Friday, August 2, 2024

उद्योजकासाठी सोमवारी एकदिवसीय कार्यशाळा

 

उद्योजकासाठी सोमवारी एकदिवसीय कार्यशाळा

ख्‍

           अमरावती, दि. 02 (जिमाका):  राज्यासाठी महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या  एमएसएमई क्षेत्रावर अधिक भर देऊन त्यांची कार्यक्षमता व उत्पादकता वाढविणे. राज्यात उद्योजकीय वातावरण अधिक व्यापक करुन रोजगार स्वयंरोजगार संधी मोठ्या प्रमाणात निर्माण करणेसाठी तसेच उद्योगाच्या विकासाकरीता राज्य तसेच केंद्र शासनाचे विविध विभाग त्यांचे उपक्रम व योजना संचालनालयामार्फत राज्यात राबवत आहेत. सर्व योजनांची माहिती उद्योजकांना एकाच व्यासपिठावर उपलब्ध होण्यासाठी सोमवार दि. 5 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता सीए भवन, सातुर्णा इंडस्ट्रियल इस्टेट अमरावती येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

 

            जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली IGNITE Maharashtra या एक दिवशीय कार्यशाळेत विविध योजनाचे तज्ज्ञ व्याख्यातांमार्फत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. उद्योग सहसंचालक Director General of Foreign Trade चे प्रतिनिधी तसेच SIDBI ONDC, POST OFFICE MAITRI यांच्याशी संबंधित अधिकारी आयात व निर्यात क्षेत्रातील अनुभवी प्रवक्त्यांचे मार्गदर्शन मिळणार आहे. या सुवर्णसंधीचा अमरावती जिल्ह्यातील सर्व उद्योजक औद्योगिक संघटना एफपीओ शेतकरी कंपन्या एफपीओ, एक्स्पोर्ट करण्यास इच्छुक युवक-युवती तसेच सध्या कार्यरत एक्स्पोर्टर्स यानी सक्रिय सहभागी होऊन जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांनी सक्रिय योगदान द्यावे. तसेच कार्यशाळा ही उद्योजक व निमंत्रकांसाठी निशुल्क आहे. तरी या कार्यशाळेतचा लाभ घ्यावा, असे आवाहन  जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निलेश निकम  यांनी केले आहे.

00000

Thursday, August 1, 2024

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची ‘संचीता’ ठरली जिल्ह्यातील पहीली लाभार्थी



 मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची ‘संचीता’ ठरली जिल्ह्यातील पहीली लाभार्थी

 

          अमरावती, दि. 01 (जिमाका): महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनेमधील एक महत्वाकांक्षी योजना म्हणजे “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण” योजना आहे. या योजनेतंर्गत कु. संचिता कोकर्डे या प्रशिक्षनार्थीची निवड करण्यात आली असून अमरावती जिल्ह्यातील पहिली लाभार्थी ठरली आहे. कु. कोकर्डेला जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.

 

           कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबविण्यात येत आहे. विविध शासकिय, निमशासकिय कार्यालये, खाजगी आस्थापना व महामंडळांनी आतापर्यंत 1 हजार 475 पदे महास्वयंम वेबपोर्टलवर अधिसुचीत झालेली आहे. अधिसूचित झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यामधून कु.संचिता कोकर्डे हिची स्कील/मौखीक मुलाखतीमधून जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र येथे प्रशिक्षनार्थी म्हणून निवड करण्यात आली असून ती जिल्ह्यातून पहिली लाभार्थी ठरली  आहे.

 

            युवक, युवतींना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची क्षमता वाढविण्यासाठी कार्यप्रशिक्षण योजनेंतर्गत प्रशिक्षणार्थींना शैक्षणिक अहर्ताप्रमाणे बारावी पासकरिता 6 हजार रुपये, आयटीआय किंवा पदवीकाधारकासाठी 8 हजार व पदवीधर किंवा पदव्यूत्तर करिता 10 हजार रुपये शासनाकडून विद्यावेतन दिले जाणार आहे. या कार्य प्रशिक्षणाचा कालावधी 6 महिने आहे.

 

        पात्रता : उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा, उमेदवारांचे किमान वय १८ ते ३५ वर्ष असावे,   शैक्षणिक पात्रता किमान बारावी पास, आयटीआय, पदविका, पदवीधर, पदव्युत्तर असावी. शिक्षण चालू असलेले उमेदवार पात्र असणार नाही, उमेदवारांची आधार नोंदणी असावी.  उमेदवारांचे बँक खाते आधार संलग्न असावे. उमेदवारांने विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी. अधिक माहीतीकरिता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मागदर्शन केंद्र, शासकिय तांत्रिक विद्यालय परिसर, उस्मानिया मस्जिद जवळ, बस स्टँण्ड रोड, अमरावती येथे प्रत्यक्ष संपर्क साधवा. किंवा मो. क्र. ८६०५६५४०२५ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे.

0000

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

 



लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

 

            अमरावती, दि. 01 : लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी सुरज वाघमारे यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

 

            यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनीही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

00000

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची ‘संचीता’ ठरली जिल्ह्यातील पहीली लाभार्थी

 


मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची ‘संचीता
’ ठरली जिल्ह्यातील पहीली लाभार्थी

 

          अमरावती, दि. 01 (जिमाका): महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनेमधील एक महत्वाकांक्षी योजना म्हणजे “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण” योजना आहे. या योजनेतंर्गत कु. संचिता कोकर्डे या प्रशिक्षनार्थीची निवड करण्यात आली असून अमरावती जिल्ह्यातील पहिली लाभार्थी ठरली आहे. कु. कोकर्डेला जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.

 

           कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबविण्यात येत आहे. विविध शासकिय, निमशासकिय कार्यालये, खाजगी आस्थापना व महामंडळांनी आतापर्यंत 1 हजार 475 पदे महास्वयंम वेबपोर्टलवर अधिसुचीत झालेली आहे. अधिसूचित झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यामधून कु.संचिता कोकर्डे हिची स्कील/मौखीक मुलाखतीमधून जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र येथे प्रशिक्षनार्थी म्हणून निवड करण्यात आली असून ती जिल्ह्यातून पहिली लाभार्थी ठरली  आहे.

 

            युवक, युवतींना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची क्षमता वाढविण्यासाठी कार्यप्रशिक्षण योजनेंतर्गत प्रशिक्षणार्थींना शैक्षणिक अहर्ताप्रमाणे बारावी पासकरिता 6 हजार रुपये, आयटीआय किंवा पदवीकाधारकासाठी 8 हजार व पदवीधर किंवा पदव्यूत्तर करिता 10 हजार रुपये शासनाकडून विद्यावेतन दिले जाणार आहे. या कार्य प्रशिक्षणाचा कालावधी 6 महिने आहे.

 

        पात्रता : उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा, उमेदवारांचे किमान वय १८ ते ३५ वर्ष असावे,   शैक्षणिक पात्रता किमान बारावी पास, आयटीआय, पदविका, पदवीधर, पदव्युत्तर असावी. शिक्षण चालू असलेले उमेदवार पात्र असणार नाही, उमेदवारांची आधार नोंदणी असावी.  उमेदवारांचे बँक खाते आधार संलग्न असावे. उमेदवारांने विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी. अधिक माहीतीकरिता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मागदर्शन केंद्र, शासकिय तांत्रिक विद्यालय परिसर, उस्मानिया मस्जिद जवळ, बस स्टँण्ड रोड, अमरावती येथे प्रत्यक्ष संपर्क साधवा. किंवा मो. क्र. ८६०५६५४०२५ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे.

0000

 

 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमार्फत खाते उघडण्याची सुविधा; केवळ 5 मिनीटात उघडले जाते खाते

 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमार्फत खाते उघडण्याची सुविधा; केवळ 5 मिनीटात उघडले जाते खाते

 

         अमरावती, दि. 1 (जिमाका): राज्य शासनाने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात प्रतिमाह 1 हजार 500 रुपयांचे अर्थसहाय्य जमा केले जाणार आहे. त्यासाठी महिलांचे बॅंक खाते असणे आवश्यक आहे. यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट्स बॅंकेने अवख्या पाच मिनीटात 200 रुपये शुल्क भरुन बॅंक खाते उखडले जाते. या सुविधाचा योजनेंतर्गत पात्र महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले आहे.

 

         मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत 21 ते 65 वयोगटातील आणि कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न 2 लाख 50 हजाराच्या आत असलेल्या महिलांना आवश्यक कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतर योजनेचा लाभ दिला जाणार आहे. लाभाची रक्कम प्रतिमाह केवळ बॅक खात्याद्वारे अदा केली जाणार आहे. योजनेसाठी महिलांच्या नावांची नोंदणी जिल्हाभर मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. नोंदणी करतांना महिलांना बॅंक खात्याची झेरॅाक्स प्रत सोबत जोडणे आवश्यक आहे.

 

         पोस्ट पेमेंट बॅंकेत अगदी काही वेळात आणि सहजपणे खाते उघडल्या जात असल्याने महिला हे खाते उघडण्याला पसंती देत आहे. भारतीय डाक विभागाच्या इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचे जाळे संपुर्ण जिल्ह्यात अगदी गाव पातळीपर्यंत पसरलेले आहे. जिल्ह्यात सुमारे 454 पोस्ट ऑफिस आहे. त्यात 412 ग्रामीण भागात तर 42 शहरी भागात कार्यरत आहे. या सर्व पोस्ट कार्यालयातून इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचे कार्य चालते. या बॅंकेत अवख्या पाच मिनीटात 200 रुपये शुल्क भरुन बॅंक खाते काढता येते.

 

          जिल्ह्यातील सर्व पोस्टमनकडे डिपार्टमेंट मोबाईल आणि बायोमेट्रिक मशीन देण्यात आलेल्या आहेत. या मशिनच्या आधारे लाभार्थ्यांची अंगठा लावून पडताळणी केली जाते आणि खाते उघडून दिले जातात. खाते काढण्यासाठी पोस्ट पेमेंट्स बॅंकेत कोणत्याही प्रकारचे कागदपत्र द्यावे लागत नाही, फक्त आधार क्रमांक आणि मोबाईल सोबत असावा लागतो. जिल्ह्यात इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचे जवळपास 2 लाख 50 हजारापेक्षा जास्त ग्राहक आहेत. त्यात आता 15 हजार लाडक्या बहिणींची भर पडली आहे.

 

खाते अन्य योजनेसाठीही उपयुक्त

           इंडिया पोस्ट पेमेंट्स बॅंकेचे खाते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेव्यतिरिक्त पीएम किसान योजना, रोजगार हमी योजना, प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना, ज्येष्ठ नागरिकांना निराधार योजना इत्यादीसाठी उपयुक्त आहे. लाडकी बहीण योजनेसाठी शासनाने देखील पोष्ट पेमेंट्स खात्याला मान्यता दिली असून महिलांनी खाते काढण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

00000

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेने महसूल पंधरवड्याचा शुभारंभ; राज्यात प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी महसूल विभागाने काम करावे- जिल्हाधिकारी सौरभ कटियार

 














मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेने महसूल पंधरवड्याचा शुभारंभ;

राज्यात प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी महसूल विभागाने काम करावे- जिल्हाधिकारी सौरभ कटियार

 

           अमरावती, दि. 1 (जिमाका): शासकीय कार्यालयात सर्वसामान्य माणूस विविध कामे घेऊन येत असतो. याची जाणीव संबंधित कर्मचाऱ्यांनी ठेवावी. त्यामुळे संवेदनशीलपणे काम केल्यास स्वत:ची तसेच विभागाची चांगली प्रतिमा निर्माण होते. महसूल विभागातील प्रत्येकांने जबाबदारीने काम करुन राज्यात अमरावती जिल्हा प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले.

 

            नियोजन सभागृहात महसूल दिनानिमित्त आयोजित महसूल पंधरवाडाचा शुभारंभ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेने केला, यावेळी ते बोलत होते. यावेळी मनपा आयुक्त सचिन कलंत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा, अमरावती विभागाचे अपर आयुक्त गजेंद्र बावणे, अपर जिल्हाधिकारी सुरज वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, उपजिल्हाधिकारी महसूल विजय जाधव, उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर घ्यार आदी उपस्थित होते. 

 

            जिल्हाधिकारी श्री. कटियार म्हणाले की, आपल्याकडे काम घेऊन येणा-या सामान्य माणसाचे समाधान करा. संवेदनशीलपणे काम हाताळल्यास चांगली प्रतिमा निर्माण होण्यास मदत होईल. पूर्वीच्या आणि आत्ताच्या काम करण्याच्या पध्दतीत अमुलाग्र बदल झाला आहे. शासनाचा ऑनलाईन सेवा पुरविण्यावर भर असून त्यांचा प्रत्येकांनी आत्मसाद करावे. महसूल संबंधित सर्व सेवा नागरिकांना विनाविलंब मिळेल यासाठी प्रयत्न करावे. सर्व विभागासोबत समन्वय साधून शासनाच्या महत्वाकांक्षी योजनाचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवावा.  कोणताहि लाभार्थी लाभापासून वंचित राहता काम नये. उत्कृष्ठ सेवेतून अमरावती जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी महसूल विभागाने काम करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

 

         मनपा आयुक्त श्री. कलंत्री म्हणाले की, महसूल विभाग हा शासनाचा मुख्य कणा असून शासनाच्या विविध योजनाचा लाभ व सेवा देण्यासाठी सर्वसामान्य माणसांचा संबंध येतो. त्यामुळे योजनांचा लाभ गरजूपर्यंत कसा देता येईल यासाठी महसूल विभागाने प्रयत्न करावे. आपल्या कामातून व्यापक लोकहित साधणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे महसूल पंधरवाडा कालावधीत नागरिकांच्या तक्रारी व  प्रलंबित कामे निकाली काढण्यासाठी पुढाकार घ्यावा. अधिकाधिक नागरिकांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत.

 

          शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी प्रशासनाने अधिकाधिक लोकाभिमुख होऊन कामे करावीत व महसूल पंधरवडा यशस्वी करावा. शासनाच्या विविध योजना लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी  ग्रामसेवक आणि तलाठी यांनी समन्वय काम करावे, असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा यांनी केले.

 

            महसूल दिनानिमत्ता आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतंर्गत पात्र 3 हजार 468 महिला लाभार्थ्यांच्या प्रकरणाला तालुकास्तीय समितीने मंजुरी प्रदान करण्यात आले असून प्रातिनिधीक स्वरुपात महिलाना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. पात्र महिलांच्या खात्यात प्रतिमाह 1 हजार 500 रुपयांचे अर्थसहाय्य जमा केले जाणार आहे. यावेळी मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ठ कर्मचा-यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच 563 तलाठी यांना महसूल संदर्भातील कामे करण्यासाठी  लॅपटॉप व प्रिंटरचे वाटप करण्यात आले. नव्याने तलाठी पदावर नियुक्त झालेले 33 उमेदवारांना नियुंक्ती आदेश यावेळी प्रदान करण्यात आले.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक अपर जिल्हाधिकारी सुरज वाघमारे यांनी केले. संचालन श्रीकृष्ण पखाले यांनी तर आभार अनिल भटकर यांनी मानले. कार्यक्रमाला उपजिल्हाधिकारी यांच्यासह महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

                                                                           ००००००

अचलपूर येथील फिनले मिल पुन्हा सुरू करण्यासाठी राज्य सरकार पुढाकार घेणार -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 




अचलपूर येथील फिनले मिल पुन्हा सुरू करण्यासाठी राज्य सरकार पुढाकार घेणार

    -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


अमरावती, दि.01 (जिमाका) : अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथील फिनले मिल पुन्हा सुरू करण्यासाठी महाराष्ट्राचे वेगळे मॉडेल तयार करून तातडीने प्रस्ताव तयार करावा, राज्य सरकार यासाठी पुढाकार घेईल,असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी  सांगितले.


आज सह्याद्री अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली अचलपूर येथील फिनले मिल संदर्भात आढावा बैठक संपन्न झाली.


 बैठकीला वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार रवी राणा, आमदार बच्चू कडू (ऑनलाइन) केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव रोहित कन्सल, सहसचिव प्राजक्ता लवंगारे,उपमुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव श्रीकर परदेशी,वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव  सौरभविजय, वस्त्रोद्योग विभागाचे सचिव वीरेंद्र सिंह, फिनले मिल मधील कामगार व संबंधित अधिकारी उपस्थित होते.


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, फिनले मिल सुरू करण्यासाठी राज्य सरकार आर्थिक सहकार्य करायला तयार आहे. महाराष्ट्र शासनाच्या भागीदारीचा सहभागाचा घेऊन वेगळे मॉडेल
 विकसित करण्यासाठीचा सविस्तर प्रस्ताव तातडीने तयार करावा. तसेच  मिलमधील काही कामगारांना शंभर टक्के वेतन दिले जात नाही. ते पुढील महिन्यापासून सर्वांना शंभर टक्के वेतन सुरू करावे, आशा सूचनाही उपमुख्यमंत्रीश्री.फडणवीस यांनी यावेळी दिल्या.
अमरावती जिल्ह्यातील फिनले मिल सुरू होणे आवश्यक आहे. या  मिलमुळे मोठ्या प्रमाणत रोजगार निर्मिती आणि वस्त्रोद्योगाला चालना मिळणार आहे.  मिल सुरू करण्यासाठी  केंद्र सरकारशी समनव्य करून ही मिल सुरू करण्यासाठी राज्य सरकार पुढाकार घेईल असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले

बैठकीत वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी फिनले मिल सुरू करण्या येत असलेल्या  अडचणी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि मिल कामगार यांची मागणी यासंदर्भात माहिती देऊन मिल सुरू करण्यासाठी वस्त्रोद्योग विभागाचा सहभाग याबाबत माहिती दिली.


0000

DIO NEWS AMRAVATI 26.10.2026

  दुष्काळात शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक केल्यास फायनान्स कंपन्यांवर फौजदारी कारवाई होणार- निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे       अमरावती, दि...