Wednesday, January 25, 2023

प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण

 






प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण

 

अमरावती, दि. २६ :भारतीय प्रजासत्ताकाच्या ७३ व्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण प्र. जिल्हाधिकारी अविष्यांत पंडा यांच्या हस्ते झाले.

 

यावेळी राष्ट्रगीत व राष्ट्रधवज वंदन झाले. ध्वजारोहणानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संवाद साधून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. अतिरिक्त जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, निवासी उपजिल्हाधिकारी विवेक घोडके, उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, मनिषकुमार गायकवाड, राम लंके, सुभाष दळवी, विधी अधिकारी नरेंद्र बोहरा, जिल्हा खनिकर्म अधिकारी इम्रान शेख, जिल्हा पुरवठा अधिकारी डी. के. वानखडे, तहसीलदार उमेश खोडके, जिल्हा सूचना अधिकारी अरुण रणवीर, जिल्हा नियोजन अधिकारी अभिजित म्हस्के, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर, नायब तहसीलदार श्याम देशमुख, अरविंद माळवे, जिल्हाधिकाऱ्यांचे स्वीय सचिव अमित चेडे, डेव्हिड चव्हाण, अंबादास काकडे, राजीव हाते, किशोर चेडे आदी उपस्थित होते.

 

00000

Tuesday, January 24, 2023

प्रजासत्ताक दिनी वाहतूक व्यवस्थेत बदल नागरिकांनी नोंद घेण्याचे आवाहन

 

प्रजासत्ताक दिनी वाहतूक व्यवस्थेत बदल

नागरिकांनी नोंद घेण्याचे आवाहन

 

अमरावती, दि. 24 : शहरात गुरुवार, दि. 26 जानेवारी 2023 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या 73 वा वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेतील लहान मुले, पालक तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्या वाहनांची रस्त्यावर फार मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. अशावेळी वाहतुकीची कोंडी होवून अपघातासारखा अनुचित प्रकार घडू नये तसेच सार्वजनिक शांतता भंग होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत.

 

   विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून अमरावती शहरातील सर्व हलक्या व जड वाहनांची वाहतुक  नियंत्रित करण्यासाठी पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी मुंबई पोलीस कायदा 1951 चे कलम 33 (1)(ब) तसेच मोटार वाहन कायदा 1988 चे कलम 115 अन्वये आदेश निर्गमित केला आहे. यानुसार ,गुरुवार, दि. 26 जानेवारीच्या रात्री 12 वाजेपर्यंत शहरातील सर्व प्रकारचे मालवाहू हलकी व जड वाहने यांना शहरात सर्व बाजूने प्रवेश बंदीचे आदेश पारित करण्यात आले आहेत.

 

तसेच शहरातील गाडगेनगर समाधीपासून ते शिवाजी शिक्षण संस्था व नेहरु स्टेडिअमकडे येणारा उड्डाणपुल, इर्विन चौक ते राजापेठ पोलीस स्टेशन तसेच कुथे हॉस्पिटल ते नंदा मार्केट आणि कुशल ऑटोकडे जाणाऱ्या उड्डाणपुलावरुन गुरुवार, दि. 26 जानेवारी रोजी सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपावतो आवागमन करणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदीचे आदेश पारित करण्यात आले आहे.

 

                या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द मोटार वाहन कायदा 1988 व मुंबई पोलीस कायदा 1951 नुसार कार्यवाही करण्यात येईल , असे पोलीस उपायुक्त (मुख्यालय) सागर पाटील यांनी कळविले आहे.

00000

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

प्रजासत्ताक दिनी वाहतूक व्यवस्थेत बदल नागरिकांनी नोंद घेण्याचे आवाहन

 प्रजासत्ताक दिनी वाहतूक व्यवस्थेत बदल नागरिकांनी नोंद घेण्याचे आवाहन


अमरावती, दि. 24 : शहरात गुरुवार, दि. 26 जानेवारी 2023 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या 73 वा वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेतील लहान मुले, पालक तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्या वाहनांची रस्त्यावर फार मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. अशावेळी वाहतुकीची कोंडी होवून अपघातासारखा अनुचित प्रकार घडू नये तसेच सार्वजनिक शांतता भंग होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत.

   विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून अमरावती शहरातील सर्व हलक्या व जड वाहनांची वाहतुक  नियंत्रित करण्यासाठी पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी मुंबई पोलीस कायदा 1951 चे कलम 33 (1)(ब) तसेच मोटार वाहन कायदा 1988 चे कलम 115 अन्वये आदेश निर्गमित केला आहे. 

यानुसार ,गुरुवार, दि. 26 जानेवारीच्या रात्री 12 वाजेपर्यंत शहरातील सर्व प्रकारचे मालवाहू हलकी व जड वाहने यांना शहरात सर्व बाजूने प्रवेश बंदीचे आदेश पारित करण्यात आले आहेत. 

तसेच शहरातील गाडगेनगर समाधीपासून ते शिवाजी शिक्षण संस्था व नेहरु स्टेडिअमकडे येणारा उड्डाणपुल, इर्विन चौक ते राजापेठ पोलीस स्टेशन तसेच कुथे हॉस्पिटल ते नंदा मार्केट आणि कुशल ऑटोकडे जाणाऱ्या उड्डाणपुलावरुन गुरुवार, दि. 26 जानेवारी रोजी सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपावतो आवागमन करणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदीचे आदेश पारित करण्यात आले आहे. 

    या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द मोटार वाहन कायदा 1988 व मुंबई पोलीस कायदा 1951 नुसार कार्यवाही करण्यात येईल , असे पोलीस उपायुक्त (मुख्यालय) सागर पाटील यांनी कळविले आहे. 

***

निवडणूक निरीक्षकांकडून निवडणूक पूर्वतयारीचा आढावा







 निवडणूक निरीक्षकांकडून निवडणूक पूर्वतयारीचा आढावा

 

अमरावती, दि. 24 (जिमाका) : पदवीधर मतदारसंघ निवडणूकीच्या अनुषंगाने मतदान व मतमोजणीबाबतच्या पूर्वतयारीचा आढावा  निवडणूक निरीक्षक पंकजकुमार यांनी आज विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत  घेतला.

विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, उपायुक्त संजय पवार, अजय लहाने, गजेंद्र बावणे, विजय भाकरे, सहायक आयुक्त शामकांत म्हस्के, उप जिल्हा निवडणूक अधिकारी नितीन व्यवहारे,  तहसीलदार वैशाली पाथरे, निकिता जावरकर, रवींद्र महाले आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

निरीक्षकांनी मतदान केंद्रावरील व्यवस्था, आदर्श आचारसंहिता कक्षाकडे प्राप्त तक्रारी, माध्यम प्रमाणीकरण कक्ष व संनियंत्रण समितीची कार्यवाही तसेच केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांचे प्रशिक्षण कार्यक्रम आदींचा आढावा घेतला.    

बैठकीत प्रशासनाकडून करण्यात आलेली पूर्वतयारी, नियोजित मतदान केंद्रे, मतदानाचे साहित्य सामग्री, संरक्षण व्यवस्था व बंदोबस्त तसेच मतदान केंद्रावरील आवश्यक मुलभूत सुविधा याबाबत संबंधितांना निर्देश दिले.  आतापर्यंत झालेल्या निवडणूक प्रशिक्षणाबाबतही त्यांनी यावेळी आढावा घेतला.

 

00000

पदवीधर मतदारसंघ निवडणूक मतदारांना यादीत नाव शोधणे अधिक सोपे; ऑनलाईन सुविधा उपलब्ध

 

पदवीधर मतदारसंघ निवडणूक

मतदारांना यादीत नाव शोधणे अधिक सोपे; ऑनलाईन सुविधा उपलब्ध

 

अमरावती, दि. 24 : अमरावती पदवीधर मतदार संघाच्या मतदार यादीत मतदारांना आपले नाव व बूथ क्रमांक शोधणे आता अधिक सुलभ झाले आहे. त्यासाठी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने ऑनलाईन लिंक उपलब्ध करून दिली आहे.

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर ही माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.

https://ceoelection.maharashtra.gov.in/gtsearch/ या लिंकवर क्लिक करून आपले नाव व आडनाव, तसेच जिल्ह्याचे नाव टाकल्यास आपले नाव व मतदानाच्या केंद्राची माहिती तत्काळ मिळते.

 

 अमरावती पदवीधर मतदारसंघात मतदार म्हणून नोंदणी केलेल्या मतदारांनी या लिंकचा वापर करून  आपले नाव कोणत्या मतदान केंद्रावर ( Polling Booth)  आहे याची माहिती करून घ्यावी, तसेच आपले मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.दिलीप पांढरपट्टे यांनी केले आहे.

 

00000

मतदान केंद्राध्यक्ष व अधिकाऱ्यांचे व्दितीय टप्प्यातील प्रशिक्षण पूर्ण

                                         






                             अमरावती पदवीधर मतदार संघ निवडणूक

 

मतदान केंद्राध्यक्ष व अधिकाऱ्यांचे व्दितीय टप्प्यातील प्रशिक्षण पूर्ण

 

* पदवीधर मतदार संघ निवडणूकीसाठी प्रशासन सज्ज

* 340 अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण


अमरावती, दि. 24 : निवडणूक प्रक्रियेत मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी यांची जबादारी महत्त्वपूर्ण असून सर्व प्रक्रिया दक्षतापूर्वक पार पाडावी यासाठी त्यांचे व्दितीय टप्प्यातील प्रशिक्षण नियोजन भवन येथे आज पूर्ण झाले.

अमरावती विभाग पदवीधर मतदार संघ व्दिवार्षिक निवडणूक 2023 कार्यप्रणालीबाबत प्रशिक्षणामध्ये मार्गदर्शन करण्यात आले. अमरावती जिल्ह्यात 75 मतदान केंद्र असून त्यासाठी मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व संबंधितांनाचे 85 चमू तयार करण्यात आले आहेत. त्यातील 10 चमू राखीव ठेवण्यात येणार आहे. मतदान प्रक्रियेमध्ये 340 अधिकारी, कर्मचारी सहभागी आहेत. या सर्वांना व्दितीय टप्प्यातील प्रशिक्षण प्रशिक्षक सहायक आयुक्त (भूसुधार) शामकांत म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले.

उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, मोर्शी उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले, चांदुर रेल्वे उपविभागीय अधिकारी इब्राहीम चौधरी, महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कैलास घोडके, रोहयो उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण सिनारे, पंचायत उपमुख्य कार्यकारी अधिकारी                                 श्री. धायगुडे, दर्यापूर तहसीलदार योगेश देशमुख, तिवसा तहसीलदार वैभव फरताडे, तहसीलदार उमेश खोडके आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

प्रशिक्षणामध्ये मतदानाच्या विविध टप्प्यातील प्रक्रिया पावरपॉईंट प्रात्यक्षिकेव्दारे सादर करण्यात आले. यामध्ये निवडणूकीच्या संदर्भातील वैधानिक तरतूदी, केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांची कर्तव्ये, मतदार यादी व मतपत्रिकेची तपासणी, मतदार केंद्र उभारणी, मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रात करावयाची कार्यवाही, जम्बो मतपेटी तयार करणे, अंध किंवा दिव्यांग मतदाराकडून मतदान करताना घ्यावयाची दक्षता, ओळखीबाबत आक्षेप, मतदानानंतर मतपेट्या सुयोग्य पध्दतीने सीलबंद करणे, निवडणूक सामग्री आदींबाबत घ्यावयाच्या दक्षतेबाबत प्रात्यक्षिकेव्दारे मार्गदर्शन करण्यात आले.

मतपेट्या उघडणे, बंद करणे, सीलबंद करणे, कागदी सील, पोस्टल बॅलेट, मतपत्रिका व मतदान यादीची तपासणी याबाबत प्रात्यक्षिकेव्दारे माहिती देण्यात आली.

मतदान सोमवार, दिनांक 30 जानेवारीला सकाळी 8 ते 4 या वेळेत होणार आहे. यासाठी जिल्ह्यातील निवडणूकीचे संपूर्ण साहित्य गोळा झाल्यानंतर तात्काळ विशेष सुरक्षा व्यवस्थेमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सुरक्षेत सुपूर्द करण्यात येणार आहे. त्यानंतर मतमोजणी गुरुवार, दि. 2 फेब्रुवारी रोजी होणार आहे. या अनुषंगाने मतपत्रिकेच्या तपशीलावर सविस्तर माहिती देण्यात आली. मतदार यादी, मतदाराचा अनुक्रमांक याबाबत घ्यावयाच्या दक्षतेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे प्रशिक्षकांमार्फत निरसन करण्यात आले.

*****

Monday, January 23, 2023

राष्ट्रीय मतदारदिनानिमित्त उपक्रम भित्तीचित्रकला स्पर्धेत शेकडो कलावंतांचा सहभाग मतदानाच्या महत्वाबाबत रेखाटली अनेकविध चित्रे

 















राष्ट्रीय मतदारदिनानिमित्त उपक्रम

भित्तीचित्रकला स्पर्धेत शेकडो कलावंतांचा सहभाग

मतदानाच्या महत्वाबाबत रेखाटली अनेकविध चित्रे

 

अमरावती, दि. 22 : राष्ट्रीय मतदारदिनानिमित्त नागरिकांमध्ये मतदानाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय व महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने भित्ती चित्रकला स्पर्धा आज झाली. त्यात जिल्ह्यातील शेकडो कलावंतांनी सहभाग घेऊन मतदानाच्या अधिकाराचे महत्व विशद करणारी अनेक आकर्षक चित्रे काढली. विद्यार्थी व तरूण कलावंतांचा सहभाग लक्षणीय होता.

 

जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी भित्ती चित्रकलेच्या (वॉल पेटींग) ठिकाणी आज प्रत्यक्ष भेट देऊन सहभागी स्पर्धकांचे कौतूक करीत उत्साह वाढविला.  निवासी उपजिल्हाधिकारी विवेक घोडके, उप जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, उपविभागीय अधिकारी रिचर्ड यानथन, तहसीलदार संतोष काकडे यांच्यासह चित्रकला महाविद्यालयाचे शिक्षकवृंद, मनपा शाळेचे कलाशिक्षक व विद्यार्थी-विद्यार्थींनी यावेळी उपस्थित होते.

 

भित्तीचित्रकला (वॉल पेंटिंग) स्पर्धा महाविद्यालयीन विद्यार्थी, तसेच नागरिकांसाठी खुल्या स्वरुपात नि:शुल्क आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेचा विषय राष्ट्रीय मतदारदिन, मतदानाचा अधिकार, मतदानाची ताकद आणि मतदान जागृतीशी संबंधित सर्व बाबी असा होता.  स्पर्धकांना ब्रश आणि रंग आदी साहित्य पुरविण्यात आले होते. या स्पर्धेत विजयी होणाऱ्या स्पर्धकांना चार हजार, तीन हजार व दोन हजार अशी अनुक्रमे पहिली तीन बक्षीसे व एक हजार रूपयांची दोन उत्तेजनार्थ बक्षीसे आणि नाविन्यपूर्ण संकल्पनेसाठी दीड हजार रूपयांचे विशेष पारितोषिक घोषित करण्यात आले आहे. त्याशिवाय, व्हिडीओ मेकिंग स्पर्धाही आयोजित करण्यात आली असून, त्यासाठी विविध आकर्षक बक्षीसे देण्यात येणार आहेत. स्पर्धांचे बक्षीसवितरण राष्ट्रीय मतदारदिनी होणार आहे.

 

व्हिडीओ मेकिंग स्पर्धा

 

ही स्पर्धा १३ वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी खुली आहे. स्पर्धक हे वैयक्तिकरीत्या किंवा जास्तीत जास्त तीन सदस्य असलेल्या गटात भाग घेऊ शकतात. गुगल फॉर्मच्या माध्यमातून नोंदणी करता येईल. स्पर्धेला कुठलेही प्रवेशशुल्क नाही. सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात येतील. स्पर्धेसाठी २३ जानेवारीपूर्वी नोंदणी करणे आवश्यक आहे. राष्ट्रीय मतदार दिन, मतदानाचा अधिकार, मतदानाची ताकद हे स्पर्धेचे विषय आहेत. व्हिडीओ कमीत कमी ३० सेकंद व जास्तीत जास्त ९० सेकंदांचा असावा. स्पर्धकांनी त्यांचे व्हिडीओ फेसबुक, इंस्टाग्राम व ट्विटर या तीनपैकी एका किंवा त्याहून अधिक समाजमाध्यमांवर पोस्ट करणे आवश्यक आहे. व्हिडीओ मेकिंग स्पर्धेसाठी नोंदणीसाठी लिंक https://forms.gle/zauDZHbw6kAXcWmg7 अशी आहे.

 

00000

 

 

भरती परीक्षा अधिक सुरक्षित,पारदर्शक,विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी गठीत उच्चस्तरीय टास्क फोर्स १७ सप्टेंबर रोजी #अमरावती येणार

  भरती परीक्षा अधिक सुरक्षित,पारदर्शक,विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी गठीत उच्चस्तरीय टास्क फोर्स १७ सप्टेंबर रोजी #अमरावती येणार आह...