Sunday, October 12, 2025

DIO NEWS AMRAVATI 12-10-2025

 


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा

अमरावती, १२ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सोमवार दि. १३ ऑक्टोबर रोजी जिल्ह्याचा दौरा आहे.

दौऱ्यानुसार मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे सोमवार, १३ ऑक्टोबर रोजी सकाळी 11.45 वाजता अमरावती विमानतळ येथे आगमन होईल. त्यानंतर दुपारी बारा वाजता प्रो. राम मेघे इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी अँन्ड रिसर्च सेंटर येथे आयोजित भारतीय जनता पार्टी पश्चिम विदर्भ बैठकीला उपस्थित राहतील.  बैठकीनंतर दुपारी ३.४५ वाजता विमानाने नागपूरकडे प्रयाण करतील.

००००००





पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा दौरा

 

अमरावती, १२ : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा सोमवार दि. १३ ऑक्टोबर रोजी जिल्ह्याच्या दौरा आहे.

दौऱ्यानुसार श्री. बावनकुळे सोमवार, १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३० वाजता प्रो. राम मेघे इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी अँन्ड रिसर्च सेंटर येथे आयोजित भारतीय जनता पार्टी पश्चिम विदर्भ बैठकीला उपस्थित राहतील. त्यानंतर सोईनुसार नागपूरकडे प्रयाण करतील.

00000




 

कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांचा दौरा

 

अमरावती, १२ : कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांचा सोमवार दि. १३ ऑक्टोबर रोजी जिल्ह्याच्या दौरा आहे.

दौऱ्यानुसार ॲड. फुंडकर सोमवार, १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३० वाजता प्रो. राम मेघे इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी अँन्ड रिसर्च सेंटर येथे आयोजित भारतीय जनता पार्टी पश्चिम विदर्भ बैठकीला उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी सोईनुसार खामगाव, जि. बुलढाणा कडे प्रयाण करतील.

००००००

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 17-10-2025

                                                        जिल्हा महिला लोकशाही दिन येत्या सोमवारी अमरावती, दि. 17 (जिमाका) : जिल्हा महिला लोकश...