निमकुंडसह मेळघाटातील सर्व आदिवासी कुटुंबापर्यंत क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१व्या जयंती निमित्त राबविण्यात येत असलेल्या सेवा सप्ताहात केंद्र व राज्य शासनाच्या सर्व योजनांचा लाभ पोचविण्यात येणार आहे.निमकुंड गावासाठी ३.४४ कोटी खर्चातून पिण्याच्या पाण्याच्या योजनेला मंजुरी देण्यात येईल व ५० लाखांच्या निधीतून या गावात विविध विकास कामे राबविण्यात येतील असे प्रतिपादन महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे केले.
या गावातील अशोक चिताराम आठवले यांच्या घरी पालकमंत्र्यांनी दिवाळीचा फराळ केला व शेतकऱ्यांसोबतच शासन आदिवासींच्या पाठीशीही खंबीरपणे उभे असल्याचा संदेश त्यांनी दिला.
No comments:
Post a Comment