Saturday, October 10, 2026

दुष्काळाची तीव्रता लक्षात घेऊन राज्यातील आणखी १८ तालुक्यांमध्ये प्रत्यक्ष पाहणी प्रमुख पाच पिकांच्या २० टक्के क्षेत्राचे सर्वेक्षण करून वस्तुनिष्ठ मूल्यांकनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न #दुष्काळ #शेतकरी #FarmerWelfare #MahaDGIPR


 दुष्काळाची तीव्रता लक्षात घेऊन राज्यातील आणखी १८ तालुक्यांमध्ये प्रत्यक्ष पाहणी

प्रमुख पाच पिकांच्या २० टक्के क्षेत्राचे सर्वेक्षण करून वस्तुनिष्ठ मूल्यांकनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न

राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे अधिक अचूक आणि वस्तुनिष्ठ मूल्यमापन करण्यासाठी शासनाने आणखी १८ तालुक्यांमध्ये दुष्काळाच्या तीव्रतेची प्रत्यक्ष पडताळणी (ग्राऊंड ट्रुथिंग) करण्यास मान्यता


 राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे अधिक अचूक आणि वस्तुनिष्ठ मूल्यमापन करण्यासाठी शासनाने आणखी १८ तालुक्यांमध्ये दुष्काळाच्या तीव्रतेची प्रत्यक्ष पडताळणी (ग्राऊंड ट्रुथिंग) करण्यास मान्यता दिली आहे. या तालुक्यांतील प्रमुख पाच पिकांचे २० टक्के सर्वेक्षण करण्यात येणार असून, उपग्रह छायाचित्रे व संगणकीय माहितीची प्रत्यक्ष क्षेत्रीय परिस्थितीशी पडताळणी केली जाणार आहे. यामुळे दुष्काळाच्या तीव्रतेचे वास्तव चित्र स्पष्ट होण्यास मदत होणार आहे.

मंत्रिमंडळ उपसमितीच्या २९ सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या बैठकीतील निर्देशांनुसार जून ते सप्टेंबर २०२६ या कालावधीतील पर्जन्याची तूट आणि अन्य घटकांचा विचार करून आणखी १८ तालुक्यांमध्ये प्रत्यक्ष पाहणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये नांदेड-: मुदखेड, मुखेड, चंद्रपूर-: जिवती, ब्रह्मपुरी, बल्लारपूर, गोंदिया-: आमगाव, देवरी, सालेकसा, गोंदिया, वर्धा-: कारंजा, भंडारा-: मोहाडी, तुमसर, नाशिक-: त्र्यंबकेश्वर, चांदवड, निफाड, सातारा-: पाटण, सांगली-: शिराळा, वाळवा या तालुक्यांचा समावेश आहे. मदत व पुनर्वसन विभागाने याबाबत शासन निर्णय जारी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाने दुष्काळी परिस्थितीचे अचूक मूल्यमापन करून शेतकऱ्यांना आवश्यक मदत व सवलती उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. खरीप हंगाम २०२६ मधील परिस्थितीच्या आधारे २५ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यातील २६५ तालुक्यांत ट्रिगर-१ निकषांनुसार दुष्काळ जाहीर करून विविध १२ उपाययोजना व सवलती लागू करण्यात आल्या आहेत. शासन निर्णय : gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Go #दुष्काळ #शेतकरी #FarmerWelfare

#सोलापूर: केंद्र सरकारच्या केंद्रीय आंतरमंत्रालयीन पथकाने सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून पीक नुकसान,पिण्याच्या पाण्याची टंचाई,भूजल पातळी,जनावरांसाठी चारा व पाण्याची उपलब्धता तसेच रब्बी हंगामाच्या शक्यतांचा आढावा घेतला. #दुष्काळ #शेतकरी




#सोलापूर: केंद्र सरकारच्या केंद्रीय आंतरमंत्रालयीन पथकाने सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून पीक नुकसान,पिण्याच्या पाण्याची टंचाई,भूजल पातळी,जनावरांसाठी चारा व पाण्याची उपलब्धता तसेच रब्बी हंगामाच्या शक्यतांचा आढावा घेतला. #दुष्काळ #शेतकरी

 

जिल्ह्यात सन २०२६ च्या खरीप हंगामात झालेल्या अल्प पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सोयाबीन आणि आगामी तूर पिकाचे कुटार, भुसा, वैरण आता केवळ जनावरांच्या चाऱ्यासाठी शंभर टक्के आरक्षित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


 जिल्ह्यात सन २०२६ च्या खरीप हंगामात झालेल्या अल्प पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सोयाबीन आणि आगामी तूर पिकाचे कुटार, भुसा, वैरण आता केवळ जनावरांच्या चाऱ्यासाठी शंभर टक्के आरक्षित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

#अमरावती_विभाग_शिक्षक_मतदारसंघ_निवडणूक मतदान करण्यासंबंधी सूचना



 #अमरावती_विभाग_शिक्षक_मतदारसंघ_निवडणूक

मतदान करण्यासंबंधी सूचना 👇

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी अमरावती विभागातील ८१ मतदान केंद्रांना निवडणूक आयोगाची मान्यता

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी अमरावती विभागातील ८१ मतदान केंद्रांना निवडणूक आयोगाची मान्यता 

अमरावती दि. १० - महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक-२०२६ अंतर्गत अमरावती विभाग मतदारसंघातील अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम आणि बुलढाणा या ५ जिल्ह्याच्या क्षेत्रात एकुण ८१ मतदान केंद्र स्थापन करण्याच्या प्रस्तावास भारत निवडणूक आयोगाने मान्यता प्रदान केली आहे, अशी माहिती अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त श्रीमती नयना गुंडे यांनी दिली.

महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीकरीता पाठविण्यात आलेल्या ८१ मतदान केंद्रांच्या प्रस्तावास भारत निवडणूक आयोगाने मान्यता प्रदान केली असल्याचे उप सचिव व सह मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई यांनी एका पत्राद्वारे विभागीय आयुक्त यांना काल कळविले आहे.

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातील जिल्हानिहाय मतदान केंद्रांची संख्या अनुक्रमे पुढील प्रमाणे आहे. अमरावती- २५, अकोला- १३, बुलढाणा- १८, वाशिम- ७, यवतमाळ- १८ अशा एकुण ८१ मतदान केंद्रांना मान्यता मिळाली आहे. येत्या २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत अमरावती विभागातील या मतदान केंद्रांवर निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.

---000---


 

राज्यात लवकरच सुरु होणाऱ्या वॉटर कप अभियानाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंधारणविषयक कामाच्या अनुषंगाने बैठक


 

📍वर्षा निवासस्थान, मुंबई
राज्यात लवकरच सुरु होणाऱ्या वॉटर कप अभियानाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंधारणविषयक कामाच्या अनुषंगाने बैठक घेतली. राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने, नियोजनबद्ध आणि गतिमान पद्धतीने काम करावे. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेला प्राधान्य देऊन पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब अडविण्यासाठी जलसंधारणाची कामे प्रभावीपणे राबवावीत. पानी फाउंडेशनसह विविध स्वयंसेवी संस्थांच्या कामांना प्रशासकीय यंत्रणेने सक्रिय सहकार्य करून या मोहिमेला गती देण्याचे निर्देश त्यांनी दिले.
दुष्काळाच्या आव्हानावर मात करण्यासाठी सर्व विभागांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे. अडचणीच्या काळात समर्पित भावनेने जलसंधारणाच्या कामांसाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. या बैठकीत निश्चित झालेल्या संकल्पनांच्या आधारे एकात्मिक कार्ययोजना तयार करावी. तिच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सक्षम प्रशासकीय यंत्रणा उभारण्याबरोबरच कामांच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठी तंत्रज्ञानाधारित संनियंत्रण प्रणाली विकसित करावी. विविध विभागांच्या कामांचे एकत्रीकरण करून परस्पर समन्वयातून अंमलबजावणी करावी. ही कामे केवळ कागदावरील नियोजनापुरती मर्यादित न राहता प्रत्यक्षात परिणामकारकपणे पूर्ण व्हावीत. पहिला #पाऊस पडताच #पाणी अडविण्यासाठी जलसंधारणाच्या संरचना सज्ज असतील आणि त्यातून भूजलपातळीत वाढ होण्यास मदत होईल, असे नियोजन व अंमलबजावणी करावी. या प्रयत्नांतून गावांना दुष्काळमुक्त करण्याच्या दिशेने ठोस पावले टाकता येतील आणि जनतेला मोठा दिलासा मिळेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
०००
जानेवारी ते मे या कालावधीत शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण व जनजागृती उपक्रम राबवून पावसाळ्यापूर्वी जलसंधारणाच्या कामांना गती देण्यात येईल. यंदाचे वर्ष आव्हानात्मक असले, तरी निराशेचे रूपांतर आशेत करून जनतेमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करणे आवश्यक आहे. राज्यातील प्रत्येक गावातील प्रत्येक घराने जलसंवर्धनाच्या कार्यात सहभागी व्हावे - अभिनेते आमिर खान, पाणी फाउंडेशन
०००
या बैठकीस नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, ए.टी.ई. चंद्रा फाउंडेशनचे अमित चंद्रा, पानी फाउंडेशनचे सत्यजित भटकळ, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव पराग जैन-नैनुटीया, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्र, प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी, मृद व जलसंधारण विभागाचे सचिव जितेंद्र पापळकर, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले आदी उपस्थित होते. पशुसंवर्धन विभागाचे सचिव एन. रामास्वामी तसेच राज्यातील सर्व जिल्हाधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

अमरावती ग्रामीण पोलीस चे #CyberAwarenessCampign विशेष जनजागृती अभियान. सार्वजनिक वायफाय वरील सायबर हल्ले समजून घेऊया. #सेवासंकल्पअभियान

  अमरावती ग्रामीण पोलीस चे #CyberAwarenessCampign विशेष जनजागृती अभियान. सार्वजनिक वायफाय वरील सायबर हल्ले समजून घेऊया. #सेवासंकल्पअभियान...