मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची ‘संचीता’ ठरली जिल्ह्यातील पहीली लाभार्थी
अमरावती, दि. 01 (जिमाका): महाराष्ट्र शासनाच्या
विविध योजनेमधील एक महत्वाकांक्षी योजना म्हणजे “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण” योजना आहे. या योजनेतंर्गत कु.
संचिता कोकर्डे या प्रशिक्षनार्थीची निवड करण्यात आली असून अमरावती जिल्ह्यातील पहिली
लाभार्थी ठरली आहे. कु. कोकर्डेला जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते नियुक्ती
पत्र देण्यात आले.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग
आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण
योजना राबविण्यात येत आहे. विविध शासकिय, निमशासकिय कार्यालये, खाजगी आस्थापना व महामंडळांनी
आतापर्यंत 1 हजार 475 पदे महास्वयंम वेबपोर्टलवर अधिसुचीत झालेली आहे. अधिसूचित झालेल्या
उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यामधून कु.संचिता कोकर्डे हिची स्कील/मौखीक
मुलाखतीमधून जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र येथे प्रशिक्षनार्थी
म्हणून निवड करण्यात आली असून ती जिल्ह्यातून पहिली लाभार्थी ठरली आहे.
युवक, युवतींना त्यांच्या शिक्षणानंतर
प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची क्षमता वाढविण्यासाठी कार्यप्रशिक्षण योजनेंतर्गत
प्रशिक्षणार्थींना शैक्षणिक अहर्ताप्रमाणे बारावी पासकरिता 6 हजार रुपये, आयटीआय किंवा
पदवीकाधारकासाठी 8 हजार व पदवीधर किंवा पदव्यूत्तर करिता 10 हजार रुपये शासनाकडून विद्यावेतन
दिले जाणार आहे. या कार्य प्रशिक्षणाचा कालावधी 6 महिने आहे.
पात्रता : उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी
असावा, उमेदवारांचे किमान वय १८ ते ३५ वर्ष असावे, शैक्षणिक पात्रता किमान बारावी पास, आयटीआय, पदविका,
पदवीधर, पदव्युत्तर असावी. शिक्षण चालू असलेले उमेदवार पात्र असणार नाही, उमेदवारांची
आधार नोंदणी असावी. उमेदवारांचे बँक खाते आधार
संलग्न असावे. उमेदवारांने विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर
नोंदणी केलेली असावी. अधिक माहीतीकरिता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मागदर्शन
केंद्र, शासकिय तांत्रिक विद्यालय परिसर, उस्मानिया मस्जिद जवळ, बस स्टँण्ड रोड, अमरावती
येथे प्रत्यक्ष संपर्क साधवा. किंवा मो. क्र. ८६०५६५४०२५ या मोबाईल क्रमांकावर संपर्क
साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक
आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे.
0000
No comments:
Post a Comment