Tuesday, November 17, 2026

DIO NEWS AMRAVATI 17.11.2026


 चंद्रभागा मध्यम प्रकल्पातून रब्बी हंगामासाठी सिंचनाचे पाणी उपलब्ध; तातडीने अर्ज करण्याचे आवाहन

 

अमरावती, दि. 17 (जिमाका): चंद्रभागा मध्यम प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना आगामी रब्बी हंगाम २०२६-२७ साठी प्रकल्पातील पाणीसाठा उपलब्ध असून, सिंचनासाठी कालव्याद्वारे आणि नदी-नाल्यांवरील उपसाद्वारे तीन पाळयांमध्ये पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. इच्छुक लाभधारक शेतकऱ्यांनी  तातडीने  संबंधित उपविभागीय कार्यालयात पाणी मागणीचे अर्ज सादर करावेत, असे  आवाहन मध्यम लघु पाटबंधारे विभागाचे (अचलपूर) कार्यकारी अभियंता श्री. गु. उमप यांनी केले आहे.

 

             प्रकल्पाचा मुख्य कालवा, पिंपळखुटा, धामणगाव आणि एकलासपूर वितरिका तसेच त्यावरील सर्व लघु व उपलघू कालवे, जलाशय आणि अधिसूचित नदी-नाल्यांवरील लाभधारकांना या पाण्याचा लाभ मिळणार आहे. तूर, हरबरा, कापूस, मिरची, भाजीपाला, हळद व इतर रब्बी पिकांसाठी पाणी दिले जाणार असून त्यासाठी शेतकऱ्यांनी या पिकांची पेरणी  नोव्हेंबर २०२६ अखेरपर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे.

 

              पाणी मागणीसाठी पाणी मागणी अर्ज 'नमुना नं. ७' सोबत शेतीचा सातबारा उतारा जोडणे अनिवार्य असून नमुना नं. ७ अ आणि ७ ब चे कोरे अर्ज उपविभागीय कार्यालयात विनामूल्य उपलब्ध आहेत. अर्ज करतांना शेतकऱ्यांना मागील थकबाकीपैकी एक तृतीयांश (१/३) रक्कम आणि चालू हंगामाची अग्रिम पाणीपट्टी भरणे बंधनकारक आहे. सिंचन पाळी सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांनी आपली शेतचारी स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे.

 

              शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी 'टेल टू हेड' (पुच्छ भागाकडून मुखाकडे) पद्धतीने सिंचन केले जाईल. तसेच शेतकऱ्यांनी दिवस-रात्र पाणी घेणे बंधनकारक असून, कोणीही परस्पर गेट उघडून पाण्याचा अपव्यय करू नये.  विहिरीवरील शेतचारी आणि बंदिस्त नलिका यांमध्ये किमान तीन मीटरचे अंतर असावे. दोन पाळ्यांमध्ये साधारण १० दिवसांचे अंतर राहणार असल्याने, हलक्या जमिनीत पर्यायी पाण्याची व्यवस्था असल्याशिवाय भुईमुगासारखी पिके घेऊ नयेत असे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच नैसर्गीक आपत्ती व काही अपरिहार्य कारणास्तव ,अन्य तांत्रिक काराणास्तव पाणी पुरवठा शक्य नझाल्यास व त्यामुळे पिकांचे नुकसान झाल्यास  मध्यम व लघु पाटबंधारे विभाग अचलपूर जबाबदार राहणार नाही असेही कळविण्यात आले आहे.

 

                                                                               ००००


 

पुर्णा मध्यम प्रकल्पातून रब्बी हंगामासाठी सिंचनाचे पाणी उपलब्ध; तातडीने अर्ज करण्याचे आवाहन

 

अमरावती, दि. 17 (जिमाका):  पुर्णा मध्यम प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना आगामी रब्बी हंगाम २०२६-२७ साठी प्रकल्पातील पाणीसाठा उपलब्ध असून, सिंचनासाठी कालव्याद्वारे आणि नदी-नाल्यांवरील उपसाद्वारे चार पाळयांमध्ये पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. इच्छुक लाभधारक शेतकऱ्यांनी  तातडीने  संबंधित उपविभागीय कार्यालयात पाणी मागणीचे अर्ज सादर करावेत, असे  आवाहन मध्यम लघु पाटबंधारे विभागाचे (अचलपूर) कार्यकारी अभियंता श्री. गु. उमप यांनी केले आहे.

 

             प्रकल्पाचा मुख्य कालवा, शाखा कालवा, शिरजगाव  वितरिका, ब्राह्मणवाडा वितरिका, रशिदपूर वितरिका, इमामपूर वितरिका,सोनोरी वितरिका व  त्यावरील सर्व लघु व उपलघू कालवे,  विमोचक, जलाशयावरील अधिसूचित नदी-नाल्यांवरील लाभधारकांना हे पाणी उपलब्ध आहे. तूर, हरबरा, कापूस, मिरची, भाजीपाला, हळद व इतर रब्बी पिकांसाठी पाणी दिले जाणार असून त्यासाठी शेतकऱ्यांनी या पिकांची पेरणी  नोव्हेंबर २०२६ अखेरपर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे. बंदिस्त नलिका संचालन कार्यक्रम हा प्राप्त मागणी क्षेत्रानुसार करण्यात येणार आहे.

 

            पाणी मागणीसाठी पाणी मागणी अर्ज 'नमुना नं. ७' सोबत शेतीचा सातबारा उतारा जोडणे अनिवार्य असून नमुना नं. ७ अ आणि ७ ब चे कोरे अर्ज उपविभागीय कार्यालयात विनामूल्य उपलब्ध आहेत. अर्ज करतांना शेतकऱ्यांना मागील थकबाकीपैकी एक तृतीयांश (१/३) रक्कम आणि चालू हंगामाची अग्रिम पाणीपट्टी भरणे बंधनकारक आहे. सिंचन पाळी सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांनी आपली शेतचारी स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे.

 

              शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी 'टेल टू हेड' (पुच्छ भागाकडून मुखाकडे) पद्धतीने सिंचन केले जाईल. तसेच शेतकऱ्यांनी दिवस-रात्र पाणी घेणे बंधनकारक असून, कोणीही परस्पर गेट उघडून पाण्याचा अपव्यय करू नये.  विहिरीवरील शेतचारी आणि बंदिस्त नलिका यांमध्ये किमान तीन मीटरचे अंतर असावे. दोन पाळ्यांमध्ये साधारण १० दिवसांचे अंतर राहणार असल्याने, हलक्या जमिनीत पर्यायी पाण्याची व्यवस्था असल्याशिवाय भुईमुगासारखी पिके घेऊ नयेत असे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच नैसर्गीक आपत्ती व काही अपरिहार्य कारणास्तव ,अन्य तांत्रिक काराणास्तव पाणी पुरवठा शक्य नझाल्यास व त्यामुळे पिकांचे नुकसान झाल्यास  मध्यम व लघु पाटबंधारे विभाग अचलपूर जबाबदार राहणार नाही असेही कळविण्यात आले आहे.                                                                                

००००

चारगड लघु प्रकल्पातून रब्बी हंगामासाठी सिंचनाचे पाणी उपलब्ध; तातडीने अर्ज करण्याचे आवाहन

 

अमरावती, दि. 17 (जिमाका): चारगड लघु प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना आगामी रब्बी हंगाम २०२६-२७ साठी प्रकल्पातील पाणीसाठा उपलब्ध असून, सिंचनासाठी कालव्याद्वारे आणि नदी-नाल्यांवरील उपसाद्वारे दोन पाळयांमध्ये पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. इच्छुक लाभधारक शेतकऱ्यांनी  तातडीने  संबंधित उपविभागीय कार्यालयात पाणी मागणीचे अर्ज सादर करावेत, असे  आवाहन मध्यम लघु पाटबंधारे विभागाचे (अचलपूर) कार्यकारी अभियंता श्री. गु. उमप यांनी केले आहे.

 

        चारगड लघु प्रकल्प मुख्य कालवा ० कि.मी. ते ३.४८ कि.मी. व त्यावरील  वितरिका ७.३७ कि.मी. व त्यावरील  सर्व लघु कालवे व उप लघुकालवे,विमोचक, जलाशयावरील अधिसुचित नदी-नाल्यांवरील लाभधारकांना हे पाणी उपलब्ध आहे. तूर, हरबरा, कापूस, मिरची, भाजीपाला, हळद व इतर रब्बी पिकांसाठी पाणी दिले जाणार असून त्यासाठी शेतकऱ्यांनी या पिकांची पेरणी  नोव्हेंबर २०२६ अखेरपर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे. बंदिस्त नलिका संचालन कार्यक्रम हा प्राप्त मागणी क्षेत्रानुसार करण्यात येणार आहे.

 

            पाणी मागणीसाठी पाणी मागणी अर्ज 'नमुना नं. ७' सोबत शेतीचा सातबारा उतारा जोडणे अनिवार्य असून नमुना नं. ७ अ आणि ७ ब चे कोरे अर्ज उपविभागीय कार्यालयात विनामूल्य उपलब्ध आहेत. अर्ज करतांना शेतकऱ्यांना मागील थकबाकीपैकी एक तृतीयांश (१/३) रक्कम आणि चालू हंगामाची अग्रिम पाणीपट्टी भरणे बंधनकारक आहे. सिंचन पाळी सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांनी आपली शेतचारी स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे.

 

          शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी 'टेल टू हेड' (पुच्छ भागाकडून मुखाकडे) पद्धतीने सिंचन केले जाईल. तसेच शेतकऱ्यांनी दिवस-रात्र पाणी घेणे बंधनकारक असून, कोणीही परस्पर गेट उघडून पाण्याचा अपव्यय करू नये.  विहिरीवरील शेतचारी आणि बंदिस्त नलिका यांमध्ये किमान तीन मीटरचे अंतर असावे. दोन पाळ्यांमध्ये साधारण १० दिवसांचे अंतर राहणार असल्याने, हलक्या जमिनीत पर्यायी पाण्याची व्यवस्था असल्याशिवाय भुईमुगासारखी पिके घेऊ नयेत असे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच नैसर्गीक आपत्ती व काही अपरिहार्य कारणास्तव ,अन्य तांत्रिक काराणास्तव पाणी पुरवठा शक्य नझाल्यास व त्यामुळे पिकांचे नुकसान झाल्यास  मध्यम व लघु पाटबंधारे विभाग अचलपूर जबाबदार राहणार नाही असेही कळविण्यात आले आहे.

                                                                             

००००

सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा शुक्रवारी मेगा क्रेडिट आउटरीच कॅम्प

अमरावती, दि. 17 (जिमाक) : अग्रणी बँक असलेल्या सेंट्रल बँक ऑफ इंडियातर्फे शुक्रवार, दि. 20 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता मेगा एमएसएमई क्रेडिट आउटरीच कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. पंचवटी चौकातील वऱ्हाडे मंगलम येथे हे शिबीर होणार आहे.

यावेळी सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय प्रबंधक पन्नम कुमार उपस्थित राहणार आहे. तसेच बँकेचे वरिष्ठ अधिकारी, एमआयडीसी असोसिएशनचे पदाधिकारी आणि जिल्हा प्रशासनातील अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

कॅम्पमध्ये सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या उद्योग क्षेत्रासाठी असलेल्या विविध एमएसएमई कर्ज योजना, तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध अनुदानाधारीत व प्रोत्साहनपर योजनांची माहिती देण्यात येणार आहे. नवोदित उद्योजक, विद्यमान व्यावसायिक, लघु व मध्यम उद्योग तसेच स्वयंरोजगार करू इच्छिणाऱ्या व्यक्तींना कर्ज सुविधांची माहिती व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

या कॅम्पमध्ये पात्र कर्ज अर्जदारांच्या कर्ज प्रस्तावांची छाननी करून आवश्यक पात्रता व कागदपत्रांची पूर्तता झाल्यास जागेवरच कर्ज मंजुरी देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील औद्योगिक आणि व्यावसायिक क्षेत्राला चालना मिळावी, नवीन उद्योजक निर्माण व्हावेत, तसेच विद्यमान उद्योगांना आर्थिक बळ मिळावे, या उद्देशाने या मेगा क्रेडिट आउटरीच कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील उद्योजक, व्यापारी, व्यावसायिक, नवउद्योजक तसेच स्वयंरोजगार करू इच्छिणाऱ्यांनी यावेळी उपस्थित राहावे, तसेच सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या आकर्षक व्याजदराच्या विविध कर्ज योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन अग्रणी जिल्हा प्रबंधक  नरेश हेडाऊ यांनी केले आहे.

00000

सोमवारी मोर्शी येथे शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा

अमरावती, दि. 17 (जिमाका) : मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगीक सूचना केंद्रांतर्गत मोर्शी येथील श्री गोविंदप्रभू शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सोमवार, दि. 23 नोव्हेंबर रोजी प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या भरती मेळाव्यात आयटीआय उत्तीर्ण, तसेच दहावी, बारावी आणि पदवीधर झालेले सहभागी होऊ शकतील. मेळाव्यामध्ये पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि अमरावती जिल्ह्यातील नामांकित कंपन्या सहभागी होणार असून युवकांसाठी नोकरी, शिकाऊ उमेदवारीची संधी मिळणार आहे.

मेळाव्याला उपस्थित राहणाऱ्या सर्व प्रशिक्षणार्थीं, उमेदवारांनी सोबत आपला बायोडाटा आणि मूळ कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती आणणे आवश्यक आहे. पात्र प्रशिक्षणार्थींनी या भरती मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन प्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मोर्शी, तसेच सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार, अमरावती यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment