अल्प मुदतीच्या अभ्यासक्रमाचे उद्घाटन
अमरावती, दि. 9 (जिमाका) : संत गाडगेबाबा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भगिनी निवेदिता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची) अमरावती आणि दादासाहेब खापर्डे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था रहाटगाव यांच्या वतीने संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात अल्प मुदतीच्या अभ्यासक्रमाचे उद्घाटन पार पडले.
यावेळी खासदार बळवंत वानखडे, विश्वकर्मा लाभार्थी गजानन चिंचोळकर, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालयाचे उपसंचालक अनंत सोमकुवर, संत गाडगेबाबा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे उपसंचालक सुधा ठोंबरे, उपप्राचार्य संजय बोरकर, अंकुश वाशिमकर, मनीषा गुढे, श्रीमती मेंढे, भगिनी निवेदिता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची) येथील प्राचार्य राजेश शेळके, कौशल्य, रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभागाच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर, प्राचार्य संजय बोरोडे, वैभव भगत, दादासाहेब खापर्डे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था रहाटगावचे कार्यकारी प्राचार्य सदानंद गावंडे, एस. एल. खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था बडनेराचे श्री. दहीकर उपस्थित होते.
खासदार श्री. वानखडे यांनी विद्यार्थ्यांनी कर्तृत्वाने, तसेच अपार मेहनत घेऊन स्पर्धेच्या युगात कायमपणे टिकून राहण्याबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी शिक्षण व प्रशिक्षणात मेहनत घ्यावी. याचा फायदा रोजगार व स्वयंरोजगार म्हणून होणार असल्याचे सांगितले. अल्प मुदतीचे अभ्यासक्रम काळाची गरज आहे, यात सहभागी व्हावे, असे आवाहन केले.
श्री. चिंचोलकर यांनी पंतप्रधान विश्वकर्मा योजना, प्रशिक्षण, बँकेतून मिळालेला कर्ज पुरवठा आणि स्वयंरोजगारातील प्रगतीची माहिती दिली. श्रीमती बारस्कर यांनी विद्यार्थ्यांची निकड ओळखून प्रशिक्षण देणे, तसेच अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमाबाबत मार्गदर्शन केले. गजानन कोरे यांनी स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन केले.
त्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आभासी पद्धतीने राज्यात कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अल्प मुदतीच्या अभ्यासक्रमाचे उद्घाटन केले.
अनंत सोमकुवर यांनी प्रास्ताविक केले. प्रकाश गंडोधर यांनी सूत्रसंचालन केले. संजय बोरोडे यांनी आभार मानले.
00000
रायगड नदी प्रकल्प ‘उर्ध्व वर्धा’तून रब्बी सिंचनासाठी पाच पाणीपाळ्या प्रस्तावित
शेतक-यांना अर्ज करण्याचे आवाहन
अमरावती, दि. 09 (जिमाका): उर्ध्व वर्धा प्रकल्पातून रब्बी हंगामासाठी पाणीसाठा उपलब्ध असून पाच पाणी पाळ्या देण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी लाभक्षेत्रातील शेतकरी बांधवांनी 10 नोव्हेंबरपूर्वी संबंधित शाखा कार्यालयास अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
उजवा मुख्य कालव्याच्या आरंभापासून 14.34 किमीपर्यंत व डावा मुख्य कालव्याच्या 22.44 किमीपर्यंतच्या लाभक्षेत्रातील सर्व वितरिका, जलाशयावरील अधिसूचित नदीनाल्यांवरील लाभधारकांना रब्बी हंगामासाठी पाणी देण्यात येईल. वितरण व्यवस्थेद्वारे जिथे सुलभपणे पाणी जाऊ शकते तिथपर्यंत कालवा संचलन कार्यक्रमानुसार ‘पुच्छ भागाकडून ते मुखाकडे’ (टेल टु हेड) या तत्त्वानुसार सिंचन होणे आवश्यक आहे.
नोव्हेंबर ते मार्च दरम्यान पाच वेळा पाणी मिळेल.
कालव्याचे प्रवाही किंवा कालव्यावरील, नदी-नाल्यांवरील मंजूर उपसा सिंचन योजनांद्वारे सिंचनासाठी पाणी घ्यावयाचे असल्यास पाणी मागणी अर्ज नमुना क्र. 7अ, 7ब कोरे फॅार्म संबंधित शाखा कार्यालयात विनामूल्य उपलब्ध आहेत. ते भरून 10 नोव्हेंबरपर्यंत तिथेच सादर करावेत, असे आवाहन उर्ध्व वर्धा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी केले आहे. रब्बी हंगामात नोव्हेंबर 2025 अखेरपर्यंत या कालावधीत मागणीप्रमाणे पाच पाणी पाळ्या देण्यात येतील.
लाभधारकांनी नियम पाळणे आवश्यक
इच्छुक लाभधारकांनी त्यांच्याकडील थकबाकीची एक तृतीयांश व चालू हंगामाची अग्रिम पाणीपट्टी भरावी. उपसा सिंचन लाभधारकांनी नळमार्गावर पाणी मोजमाप यंत्र बसवावे. पिकांचे मागणी क्षेत्र 20 आर या पटीत असावे. पाणी अर्ज मंजूर करुन घेऊनच उपसा सिंचनासाठी पाणी वापर करावा.
मंजूर क्षेत्रासाठी कालव्याचे पाणी घेण्यात येणारी शेतचारी व विहिरीवरील शेतचारी यात तीन मीटरचे अंतर असावे. पाटबंधारे अधिनियमानुसार प्रवाही सिंचनाच्या मूळ दराच्या 50 टक्के दर लागू असेल.
पाणीपट्टी न भरणा-या लाभधारकास सिंचनासाठी पाणी देणे या कार्यालयावर बंधनकारक राहणार नाही. व त्यांचा पाणीपुरवठा केव्हाही बंद करण्यात येईल व थकबाकीवर शासन निर्णय नियमानुसार द.सा.द.शे. 10 टक्के दरान विलंब आकारण्यात येईल.
शेतचारा स्वच्छ ठेवा
कालव्याचे पाणी शेतात नेण्यासाठी असलेली शेतचारी स्वच्छ व व्यवस्थित ठेवण्याची जबाबदारी लाभधारकांची आहे. शेतचारी स्वच्छतेअभावी पाणी पुरवठ्यामध्
लाभधारकाने दिवस व रात्री पाणी घेणे बंधनकारक आहे. अडचणी असल्यास कोणत्याही प्रकारची आगाऊ सूचना न देता पाणी पाळी पत्रकात बदल करण्याचे अधिकार कार्यकारी अभियंता यांना राहतील.
थकबाकीदार लाभधारक व थकबाकीदार पाणीवापर संस्थांना पाणी देणे बंधनकारक राहणार नाही. वितरिका पाणी पाळीमध्ये पाणी चा
रायगड नदी प्रकल्पांतर्गत रब्बी हंगाम 2025-26 संभाव्य पाणी पाळी नियोजन
कालव्यात पाणी सोडण्याचा कालावधी दि. 15 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर 2025 (15 दिवस) तर कालवा बंद कालावधी 30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2025 राहील. दि. 7 डिसेंबर 2025 ते 21 डिसेंबर 2025 कालव्यात (15 दिवस) पाणी सोडण्यात येईल तर दि. 22 ते 28 डिसेंबर 2025 कालवा बंद राहील. दि. 29 डिसेंबर ते दि. 12 जानेवारी 2025 (15 दिवस) पाणी सोडण्यात येईल तर दि. 13 जानेवारी ते 19 जानेवारी 2026 कालवा बंद राहील. दि. 20 जानेवारी ते दि. 3 फेब्रुवारी 2026 (15 दिवस) पाणी सोडण्यात येईल तर दि. 4 ते दि. 10 फेब्रुवारी 2026 कालवा बंद राहील. दि. 11 ते 25 फेब्रुवारी 2026 (15 दिवस) पाणी सोडण्यात येईल. तर 26 फेब्रुवारी ते 4 मार्च 2026 कालवा बंद राहील. कालव्यात एकूण 75 दिवस पाणी सोडण्यात येईल.
जर लाभधारकांनी संचलन कार्यक्रमाप्रमाणे टेल टू हेड रात्रंदिवस शेजपाळीपध्दतीने पिकांना पाणी घेतले तर संभाव्य पाणीपाळीचा कालावधी कमी होवून पाण्याचा अधिकाधिक लाभ होईल. संपूर्ण प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात शेतकऱ्यांनी कोठेही दारे स्वतः उघडून टेल टू हेड सिंचन प्रकारात अडथळा आणल्यास पाण्याचा नाश तर होतोच शिवाय पाणीपाळी कालावधी वाढतो. उर्ध्व वर्धा प्रकल्पांतर्गत असलेल्या लाभधारकांनी या बाबत योग्य ते सहकार्य करावे, असे आवाहन उर्ध्व वर्धा पाटबंधारे विभागामार्फत करण्यात आले आहे.
000000
‘उर्ध्व वर्धा’तून रब्बी सिंचनासाठी पाच पाणीपाळ्या प्रस्तावित
शेतक-यांना अर्ज करण्याचे आवाहन
अमरावती, दि. 09 (जिमाका): उर्ध्व वर्धा प्रकल्पातून रब्बी हंगामासाठी पाणीसाठा उपलब्ध असून पाच पाणी पाळ्या देण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी लाभक्षेत्रातील शेतकरी बांधवांनी 10 नोव्हेंबरपूर्वी संबंधित शाखा कार्यालयास अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
उजवा मुख्य कालव्याच्या आरंभापासून 14.34 किमीपर्यंत व डावा मुख्य कालव्याच्या 22.44 किमीपर्यंतच्या लाभक्षेत्रातील सर्व वितरिका, जलाशयावरील अधिसूचित नदीनाल्यांवरील लाभधारकांना रब्बी हंगामासाठी पाणी देण्यात येईल. वितरण व्यवस्थेद्वारे जिथे सुलभपणे पाणी जाऊ शकते तिथपर्यंत कालवा संचलन कार्यक्रमानुसार ‘पुच्छ भागाकडून ते मुखाकडे’ (टेल टु हेड) या तत्त्वानुसार सिंचन होणे आवश्यक आहे.
नोव्हेंबर ते मार्च दरम्यान पाच वेळा पाणी मिळेल.
कालव्याचे प्रवाही किंवा कालव्यावरील, नदी-नाल्यांवरील मंजूर उपसा सिंचन योजनांद्वारे सिंचनासाठी पाणी घ्यावयाचे असल्यास पाणी मागणी अर्ज नमुना क्र. 7अ, 7ब कोरे फॅार्म संबंधित शाखा कार्यालयात विनामूल्य उपलब्ध आहेत. ते भरून 10 नोव्हेंबरपर्यंत तिथेच सादर करावेत, असे आवाहन उर्ध्व वर्धा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी केले आहे. रब्बी हंगामात नोव्हेंबर 2025 अखेरपर्यंत या कालावधीत मागणीप्रमाणे पाच पाणी पाळ्या देण्यात येतील.
लाभधारकांनी नियम पाळणे आवश्यक
इच्छुक लाभधारकांनी त्यांच्याकडील थकबाकीची एक तृतीयांश व चालू हंगामाची अग्रिम पाणीपट्टी भरावी. उपसा सिंचन लाभधारकांनी नळमार्गावर पाणी मोजमाप यंत्र बसवावे. पिकांचे मागणी क्षेत्र 20 आर या पटीत असावे. पाणी अर्ज मंजूर करुन घेऊनच उपसा सिंचनासाठी पाणी वापर करावा.
मंजूर क्षेत्रासाठी कालव्याचे पाणी घेण्यात येणारी शेतचारी व विहिरीवरील शेतचारी यात तीन मीटरचे अंतर असावे. पाटबंधारे अधिनियमानुसार प्रवाही सिंचनाच्या मूळ दराच्या 50 टक्के दर लागू असेल.
पाणीपट्टी न भरणा-या लाभधारकास सिंचनासाठी पाणी देणे या कार्यालयावर बंधनकारक राहणार नाही. व त्यांचा पाणीपुरवठा केव्हाही बंद करण्यात येईल व थकबाकीवर शासन निर्णय नियमानुसार द.सा.द.शे. 10 टक्के दरान विलंब आकारण्यात येईल.
शेतचारा स्वच्छ ठेवा
कालव्याचे पाणी शेतात नेण्यासाठी असलेली शेतचारी स्वच्छ व व्यवस्थित ठेवण्याची जबाबदारी लाभधारकांची आहे. शेतचारी स्वच्छतेअभावी पाणी पुरवठ्यामध्
लाभधारकाने दिवस व रात्री पाणी घेणे बंधनकारक आहे. अडचणी असल्यास कोणत्याही प्रकारची आगाऊ सूचना न देता पाणी पाळी पत्रकात बदल करण्याचे अधिकार कार्यकारी अभियंता यांना राहतील.
थकबाकीदार लाभधारक व थकबाकीदार पाणीवापर संस्थांना पाणी देणे बंधनकारक राहणार नाही. वितरिका पाणी पाळीमध्ये पाणी चा
रब्बी हंगाम 2025-26 संभाव्य पाणी पाळी नियोजन
कालव्यात पाणी सोडण्याचा कालावधी दि. 15 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर 2025 (22 दिवस) तर कालवा बंद कालावधी 6 डिसेंबर ते 12 डिसेंबर 2026 राहील. दि. 13 डिसेंबर 2025 ते 3 जानेवारी 2026 कालव्यात (22 दिवस) पाणी सोडण्यात येईल तर दि. 4 ते 10 जानेवारी 2026 कालवा बंद राहील. दि. 11 ते दि. 27 जानेवारी 2026 (17 दिवस) पाणी सोडण्यात येईल तर दि. 28 जानेवारी ते 3 फेब्रुवारी 2026 कालवा बंद राहील. दि. 4 ते दि. 20 फेब्रुवारी 2026 (17 दिवस) पाणी सोडण्यात येईल तर दि. 21 ते दि. 27 फेब्रुवारी 2026 कालवा बंद राहील. दि. 28 जानेवारी ते 15 मार्च 2026 (16 दिवस) पाणी सोडण्यात येईल. तर नंतर कालवा पुर्णत: बंद राहील. कालव्यात एकूण 94 दिवस पाणी सोडण्यात येईल.
जर लाभधारकांनी संचलन कार्यक्रमाप्रमाणे टेल टू हेड रात्रंदिवस शेजपाळीपध्दतीने पिकांना पाणी घेतले तर संभाव्य पाणीपाळीचा कालावधी कमी होवून पाण्याचा अधिकाधिक लाभ होईल. संपूर्ण प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात शेतकऱ्यांनी कोठेही दारे स्वतः उघडून टेल टू हेड सिंचन प्रकारात अडथळा आणल्यास पाण्याचा नाश तर होतोच शिवाय पाणीपाळी कालावधी वाढतो. उर्ध्व वर्धा प्रकल्पांतर्गत असलेल्या लाभधारकांनी या बाबत योग्य ते सहकार्य करावे, असे आवाहन उर्ध्व वर्धा पाटबंधारे विभागामार्फत करण्यात आले आहे.
000000
भातकुलीमध्ये प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध;
14 ऑक्टोबरपर्यंत हरकती दाखल करण्याची मुदत
अमरावती, दि. 09 (जिमाका): राज्य निवडणूक आयोगाने अमरावती जिल्ह्यातील जिल्हा परिषद (जि.प.) आणि पंचायत समिती (पं.स.) सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार भातकुली तालुक्यातील मतदारांसाठी महत्त्वाची सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार, जि.प. आणि पं.स. निवडणुकीसाठी गट निहाय तयार करण्यात आलेल्या प्रारूप मतदार याद्या दिनांक 8 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत.
या ठिकाणी यादी उपलब्ध: भातकुली तालुक्यातील नागरिक आणि संबंधितांना ही यादी तहसील कार्यालय, भातकुली आणि पंचायत समिती कार्यालय, भातकुली येथे अवलोकनासाठी उपलब्ध आहे.
या प्रारूप मतदार यादीवर ज्या कोणाला हरकती किंवा सूचना दाखल करायच्या असतील, त्यांच्यासाठी 14 ऑक्टोबर 2025 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. इच्छुक नागरिकांनी आपल्या हरकती लेखी स्वरूपात तहसील कार्यालय, भातकुली येथे मुदतीपूर्वी सादर कराव्यात.
प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांचा विचार केल्यानंतर, मतदान केंद्रांची आणि मतदान केंद्रनिहाय अंतिम मतदार यादी 27 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे, अशी माहिती भातकुली तहसिलदार यांनी दिली आहे.
000000
पंचायत समितीस्तरावर सोमवारी आरक्षण सोडत
अमरावती, दि. 09 (जिमाका) : राज्य निवडणूक आयोगाने पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूकीकरीता सदस्यांचे आरक्षण निश्चित करण्याबाबत कार्यक्रम जाहिर केला आहे. त्यानुसार सोमवार, दि. 13 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजता भातकुली पंचायत समितीसाठी तहसिल कार्यालय, भातकुली जैन येथे आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या जागांच्या आरक्षणाची पद्धत व चक्रानुक्रम नियम, 2025 नुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रात सभा घेऊन अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व त्यामधील स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा आणि सर्व साधारण स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा निश्चित करावयाच्या आहेत. त्यासाठी सोडत पद्धतीने कार्यवाही करण्यासाठी विशेष सभा आयोजित केली आहे. यावेळी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
0000
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा शनिवारी
दौरा
अमरावती, दि.
9 (जिमाका): केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे शनिवार, दि.
11 ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील चांदूर बाजार आणि गुरुकुंज मोझरी दौऱ्यावर येत आहे.
दौऱ्यानुसार,
केंद्रीय मंत्री श्री. गडकरी हे दुपारी 12.50 वाजता श्री क्षेत्र माधान, ता. चांदूर
बाजार येथे 'सक्षम' आणि श्री संत गुलाबराव महाराज संस्थानतर्फे आयोजित दिव्यांग व्यक्तींच्या
सत्कार समारंभास उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी 3.50 वाजता अखिल भारतीय श्री गुरूदेव
सेवा मंडळातर्फे आयोजित गुरूकुंज मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या
57 व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहतील. कार्यक्रमानंतर
सायंकाळी 5.15 वाजता हेलिकॉप्टरने नागपूरकडे प्रस्थान करतील.
00000
No comments:
Post a Comment