जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात शंभरहून अधिक दिवाळी अंकांचे प्रदर्शन;
वाचकांसाठी सात दिवस विनामूल्य पर्वणी
अमरावती, दि. १६ (जिमाका): महात्मा जोतीराव फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त राबविण्यात येत असलेल्या 'महात्मा फुले प्रेरणा सप्ताह' विशेष अभियानांतर्गत अमरावती जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात दिवाळी अंक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. वाचकांना दिवाळीच्या निमित्ताने दर्जेदार साहित्याचा आस्वाद घेता यावा, या उद्देशाने हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे.
ज्येष्ठ वाचक अनिल राजेनिंबाळकर यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. कार्यालयातील कर्मचारी राजाराम देवकर, संतोष मिश्रा, संजय देशमुख आणि वाचनालयातील विद्यार्थी वाचक उपस्थित होते.या प्रदर्शनात १०० हून अधिक विविध नामवंत दिवाळी अंक वाचकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
सर्व साहित्यप्रेमी आणि वाचकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन या साहित्यिक मेजवानीचा लाभ घ्यावा, तसेच जास्तीत जास्त नागरिकांनी ग्रंथालयाचे सभासद व्हावे, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी डॉ. अतुल पुं. वानखडे यांनी केले आहे.
0000

No comments:
Post a Comment