मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आगमन
अमरावती, दि. 13 (जिमाका) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज दुपारी 12 वाजता अमरावती विमानतळ येथे आगमन झाले. त्यांच्यासमवेत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे होते.
मुख्ममंत्री श्री. फडणवीस यांचे आगमन झाल्यानंतर विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल, विशेष पोलिस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, मनपा आयुक्त सौम्या शर्मा, पोलिस आयुक्त अरविंद चावरीया, जिल्हा पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर मुख्यमंत्री नियोजित कार्यक्रमासाठी रवाना झाले.
00000
पुरग्रस्तांना मदतीचे तीन ट्रक रवाना
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हिरवी झेंडी
अमरावती, दि. 13 (जिमाका) : राज्यातील अतिवृष्टी झालेल्या भागात मदत म्हणून पी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे जीवनावश्यक साहित्य रवाना करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साहित्याच्या तीन ट्रकला हिरवी झेंडी दाखविली.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आज अमरावती येथून माजी मंत्री प्रवीण पोटे पाटील यांच्या 'पी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुप'तर्फे अतिवृष्टीग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तूंचे सहाय्य घेऊन जाणाऱ्या तीन ट्रकला झेंडी दाखवून रवाना केले. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार रविंद्र चव्हाण, प्रविण तायडे, राजेश वानखेडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. यापूर्वीही प्रवीण पोटे पाटील यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये 25 लाख रुपयांचा निधी दिला आहे. तसेच मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा यांच्यावतीने दिवाळीनिमित्त नागरिकांना देण्यात येणारा शिधाचे वाटप केले.
00000
No comments:
Post a Comment