'घरोघरी तिरंगा मोहिमे'चा मोटरसायकल रॅलीने शुभारंभ;
‘घरोघरी
तिरंगा’ मोहिमेत नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे
- निवासी
उपजिल्हाधिकारी अनिल भटकर
अमरावती, दि. 09 (जिमाका): भारतीय स्वातंत्र्य
दिनाचा 77 वा वर्धापन दिन 15 ऑगस्ट रोजी उत्साहात साजरा होणार आहे. यावर्षीही ‘हर घर
तिरंगा’ मोहिम दि. 9 ते 15 ऑगस्ट दरम्यान
राबविण्यात येत आहे. ही मोहिम यशस्वी करण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरावर
राष्ट्रध्वजाची उभारणी स्वयंस्फूर्तने करावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी अनिल
भटकर यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातून काढण्यात
आलेल्या मोटार सायकल रॅलीला निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी हिरवी झेंडी दाखवून
'घरोघरी तिरंगा मोहिमेचा शुभारंभ केला. यावेळी मनपाचे उपायुक्त माधुरी मडावी, जुमा
प्यारेलाल, नगरपालिका प्रशासन अधिकारी सुमेध अलोणे, तहसीलदार डॉ. प्रशांत पडघन, अधीक्षक
डॉ. निलेश खटके आदी उपस्थित होते.
घरोघरी तिरंगा मोहिम दि. 9 ते 15 ऑगस्टदरम्यान
विविध कार्यक्रम, उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच घरोघरी तिरंगा अभियानांतर्गत
प्रत्येक घरावर दि. 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान राष्ट्रध्वज फडकविण्यात येणार आहे. नागरिकांनी
आपल्या घरावर तिरंगा फडकवावा आणि राष्ट्रध्वजासोबतचा सेल्फी काढून
harghartiranga.com या संकेतस्थळावर अपलोड करावा. तसेच मोहिम कालावधीत तिरंगा रॅली,
तिरंगा यात्रा, तिरंगा मॅरेथॉन, तिरंगा कॉन्सर्ट, तिरंगा कॅनव्हास, तिरंगा प्रतिज्ञा,
तिरंगा सेल्फी, तिरंगा ट्रीब्यूट असे विविध उपक्रम राबविले जाणार आहे, अशी माहिती निवासी
उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी दिली.
जिल्हाधिकारी व महानगरपालिकाच्या वतीने
मोटार सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ही रॅली शहरातील मुख्य मार्गावरुन काढण्यात
आली. रॅलीदरम्यान ‘घरोघरी तिरंगा’ लावा, वंदे मातरम, भारत माता
की जय, यासह विविध देशभक्तीवर आधारित घोषणा व गीतांनी वातावरण देशभक्तीमय झाले होते.
00000
No comments:
Post a Comment