जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी जाहीर; हरकतींसाठी 14 ऑक्टोबरपर्यंत मुदत
मुदतीत हरकती दाखल करण्याचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचे आवाहन
अमरावती, दि. 08 (जिमाका): स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांकरीता राज्य निवडणूक आयोगाने दि 1 जुलै 2025 रोजी अस्तित्वात असलेली महाराष्ट्र विधानसभेची मतदार यादी जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी वापरण्याबाबत अधिसूचित करून मतदार यादी विभाजनाचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार, निवडणूक विभाग व निर्वाचक गण निहाय प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्याची तारीख आज, 8 ऑक्टोबर 2025 असून, प्रारुप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी आजपासून दि. 14 ऑक्टोबर 2025 पर्यंत निश्चित करण्यात आला आहे. निवडणूक विभाग व निर्वाचक गण निहाय मतदार याद्या अंतिम व अधिप्रमाणित करून प्रसिध्द करण्याची तारीख 27 ऑक्टोबर 2025 असून, त्याच दिवशी मतदान केंद्राची व मतदान केंद्र निहाय यादी प्रसिध्द केली जाईल. या कार्यक्रमानुसार, निवडणुक विभाग व निर्वाचक गण निहाय प्रारुप मतदार यादीची हार्ड कॉपी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, तहसिलदार कार्यालय, पंचायत समिती, ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी, तसेच पीडीएफ कॉपी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालयातील संकेत स्थळ इत्यादी ठिकाणी प्रसिध्द करण्यात आली आहे.
निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय तयार करण्यात आलेल्या प्रारुप मतदार यादीवर मतदार, नागरिकांना काही हरकती घ्यावयाच्या असतील, त्या त्यांना त्यांच्या खालील बाबीवरील हरकती किंवा सूचना संबंधित तहसिलदार यांचेकडे दि. 14 ऑक्टोबर 2025 पर्यंत पुराव्यासह दाखल करता येतील. यामध्ये लेखकांच्या चुका, दुसऱ्या गटात, गणात चुकून अंतर्भूत झालेले मतदार, विधानसभा यादीत नाव असूनही संबंधित गण, विभाग यादीत नाव समाविष्ट करण्याचे राहून गेलेले मतदार तसेच दुबार मतदार म्हणून नोंद झाल्यास त्यांना कोणत्या गटात मतदान करायचे आहे यासंबंधीच्या हरकतींचा समावेश आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये मतदाराचे नाव मतदार यादी मध्ये नाही अशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त होऊ नये, यासाठी सर्व मतदार व राजकीय पक्ष यांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.
000000
15 ऑक्टोबरपासून कापूस खरेदी केंद्र सुरू
*कपास किसान ॲपवर नोंदणी आवश्यक
अमरावती, दि. 8 (जिमाका) : यावर्षीच्या हंगामात भारत कापूस महामंडळाकडून कापूस खरेदी होणार आहे. यासाठी जिल्ह्यात 14 केंद्र दि. 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. किमान आधारभूत दराने कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांना कपास किसान ॲपवर नोंदणी करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना 31 ऑक्टोबरपर्यंत या ॲपवर नोंदणी करता येणार आहे.
यावर्षीच्या हंगामात किमान आधारभूत किंमतीत भारत कापूस महामंडळाकडून खरेदी करण्यासाठी कपास किसान मोबाईल ॲपवर नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी 31 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना कापूस खरेदीसाठी वेळ आणि तारीख निश्चित केली जाणार आहे. निश्चित केलेल्या वेळेत कापसाची खरेदी होणार आहे. हे ॲप शेतकऱ्यांना त्यांच्या सोयीनुसार सात दिवसांच्या रोलींग आधारावर स्लॉट बुकींग करण्याची सुविधा देणार आहे. या डिजीटल उपक्रमामुळे शेतकऱ्यांना त्यांचे उत्पादन कोणत्याही अडचणीशिवाय विकण्याची सुविधा निर्माण झाली आहे.
कापूस महामंडळात नोंदणी करतेवेळी शेतकऱ्यांच्या मोबाईलवर येणाऱ्या ओटीपीची आवश्यकता राहणार आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आपला मोबाईल आधार कार्डशी लिंक केल्याची खात्री करावी किंवा जो मोबाईल नंबर आधीच आधार कार्ड सोबत लिंक आहे तोच द्यावा. कापूस विक्री अगोदर शेतकऱ्यांना कपास किसान अॅपमध्ये आपल्या आधारकार्डची प्रत, सातबारा, आठ अ सोबत फोटोसह कपास किसान अॅपमध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर कापूस विक्रीसाठी स्लॉट बुकींग करून कापूस विक्रीसाठी आणता येणार आहे.
महामंडळातर्फे शेतकऱ्यांकडून थेट कापूस खरेदी केली जाणार आहे. कापूसाची रक्कम फक्त शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात जमा केली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस विक्री करण्यापूर्वी त्यांचे बचत खाते त्यांच्या आधार कार्डशी लिंक केल्याची खात्री करावी.
कपास किसान ॲप आणि कापूस विक्री दरम्यान कोणत्याही अडचणीसाठी हेल्पलाईन क्रमांक जाहिर करण्यात आले आहे. या क्रमांकावर शेतकरी आणि केंद्रचालक समस्यांचे निराकरण करू शकतील. शेतकऱ्यांनी 8897181111, 8897281111, 8897381111, 8897481111, 8897581111, 8897681111, 8897781111 या हेल्पलाईनवर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
बन्नी, ब्रम्हा यासाठी निश्चित केलेल्या मापदंडानुसार 8 हजार 110 रूपये, बन्नी, ब्रम्हा स्पेशलसाठी 8 हजार 60 रूपये, एच-4 साठी 8 हजार 10 रूपये आधारभूत किंमत जाहिर करण्यात आली आहे. हे किमान आधारभूत दर 8 टक्के आर्द्रता असलेल्या कापूसासाठी लागू आहेत. कापसाच्या विक्रीसाठी कपाशीची कमाल आर्द्रता केवळ 12 टक्के पर्यंतच स्वीकार्य आहे. जर कापसाची आर्द्रता 8 टक्क्यापेक्षा जास्त असेल, तर प्रत्येक 1 टक्के आर्द्रता वाढली तर किमान आधारभूत किंमत नियमानुसार 1 टक्क्यानी कमी केली जाणार आहे.
बन्नी ब्रह्मा आणि एच-4 या जातींसाठी, जर मायक्रोनेअर मूल्य मायक्रोनेअर मूल्य श्रेणीच्या बाहेर असल्यास त्यानंतर प्रत्येक 0.2 मायक्रोनेअर मूल्यासाठी, नियमानुसार किमान आधारभूत किंमतीतून अनुक्रमे 25 रूपये प्रति क्विंटलप्रमाणे कमी केले जाणार आहे. महामंडळ निकृष्ट दर्जाचा, विरंगित कापूस, पावसात, पाण्यात भिजलेला कापूस खरेदी करणार नाही. महामंडळ केवळ बाजार समित्यांद्वारे पडताळणी केलेल्या शेतकऱ्यांकडूनच कापूस खरेदी करणार आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी महामंडळाला कापूस विकण्यापूर्वी बाजार समित्यांच्या अधिकाऱ्यांकडून त्यांची पडताळणी अवश्य करून घ्यावी, असे आवाहन भारतीय कापूस महामंडळाने केले आहे.
000000
वैद्यकीय प्रशासन अधिकारी कार्यालयातर्फे रक्तदान शिबिरअमरावती, दि. 8 (जिमाका): ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ या महत्त्वाकांक्षी अभियानांतर्गत, तसेच राष्ट्रीय स्वैच्छिक रक्तदान दिवसाचे औचित्य साधून वैद्यकीय प्रशासन अधिकारी कार्यालय यांच्या वतीने जिल्हा सामान्य रूग्णालय, अमरावती येथे नुकतेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
रक्तदान या सामाजिक कार्यात सहभाग घेत सेवा दवाखाना अमरावती, नांदगाव पेठ आणि वैद्यकीय प्रशासन अधिकारी कार्यालय येथे 15 रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले.
वैद्यकीय प्रशासन अधिकारी डॉ. उज्ज्वला माळवे, प्रशासन अधिकारी डॉ. राजनारायण गोमासे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजित कावरे, डॉ. हेमांगी शेरेकर, जिल्हा सामान्य रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. आकाश वाघमारे, डॉ. विनिता आसवानी, जनसंपर्क अधिकारी मिलिंद तायडे, परिचारिका श्रीमती मुळे, यांच्यासह जिल्हा सामान्य रूग्णालय रक्तपेढीची चमू उपस्थित होती. 'एक रक्ताचा थेंब कुणाच्या आयुष्यात नवीन सुर्योदय आणू शकतो' या संदेशासह उपस्थितांना रक्तदानाची प्रतिज्ञा देऊन शिबिराची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमाचे संचालन आणि आभार परिचारिका स्नेहा बारसागडे यांनी मानले.
00000
राष्ट्रीय परदेश शिष्यवृत्तीसाठी 24 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
अमरावती, दि. 08 (जिमाका): केंद्र सरकार पुरस्कृत नॅशनल ओव्हरसीज स्कॉलरशीप या परदेश शिष्यवृत्ती योजनेकरिता सन 2025-26 या वर्षासाठी अर्ज करण्याची दुसऱ्या फेरीची प्रक्रिया सुरू झाली आहे. सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, नवी दिल्ली यांच्याकडून अर्ज मागविण्यात आले असून, पात्र विद्यार्थी,लाभार्थी यांनी 24 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त राजेंद्र व्ही. जाधवर यांनी केले आहे.
नॅशनल ओव्हरसीज स्कॉलरशीप ही शिष्यवृत्ती योजना अनुसूचित जाती, विमुक्त, भटक्या, अर्धभटक्या जमाती आणि भूमिहीन शेतमजूर, पारंपरिक कारागीर यांसारख्या कमी उत्पन्न गटातील विद्यार्थ्यांना परदेशात मास्टर्स (पदव्युत्तर) किंवा पीएच.डी. चे उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक साहाय्य करते. केंद्र शासनाच्या www.nosmsje.gov.in या
0000000
No comments:
Post a Comment