Friday, September 26, 2025

DIO NEWS AMRAVATI 26-09-2025

                                                        ग्रामीण भागात  कलम 37(1) व (3) लागू

          अमरावती, दि. 26 (जिमाका) :  जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलीस अधीक्षक (ग्रामीण), अमरावती  यांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.

 

            सदर प्रतिबंधात्मक आदेश जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, याकरिता पोलिस आयुक्तालय परिक्षेत्र वगळून अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागात लागू करण्यात आला असून दि. 6 ऑक्टोबर 2025 च्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील. या कलमाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरूध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे अपर जिल्हादंडाधिकारी  अनिल भटकर  यांनी कळविले आहे.

0000

शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू, ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन

अमरावती, दि. 26 (जिमाका): जिल्ह्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विजाभज, इतर मागास वर्ग आणि आर्थिक मागास प्रवर्गातील उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय विभागांतर्गत कार्यरत असलेल्या मागासवर्गीय मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहांमध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. या वसतिगृहांमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांना सर्व सोयी-सुविधा मोफत पुरविण्यात येतात. शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी ज्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी  https://hmas.mahait.org या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

चालू शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी अभ्यासक्रमात शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरणे बंधनकारक आहे. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर, तो पोर्टलवरून डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून संबंधित वसतिगृहात ऑफलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

अमरावती जिल्ह्यातील वसतिगृहे अमरावती स्थानिक वसतिगृहांमध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी विभागीयस्तरावरील मागासवर्गीय 1 हजार मुलांसाठी शासकीय वसतिगृह संत गाडगे महाराज मुलांचे शासकीय वसतिगृह, निंभोरा तसेच मुलींसाठी 125 जयंती मागासवर्गीय मुलींचे नवीन विलास नगर, अमरावती तसेच तालुका स्तरावरील मुला, मुलींचे शासकीय वसतिगृह ऑनलाईन व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज संबंधित वसतिगृहाकडे सादर करावे, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त राजेंद्र जाधवर यांनी केले आहे. व्यावसायिक अभ्यासक्रम, अर्ज स्विकृतीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2025, तर प्रवेशाची यादी प्रसिध्द करावयाची तारीख 4 ऑक्टोबर 2025 राहील. तसेच अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्रमांक 0721-2661261 हा आहे.

000000

शहरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

अमरावती, दि. 26 (जिमाका) : शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी अमरावती शहर पोलीस आयुक्त यांनी महाराष्ट्र पोलिस कायद्याचे कलम 37 (1) व (3) नुसार प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

प्रतिबंधात्मक आदेश पोलिस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रात लागू करण्यात आला आहे. हा आदेश दि. 29 सप्टेंबर ते दि. 13 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहणार आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असे पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी कळविले आहे.

000000

 

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 17-10-2025

                                                        जिल्हा महिला लोकशाही दिन येत्या सोमवारी अमरावती, दि. 17 (जिमाका) : जिल्हा महिला लोकश...