Saturday, April 18, 2026

DIO NEWS AMRAVATI 18.04.2026



 बयाण, पुरावे देण्यासाठी पिडीतांनी पुढे यावे

- पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

*परतवाडा प्रकरणी सखोल चौकशी करून गुन्हा सिद्ध करणार

 

अमरावती, दि. 18 : परतवाडा येथील एका युवकाने असंख्य महिलांशी गैरवर्तन करून त्याचे व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित केले आहे. याबाबत पोलिसांनी पुढाकार घेऊन गुन्हा नोंदवला आहे. यामध्ये पिडितांनी बयाण आणि पुरावे देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी आज जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयाला भेट देऊन याप्रकरणी सविस्तर माहिती जाणून घेतली. यावेळी पोलीस आयुक्त राकेश ओला, जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी याप्रकरणी अद्यापपर्यंत आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून सात मोबाईल, एक टॅब, लॅपटॉप, हार्ड डिस्क ताब्यात घेतली आहे. याची फॉरेन्सिक तपासणीसाठी करण्यात येत आहे. याप्रकरणी आरोपींनी सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल केली आहेत. त्‍यांचे प्रसारण थांबवण्यासाठी पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे.

याप्रकरणी एक पंधरा वर्षीय पिडीत मुलगी बयाण देण्यासाठी पुढे आले आहे. याबाबत योग्य ती कारवाई करण्यात येत आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस आणि विशेष तपास पथक काळजीपूर्वक तपास करीत आहे. याबाबत जिल्हा आणि राज्यस्तरावर दैनंदिन आढावा घेण्यात येत आहे. पोलिसांनीही गुन्ह्याचे सर्व पैलू तपासून यातील आरोपीविरुद्ध सबळ पुरावे गोळा करीत आहे. आरोपींना शिक्षा होईल यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.

परतवाडा येथील प्रकरणी माध्यमांमध्ये विविध वृत्त येत आहेत. त्यामुळे याप्रकरणी पीडित बयाण देण्यासाठी पुढे येण्यास समस्या निर्माण होऊ शकत असल्यामुळे माध्यमांनीही सजगपणे वार्तांकन करावे. तसेच धर्मांमध्ये तेढ निर्माण होऊन सामाजिक सलोखा बिघडू नये, तसेच तपास भरकटू नये यासाठी प्रयत्न करावे. माध्यम प्रतिनिधींकडे याप्रकरणी काही पुरावे असल्यास ते पोलिसांना द्यावे, याप्रकरणी पोलिसांकडून देण्यात येणारी माहिती अधिकृत समजावी, असे श्री. बावनकुळे यांनी सांगितले.

00000

No comments:

Post a Comment

#पुण्यश्लोक_अहिल्यादेवी_होळकर_शेतकरी_कर्जमुक्ती_योजना २०२६

  #पुण्यश्लोक_अहिल्यादेवी_होळकर_शेतकरी_कर्जमुक्ती_योजना २०२६ #शेतकरीकर्जमुक्ती #अहिल्यादेवीहोळकर #कर्जमुक्तीयोजना2026 #FarmerWelfare #...