सेवा पंधरवड्यात भटके, विमुक्तांना लाभाचे वाटप
अमरावती, दि. 30 (जिमाका) : सेवा पंधरवड्यानिमित्त महसूल विभागातर्फे महाराजस्व अभियानातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. यात अमरावती तहसिल कार्यालयातर्फे भटके, विमुक्त जातीच्या नागरिकांना विविध लाभाचे वाटप करण्यात आले.
तहसिल कार्यालयातील कार्यक्रमाला आमदार रवि राणा, राजेश वानखडे, उपविभागीय अधिकारी अनिल भटकर, तहसिलदार विजय लोखंडे आदी उपस्थित होते.
श्री. राणा यांनी या उपक्रमामुळे नागरिकांना तातडीने सोयीसुविधा उपलब्ध होत आहेत. घरकुल, पट्टेवाटप यामुळे समाजातील शेवटच्या घटकांना न्याय मिळणार आहे. प्रशासनाच्या या उपक्रमामुळे वंचित घटकांना आधार मिळेल. गावठाणातील घरांसाठी गावाची हद्द वाढविण्याची सूचना आली आहे. त्यामुळे वाढीव गावाला मान्यता मिळणार आहे. येत्या काळात राज्यात सर्वाधिक पट्टे वाटप अमरावतीमध्ये व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच पावसामुळे शेतपिकांचे नुकसान झाले आहे. याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे दिवाळीच्या आत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
श्री. वानखडे यांनी वंचित घटकांना सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाचा नागरिकांनी लाभ घ्यावा. प्रत्येकाला घर मिळाल्यास कुटुंबाची स्थायी व्यवस्था होणार आहे. एका ठिकाणी भटक्या, विमुक्त जाती स्थायी झाल्यास त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळण्यास मदत होणार असल्याचे सांगितले.
श्री. भटकर यांनी प्रास्ताविक केले. निरीक्षण अधिकारी चैताली यादव यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी पट्टेवाटप, कृषि निविष्ठा, तसेच विविध प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
000000
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात
ज्येष्ठ नागरिकांसाठी आज मोफत आरोग्य तपासणी
अमरावती, दि. 30 (जिमाका): सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत , उद्या, 1 ऑक्टोबर 2025 रोजी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य तपासणी शिबिराचे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, पोलिस आयुक्तालयाच्या मागे, चांदूर रेल्वे रोड, अमरावती येथे आयोजन करण्यात आले आहे.
या आरोग्य तपासणी शिबीरासाठी जिल्हा शल्य चिकित्सक रूग्णालय, अमरावती यांच्या वैद्यकीय चमू मार्फत नेत्ररोगतज्ज्ञ, दंतरोगतज्ज्ञ, अस्थीरोगतज्ज्ञ, त्वचारोगतज्ज्ञ, मेडिसिन, बी. पी. मधुमेह इत्यादी तपासणी करण्यात येणार आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणाऱ्या बिगर सरकारी संस्थांचा सत्कार, गौरव, आरोग्य शिबिर, चर्चासत्र, परिसंवाद या सारख्या विविध कार्यक्रमांचे आयोजन समाज कल्याणच्या वतीने करण्यात येत आहे. तसेच या कार्यक्रमांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी कायदे व योजनाविषयक बाबींची माहिती, वृध्दांचे हक्क, ज्येष्ठ नागरिकांना देणात येणाऱ्या सोयी-सुविधा, इत्यादीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमांसाठी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे.
तरी या शिबिराचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्य तपासणी शिबिर, स्थळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सीपी ऑफीसच्या मागे, चांदूर रेल्वे रोड, अमरावती येथे उद्या, दि. 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता उपस्थित राहून आपली वैद्यकीय तपासणी करून घ्यावी, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त राजेंद्र जाधवर यांनी केले आहे.
000000
नैसर्गिक आपत्ती मदतीतून कर्जवसुली करू नका!
बँकांना जिल्हा प्रशासनाचे स्पष्ट निर्देश
अमरावती, दि. 30 (जिमाका): जिल्ह्यांमध्ये गारपीट आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिके व इतर नुकसानीपोटी राज्य शासनाकडून बाधितांना देण्यात आलेल्या मदतीमधून कोणत्याही कर्ज खात्यात वसुली करण्यात येऊ नये, असे स्पष्ट आवाहन जिल्हा प्रशासनाने सर्व बँकांना केले आहे.
शासनाकडून वेळोवेळी आदेश निर्गमित करून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट मदत जमा केली जाते. मात्र, काही बँकांकडून शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जाची रक्कम या मदतीच्या रकमेतून परस्पर वसूल केल्याचे निदर्शनास आले आहे.
या गंभीर बाबीची नोंद घेत, गारपीट व अवेळी पावसामुळे शेतीपिकांचे व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी वाटप केलेल्या मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करताना, मदतीच्या रकमेमधून कोणत्याही प्रकारची वसुली बँकांनी शेतकऱ्यांच्या कुठल्याही कर्ज खात्यामध्ये करू नये, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिले आहे. या संदर्भात कोणत्याही अडचणी किंवा तक्रारी असल्यास, 9923844044 किंवा 9970
0000000
राजा राममोहन रॉय ग्रंथभेट योजना: निवडलेल्या ग्रंथांवरील
हरकतींसाठी 15 ऑक्टोबरपर्यंत मुदत
अमरावती, दि. 30 (जिमाका): राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त निधीतून राबविण्यात येणाऱ्या 50 व्या ग्रंथभेट योजनेंतर्गत निवड झालेल्या 1 हजार 388 ग्रंथांची यादी ग्रंथालय संचालनालयाने प्रसिद्ध केली आहे. सन 2023 मध्ये प्रकाशित व संचालनालयास प्राप्त झालेल्या ग्रंथांपैकी राज्य ग्रंथालय नियोजन समितीच्या उपसमितीने ही निवड केली आहे. यामध्ये मराठी (749), हिंदी (297) आणि इंग्रजी (342) ग्रंथांचा समावेश आहे. ही यादी ग्रंथालय संचालनालयाच्या www.dol.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर 15 ऑक्टोबर 2025 या कालावधीत अवलोकनार्थ खुली ठेवण्यात आली आहे. या ग्रंथयादीतील ग्रंथ किमान 25 टक्के सूटदराने वितरित करणे बंधनकारक आहे. या यादीतील कोणत्याही ग्रंथाबाबत सूचना, हरकती किंवा आक्षेप असल्यास, ते दि. 15 ऑक्टोबर 2025 पर्यंत ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, नगर भवन, मुंबई- ४०० ००१ यांच्याकडे लेखी स्वरुपात कार्यालयीन वेळेत हस्तबटवड्याने वा पोस्टाने अथवा उपरोक्त नमूद केलेल्या ई-मेलवर पाठवावेत. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या सूचनांचा, हरकतींचा किंवा आक्षेपांचा विचार केला जाणार नाही. यादीत ग्रंथांचे नाव, लेखक, प्रकाशक व किंमत यामध्ये काही बदल असल्याचे निदर्शनास आणून दिल्यास स्वागतार्ह असेल, असे आवाहन प्र. ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी केले आहे.
00000
अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून उद्योजकांना
व्याज परताव्यासोबतच मिळणार व्यवसाय प्रशिक्षण
अमरावती, दि. 30 (जिमाका): आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या तरुणांना सक्षम उद्योजक बनवण्यासाठी कार्यरत असलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळने आता केवळ बँक कर्जावरील व्याज परतावा योजनाच नाही, तर लाभार्थ्यांना त्यांच्या व्यवसायासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण व मेंटॉरशिप देखील देण्यात येणार आहे. हा निर्णय तरुण उद्योजकांना आर्थिक मदतीसह त्यांना व्यवसाय यशस्वीपणे चालवण्यासाठी आवश्यक ज्ञान आणि कौशल्ये मिळवून देण्याच्या उद्देशाने घेण्यात आला असल्याची माहिती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांनी दिली आहे.
महामंडळाच्या वतीने त्वरीत कार्यवाही सुरु करुन, 'उद्योग-सारथी' प्रशिक्षण नुकतेच ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. या वेबिनारमध्ये राज्यभरातील इच्छुक लाभार्थ्यांनी सहभाग घेतला. पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय या महत्त्वपूर्ण विषयावर पुणे कृषी विद्यालयाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ माने यांनी मार्गदर्शन केले. हे वेबिनार युट्यूब समवेत फेसबुकवर देखील लाईव्ह स्वरुपात दाखविण्यात आले होते. यावेळी डॉ. माने यांनी दुग्धव्यवसायात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेल्या अनेक बाबींवर प्रकाश टाकला. यामध्ये उत्तम जातीच्या जनावरांची निवड (उदा. गीर, साहिवाल, जर्सी), जनावरांच्या आरोग्यासाठी आणि दूध उत्पादन वाढवण्यासाठी संतुलित आहार (हिरवा व सुका चारा, आवश्यक खनिज मिश्रणे), तसेच जनावरांना होणारे आजार, प्रतिबंधात्मक उपाययोजना, वेळोवेळी लसीकरण आणि स्वच्छतेचे नियम याबद्दल सखोल माहिती दिली.
000000
शिक्षकांनी वेळेत अर्ज दाखल करावेत - जिल्हाधिकारी आशिष येरेकर
*शिक्षक मतदारसंघाच्या मतदारयाद्यांचा कार्यक्रम जाहीर
अमरावती, दि. 30 (जिमाका) : अमरावती विभागातील शिक्षक विधानपरिषद मतदारसंघाच्या मतदारयाद्या तयार करण्याचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. दिनांक 1 नोव्हेंबर 2025 या अर्हता दिनांकावर आधारित नव्याने याद्या तयार करण्यात येणार आहे. सर्व पात्र शिक्षकांनी वेळेत अर्ज दाखल करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा सहायक मतदान नोंदणी अधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.
मतदार नोंदणी कार्यक्रमामध्ये दि. 30 सप्टेंबर रोजी जाहीर सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. दि. ६ नोव्हेंबरपर्यंत नमुना १९ द्वारे दावे स्वीकारण्यात येणार आहे. दि. 20 नोव्हेंबर रोजी प्रारूप मतदार याद्यांची छपाई करण्यात येणार आहे. दि. 25 नोव्हेंबर रोजी प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी केली जाईल. यावरील दावे व हरकती दि. 25 नोव्हेंबर 2025 ते दि. 10 डिसेंबर या कालावधीत स्वीकारण्यात येतील. दि. 25 डिसेंबर रोजी दावे व हरकती निकाली काढणे आणि पुरवणी यादी तयार करण्यात येणार आहे. दि. 30 डिसेंबर रोजी मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी करण्यात येणार आहे.
लोकप्रतिनिधित्त्व अधिनियम 1950 च्या अधिनियम 27 (3) (ब) नुसार राज्य शासनाने निवडणूक आयोगाच्या मान्यतेने निश्चित केलेल्या माध्यमिक शाळेपेक्षा कमी दर्जा नसलेल्या शैक्षणिक संस्थांमध्ये अर्हता दिनांकाच्या पूर्वीच्या लगतच्या 6 वर्षांमध्ये किमान 3 वर्ष पूर्णवेळ शिक्षक म्हणून कार्यरत असलेले शिक्षक मतदार म्हणून नोंदणीस पात्र आहेत. यासाठी पात्र शिक्षकांना सुधारीत नमुना क्रमांक 19 मध्ये आवश्यक रहिवासाचा पुरावा व प्रमाणपत्रांसह अर्ज सादर करता येईल.
शिक्षक मतदारसंघासाठी मतदारयादी नव्याने तयार करण्यात येणार आहे. यासाठी पूर्वी नोंदणी केलेली असली तरी यावेळी नव्याने नोंदणी करावी लागणार आहे. या नोंदणीसाठी अर्ज पदनिर्देशित अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयामध्ये सादर करता येतील. एकगठ्ठा अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत, पात्र शैक्षणिक संस्थेचे प्रमुख त्यांच्या संस्थेतील सर्व पात्र कर्मचाऱ्यांचे अर्ज एकत्रित पाठवू शकतील.
निवडणुकीसाठी मतदार नोंदणी अधिकारी म्हणून विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल, सहायक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी आशिष येरेकर आणि जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी कार्यरत राहणार आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व तहसीलदार पदनिर्देशित अधिकारी राहणार आहेत. अमरावती विभाग शिक्षक विधानपरिषद मतदारसंघासाठी पात्र शिक्षकांनी नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी केले आहे.
00000
महाराष्ट्र 1 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने: अमरावतीतील उद्योजकांना
'मैत्री' पोर्टलचा लाभ घेण्याचे आवाहन
अमरावती, दि. 30 (जिमाका): महाराष्ट्र राज्याची अर्थव्यवस्था सन 2027 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचविण्याचे महाराष्ट्र शासनाचे ध्येय आहे. या ध्येयपूर्तीसाठी आणि राज्यात उद्योग स्थापन करण्यासाठी उद्योग, व्यापार व सेवा क्षेत्रातील गुंतवणूकदारांना सर्व आवश्यक परवाने, मंजुरी, ना-हरकती, सवलती व तक्रार निवारण या सेवांचा वेगवान, पारदर्शक आणि सुलभपणे लाभ एकाच ठिकाणी देण्यासाठी एक खिडकी प्रणाली म्हणून उद्योग विभागांतर्गत 'मैत्री' कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. जिल्ह्यामध्ये सध्या सुक्ष्म, लघु व मध्यम उपक्रमाअंतर्गत एकूण 1 लाख 6 हजार 390 उद्योग (1, लाख 5 हजार 540 सूक्ष्म, 807 लघु व 43 मध्यम) नोंदणीकृत आहेत. या उद्योजकांना लाभ व्हावा यासाठी मैत्री 2.0 पोर्टलवर 14 विभागांच्या 124 सेवा एकत्रित करून उपलब्ध करून दिलेल्या आहेत. यात एक खिडकी अर्ज प्रणाली (https://maitri.maharashtra.
000000
जिल्हा लोकशाही दिन येत्या सोमवारी
अमरावती, दि. 30 (जिमाका) : जिल्हा लोकशाही दिन सोमवार, दि
00000
No comments:
Post a Comment