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्म दिवस 15 ऑक्टोबर हा वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. वाचन संस्कृती वृध्दींगत होण्यासाठी वाचन प्रेरणा दिनानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात येतात. त्यानुषंगाने जिल्हा ग्रंथालयाच्या वतीने ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या ग्रंथ प्रदर्शनाचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन डॉ. सुरज मडावी यांनी यावेळी केले.
00000
माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना अभिवादनअमरावती, दि. 15 (जिमाका): माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंद दानेज, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, उपजिल्हाधिकारी विवेक जाधव, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे, जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे, नगरपालिका प्रशासन सहआयुक्त विकास खंडारे आदी उपस्थित होते. उपस्थित अधिकारी-कर्मचारी यांनीही पुष्प वाहून डॉ. कलाम यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.
००००
पुर्णा मध्यम प्रकल्प ‘उर्ध्व वर्धा’तून रब्बी सिंचनासाठी सात पाणीपाळ्या प्रस्तावित
शेतक-यांना अर्ज करण्याचे आवाहन
अमरावती, दि. 15 (जिमाका): उर्ध्व वर्धा प्रकल्पातून रब्बी हंगामासाठी पाणीसाठा उपलब्ध असून सात पाणी पाळ्या देण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी लाभक्षेत्रातील शेतकरी बांधवांनी 10 नोव्हेंबरपूर्वी संबंधित शाखा कार्यालयास अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
उजवा मुख्य कालव्याच्या आरंभापासून 0 किमीपर्यंत व डावा मुख्य कालव्याच्या 5.00 किमीपर्यंतच्या लाभक्षेत्रातील सर्व वितरिका, जलाशयावरील अधिसूचित नदीनाल्यांवरील लाभधारकांना रब्बी हंगामासाठी पाणी देण्यात येईल. वितरण व्यवस्थेद्वारे जिथे सुलभपणे पाणी जाऊ शकते तिथपर्यंत कालवा संचलन कार्यक्रमानुसार ‘पुच्छ भागाकडून ते मुखाकडे’ (टेल टु हेड) या तत्त्वानुसार सिंचन होणे आवश्यक आहे.
नोव्हेंबर ते मार्च दरम्यान सात वेळा पाणी मिळेल.
कालव्याचे प्रवाही किंवा कालव्यावरील, नदी-नाल्यांवरील मंजूर उपसा सिंचन योजनांद्वारे सिंचनासाठी पाणी घ्यावयाचे असल्यास पाणी मागणी अर्ज नमुना क्र. 7अ, 7ब कोरे फॅार्म संबंधित शाखा कार्यालयात विनामूल्य उपलब्ध आहेत. ते भरून 10 नोव्हेंबरपर्यंत तिथेच सादर करावेत, असे आवाहन उर्ध्व वर्धा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी केले आहे. रब्बी हंगामात नोव्हेंबर 2025 अखेरपर्यंत या कालावधीत मागणीप्रमाणे पाच पाणी पाळ्या देण्यात येतील.
लाभधारकांनी नियम पाळणे आवश्यक
इच्छुक लाभधारकांनी त्यांच्याकडील थकबाकीची एक तृतीयांश व चालू हंगामाची अग्रिम पाणीपट्टी भरावी. उपसा सिंचन लाभधारकांनी नळमार्गावर पाणी मोजमाप यंत्र बसवावे. पिकांचे मागणी क्षेत्र 20 आर या पटीत असावे. पाणी अर्ज मंजूर करुन घेऊनच उपसा सिंचनासाठी पाणी वापर करावा.
मंजूर क्षेत्रासाठी कालव्याचे पाणी घेण्यात येणारी शेतचारी व विहिरीवरील शेतचारी यात तीन मीटरचे अंतर असावे. पाटबंधारे अधिनियमानुसार प्रवाही सिंचनाच्या मूळ दराच्या 50 टक्के दर लागू असेल.
पाणीपट्टी न भरणा-या लाभधारकास सिंचनासाठी पाणी देणे या कार्यालयावर बंधनकारक राहणार नाही. व त्यांचा पाणीपुरवठा केव्हाही बंद करण्यात येईल व थकबाकीवर शासन निर्णय नियमानुसार द.सा.द.शे. 10 टक्के दरान विलंब आकारण्यात येईल.
शेतचारा स्वच्छ ठेवा
कालव्याचे पाणी शेतात नेण्यासाठी असलेली शेतचारी स्वच्छ व व्यवस्थित ठेवण्याची जबाबदारी लाभधारकांची आहे. शेतचारी स्वच्छतेअभावी पाणी पुरवठ्यामध्ये व्यत्यय आल्यास हे कार्यालय जबाबदार राहणार नाही. उडाफ्याचे क्षेत्रास पाणीपुरवठा करण्यात येणार नाही व तसेच लाभधारकांनी मंजूर क्षेत्राचे मर्यादेपर्यंत कालवा व नदी-नाल्याच्या पाण्याचा वापर करावा. मंजूरीपेक्षा जादा क्षेत्र भिजविल्यास व अनधिकृतपणे पाणी घेतल्यास नियमाप्रमाणे पंचनामा करुन दंडनीय आकारणी करण्यात येईल. मंजूर न केलेल्या क्षेत्रास पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी या कार्यालयावर राहणार नाही.
लाभधारकाने दिवस व रात्री पाणी घेणे बंधनकारक आहे. अडचणी असल्यास कोणत्याही प्रकारची आगाऊ सूचना न देता पाणी पाळी पत्रकात बदल करण्याचे अधिकार कार्यकारी अभियंता यांना राहतील.
थकबाकीदार लाभधारक व थकबाकीदार पाणीवापर संस्थांना पाणी देणे बंधनकारक राहणार नाही. वितरिका पाणी पाळीमध्ये पाणी चालू असताना लाभधारक वितरिकेचा दरवाजा वेळी-अवेळी कमी-जास्त प्रमाणात उघडतात. त्यामुळे त्या वितरिकेवरील चालू असलेल्या पाण्याचा विसर्ग कमी जास्त होऊन ‘टेल टू हेड’ सिंचनावर विपरीत परिणाम होतो व त्यामुळे त्या वितरिकावरील पिकांना संचलनाप्रमाणे पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे प्रस्तावित पाणी पाळी कालावधीत वाढ होते.
पुर्णा मध्यम प्रकल्पांतर्गत रब्बी हंगाम 2025-26 संभाव्य पाणी पाळी नियोजन
कालव्यात पाणी सोडण्याचा कालावधी दि. 15 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर 2025 (10 दिवस) तर कालवा बंद कालावधी 25 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2025 राहील. दि. 2 डिसेंबर 2025 ते 11 डिसेंबर 2025 कालव्यात (10 दिवस) पाणी सोडण्यात येईल तर दि. 12 ते 18 डिसेंबर 2025 कालवा बंद राहील. दि. 19 डिसेंबर ते दि. 28 डिसेंबर 2025 (10 दिवस) पाणी सोडण्यात येईल तर दि. 29 डिसेंबर 2025 ते 4 जानेवारी 2026 कालवा बंद राहील. दि. 5 जानेवारी ते दि. 14 जानेवारी 2026 (10 दिवस) पाणी सोडण्यात येईल तर दि. 15 ते दि. 21 जानेवारी 2026 कालवा बंद राहील. दि. 22 ते 31 जानेवारी 2026 (10 दिवस) पाणी सोडण्यात येईल. तर 1 ते 7 फेब्रुवारी 2026 कालवा बंद राहील. दि. 8 ते 17 फेब्रुवारी 2026 (10 दिवस) पाणी सोडण्यात येईल तर दि. 18 ते 24 फेब्रुवारी 2026 कालवा बंद राहील. दि. 25 मार्च ते 3 एप्रिल 2026 (10) पाणी सोडण्यात येईल तर कालवा पुर्णत: बंद राहील. कालव्यात एकूण 70 दिवस पाणी सोडण्यात येईल.
जर लाभधारकांनी संचलन कार्यक्रमाप्रमाणे टेल टू हेड रात्रंदिवस शेजपाळीपध्दतीने पिकांना पाणी घेतले तर संभाव्य पाणीपाळीचा कालावधी कमी होवून पाण्याचा अधिकाधिक लाभ होईल. संपूर्ण प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात शेतकऱ्यांनी कोठेही दारे स्वतः उघडून टेल टू हेड सिंचन प्रकारात अडथळा आणल्यास पाण्याचा नाश तर होतोच शिवाय पाणीपाळी कालावधी वाढतो. उर्ध्व वर्धा प्रकल्पांतर्गत असलेल्या लाभधारकांनी या बाबत योग्य ते सहकार्य करावे, असे आवाहन मध्यम व लघु पाटबंधारे विभागामार्फत करण्यात आले आहे.
000000
चारगड लघु प्रकल्प ‘उर्ध्व वर्धा’तून रब्बी सिंचनासाठी सात पाणीपाळ्या प्रस्तावित
शेतक-यांना अर्ज करण्याचे आवाहन
अमरावती, दि. 15 (जिमाका): उर्ध्व वर्धा प्रकल्पातून रब्बी हंगामासाठी पाणीसाठा उपलब्ध असून सात पाणी पाळ्या देण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी लाभक्षेत्रातील शेतकरी बांधवांनी 10 नोव्हेंबरपूर्वी संबंधित शाखा कार्यालयास अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
उजवा मुख्य कालव्याच्या आरंभापासून 0 किमीपर्यंत व डावा मुख्य कालव्याच्या 3.48 किमीपर्यंतच्या लाभक्षेत्रातील सर्व वितरिका, जलाशयावरील अधिसूचित नदीनाल्यांवरील लाभधारकांना रब्बी हंगामासाठी पाणी देण्यात येईल. वितरण व्यवस्थेद्वारे जिथे सुलभपणे पाणी जाऊ शकते तिथपर्यंत कालवा संचलन कार्यक्रमानुसार ‘पुच्छ भागाकडून ते मुखाकडे’ (टेल टु हेड) या तत्त्वानुसार सिंचन होणे आवश्यक आहे.
नोव्हेंबर ते मार्च दरम्यान सात वेळा पाणी मिळेल.
कालव्याचे प्रवाही किंवा कालव्यावरील, नदी-नाल्यांवरील मंजूर उपसा सिंचन योजनांद्वारे सिंचनासाठी पाणी घ्यावयाचे असल्यास पाणी मागणी अर्ज नमुना क्र. 7अ, 7ब कोरे फॅार्म संबंधित शाखा कार्यालयात विनामूल्य उपलब्ध आहेत. ते भरून 10 नोव्हेंबरपर्यंत तिथेच सादर करावेत, असे आवाहन उर्ध्व वर्धा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी केले आहे. रब्बी हंगामात नोव्हेंबर 2025 अखेरपर्यंत या कालावधीत मागणीप्रमाणे पाच पाणी पाळ्या देण्यात येतील.
लाभधारकांनी नियम पाळणे आवश्यक
इच्छुक लाभधारकांनी त्यांच्याकडील थकबाकीची एक तृतीयांश व चालू हंगामाची अग्रिम पाणीपट्टी भरावी. उपसा सिंचन लाभधारकांनी नळमार्गावर पाणी मोजमाप यंत्र बसवावे. पिकांचे मागणी क्षेत्र 20 आर या पटीत असावे. पाणी अर्ज मंजूर करुन घेऊनच उपसा सिंचनासाठी पाणी वापर करावा.
मंजूर क्षेत्रासाठी कालव्याचे पाणी घेण्यात येणारी शेतचारी व विहिरीवरील शेतचारी यात तीन मीटरचे अंतर असावे. पाटबंधारे अधिनियमानुसार प्रवाही सिंचनाच्या मूळ दराच्या 50 टक्के दर लागू असेल.
पाणीपट्टी न भरणा-या लाभधारकास सिंचनासाठी पाणी देणे या कार्यालयावर बंधनकारक राहणार नाही. व त्यांचा पाणीपुरवठा केव्हाही बंद करण्यात येईल व थकबाकीवर शासन निर्णय नियमानुसार द.सा.द.शे. 10 टक्के दरान विलंब आकारण्यात येईल.
शेतचारा स्वच्छ ठेवा
कालव्याचे पाणी शेतात नेण्यासाठी असलेली शेतचारी स्वच्छ व व्यवस्थित ठेवण्याची जबाबदारी लाभधारकांची आहे. शेतचारी स्वच्छतेअभावी पाणी पुरवठ्यामध्ये व्यत्यय आल्यास हे कार्यालय जबाबदार राहणार नाही. उडाफ्याचे क्षेत्रास पाणीपुरवठा करण्यात येणार नाही व तसेच लाभधारकांनी मंजूर क्षेत्राचे मर्यादेपर्यंत कालवा व नदी-नाल्याच्या पाण्याचा वापर करावा. मंजूरीपेक्षा जादा क्षेत्र भिजविल्यास व अनधिकृतपणे पाणी घेतल्यास नियमाप्रमाणे पंचनामा करुन दंडनीय आकारणी करण्यात येईल. मंजूर न केलेल्या क्षेत्रास पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी या कार्यालयावर राहणार नाही.
लाभधारकाने दिवस व रात्री पाणी घेणे बंधनकारक आहे. अडचणी असल्यास कोणत्याही प्रकारची आगाऊ सूचना न देता पाणी पाळी पत्रकात बदल करण्याचे अधिकार कार्यकारी अभियंता यांना राहतील.
थकबाकीदार लाभधारक व थकबाकीदार पाणीवापर संस्थांना पाणी देणे बंधनकारक राहणार नाही. वितरिका पाणी पाळीमध्ये पाणी चालू असताना लाभधारक वितरिकेचा दरवाजा वेळी-अवेळी कमी-जास्त प्रमाणात उघडतात. त्यामुळे त्या वितरिकेवरील चालू असलेल्या पाण्याचा विसर्ग कमी जास्त होऊन ‘टेल टू हेड’ सिंचनावर विपरीत परिणाम होतो व त्यामुळे त्या वितरिकावरील पिकांना संचलनाप्रमाणे पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे प्रस्तावित पाणी पाळी कालावधीत वाढ होते.
चारगड लघु प्रकल्पांतर्गत रब्बी हंगाम 2025-26 संभाव्य पाणी पाळी नियोजन
कालव्यात पाणी सोडण्याचा कालावधी दि. 15 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर 2025 (10 दिवस) तर कालवा बंद कालावधी 25 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2025 राहील. दि. 2 डिसेंबर 2025 ते 11 डिसेंबर 2025 कालव्यात (10 दिवस) पाणी सोडण्यात येईल तर दि. 12 ते 18 डिसेंबर 2025 कालवा बंद राहील. दि. 19 डिसेंबर ते दि. 28 डिसेंबर 2025 (10 दिवस) पाणी सोडण्यात येईल तर दि. 29 डिसेंबर 2025 ते 4 जानेवारी 2026 कालवा बंद राहील. दि. 5 जानेवारी ते दि. 14 जानेवारी 2026 (10 दिवस) पाणी सोडण्यात येईल तर दि. 15 ते दि. 21 जानेवारी 2026 कालवा बंद राहील. दि. 22 ते 31 जानेवारी 2026 (10 दिवस) पाणी सोडण्यात येईल. तर 1 ते 7 फेब्रुवारी 2026 कालवा बंद राहील. दि. 8 ते 17 फेब्रुवारी 2026 (10 दिवस) पाणी सोडण्यात येईल तर दि. 18 ते 24 फेब्रुवारी 2026 कालवा बंद राहील. दि. 25 मार्च ते 3 एप्रिल 2026 (10 दिवस ) पाणी सोडण्यात येईल तर कालवा पुर्णत: बंद राहील. कालव्यात एकूण 70 दिवस पाणी सोडण्यात येईल.
जर लाभधारकांनी संचलन कार्यक्रमाप्रमाणे टेल टू हेड रात्रंदिवस शेजपाळीपध्दतीने पिकांना पाणी घेतले तर संभाव्य पाणीपाळीचा कालावधी कमी होवून पाण्याचा अधिकाधिक लाभ होईल. संपूर्ण प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात शेतकऱ्यांनी कोठेही दारे स्वतः उघडून टेल टू हेड सिंचन प्रकारात अडथळा आणल्यास पाण्याचा नाश तर होतोच शिवाय पाणीपाळी कालावधी वाढतो. उर्ध्व वर्धा प्रकल्पांतर्गत असलेल्या लाभधारकांनी या बाबत योग्य ते सहकार्य करावे, असे आवाहन मध्यम व लघु पाटबंधारे विभागामार्फत करण्यात आले आहे.
000000
शासकीय विभागीय ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा
अमरावती, दि. 15 (जिमाका): वाचन प्रेरणा व संस्कृतीचा विकास ही एक सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. ज्ञानसंपन्न व माहिती समृध्द समाज घडविण्यासाठी वाचन संस्कृतीचा प्रचार, प्रसार व विकास होणे आवश्यक आहे. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या स्मृती सार्थ रितीने जतन करुन त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी आणि विदयार्थ्यांमध्ये व समाजाच्या इतर घटकांना वाचनांची आवड व प्रेरणा निर्माण करणे व वाचनाचे महत्त्व जाणून घेणे यासाठी दरवर्षी भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दूल कलाम यांचा (15ऑक्टोंबर) हा जन्मदिवस ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा करण्यात येत असतो.
त्यानिमीत्याने विविध साहित्यकृती, ग्रंथांचे प्रदर्शन शासकीय विभागीय ग्रंथालय व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांच्या हस्ते या ग्रंथ प्रदर्शनाचेउद्घाटन करण्यात आले.
तहसीलदार विजय लोखंडे, सहाय्यक ग्रंथालय संचालक डॉ. राजेश पाटील, जिल्हा ग्रंथालय अधिकारी डॉ. सुरज मडावी तसेच ग्रंथालय कर्मचारी, विदयार्थी व वाचक वर्ग उपस्थित होते.
श्री. अनिल भटकर यांनी भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवनावर प्रकाश टाकून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. श्री. विजय लोखंडे . यांनी . मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. राजेश पाटील यांनी तर आभार डॉ. सूरज मडावी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता ग्रंथालयाचे कर्मचारी गजानन कुरवाडे, दीपक गेडाम, अजय इंगळे, शेषराव भिरडे, राजाराम देवकर, श्री. वानखेडे, श्री. मिश्रा, योगेश घवडे इत्यादी कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
00000
रा. सू. गवई स्मारक उद्घाटनासाठी सज्ज
*अमरावतीत उभे राहिले भव्य स्मारक
*जिल्हाधिकाऱ्यांकडून कामाचा आढावा
अमरावती, दि. 15 (जिमाका) : रा. सू. उपाख्य दादासाहेब गवई यांच्या स्मारकाचे काम गतीने पूर्ण करण्यात आले आहे. दादासाहेबांचा पुतळा, संग्रहालय आणि सभागृहाचे काम पूर्णत्वास आले असून हे भव्य स्मारक उद्घाटनासाठी सज्ज झाले आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी आज स्मारकस्थळी भेट देऊन सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. तसेच स्मारकाबाबत महत्वपूर्ण सुचना केल्या.
दादासाहेब गवई यांच्या स्मारकाचे उद्घाटन दि. 30 ऑक्टोबर रोजी नियोजित आहे. उद्घाटनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे हा कार्यक्रम भव्यदिव्य होणार आहे.
उद्घाटनाच्या अनुषंगाने सर्व परवानगी आणि ना-हरकत प्रमाणपत्र घेण्यात आले आहेत. तसेच उद्घाटन कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. स्मारक ठिकाणी वीज, पाणी आणि स्वच्छतेची कामे प्राधान्याने करण्यात आली आहेत. याबाबींचा सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. वीज वितरण सुरळीत सुरू राहावी, पाण्याचा पुरवठा व्यवस्थित राहावा, तसेच स्वच्छतेसाठी मनुष्यबळ नेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी केल्या.
यावेळी जिल्हाधिकारी यांनी घेतलेल्या बैठकीत देण्यात आलेल्या सुचनांचा आढावा घेण्यात आला. वीज जोडणी आणि त्याचे देयक, पाणी पुरवठा योग्य दाबाने होण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती घेण्यात आली. स्मारकाचे योग्य देखभाल होण्यासाठी याठिकाणी तीन व्यक्तींची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यांच्याकडून इमारत आणि परिसराची देखभाल करण्यात येणार आहे. तसेच त्यांच्याकडून दादासाहेब गवई यांच्याबद्दल माहिती देण्यात येईल. महापालिकेने दोन पाळीमध्ये चार सुरक्षा रक्षक नेमण्याच्या सुचना यावेळी देण्यात आल्या.
उद्घाटन समारंभाला महत्वाच्या व्यक्ती उपस्थित राहणार असल्याने याठिकाणी सुरक्षा व्यवस्थेचे नियोजन करावे. तसेच नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याने त्यांच्यासाठी वाहनतळाची सुविधा करावी. कार्यक्रमाला न्यायिक अधिकारी उपस्थित राहणार असल्याने त्यांच्यासाठी वाहनतळाची स्वतंत्र व्यवस्था करण्याच्या सुचना पोलिस विभागाला यावेळी देण्यात आल्या. दादासाहेब गवई यांचा जीवनपट येथे येणाऱ्या नागरिकांना कळावा, यासाठी चित्रफिती तयार करण्यात याव्यात. तसेच त्यांच्या उपयोगातील वस्तू याठिकाणी ठेवण्यात याव्यात, अशा सूचना करण्यात आल्या.
भेटी दरम्यान निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, मुख्य अभियंता गिरीश जोशी, कार्यकारी अभियंता प्रतिक गिरी, पोलिस उपायुक्त गणेश शिंदे आदी अधिकारी उपस्थित होते.