आपत्ती व्यवस्थापन जनजागृती मॅरेथान रॅलीला मान्यवरांनी दाखविली हिरवी झेंडी;
आपत्तीच्या
काळात संपर्क, संवाद साधून योग्य समन्वय ठेवा-जिल्हाधिकारी सौरभ कटियार
अमरावती,
दि. 09 (जिमाका): नैसर्गिक आपत्तीच्या कालावधीत परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्वांनी
आपापसात योग्य समन्वय ठेवून संपर्क, संवाद ठेवावे जेणेकरून कोणत्याही परिस्थितीत आपत्तीमध्ये
हानी होणार नाही. तसेच आपत्ती व्यवस्थापनाबाबत सर्वांनी सजग राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी
सौरभ कटियार यांनी यावेळी केले.
जिल्हाधिकारी कार्यालय, मनीबाई गुजराती
हायस्कूल अमरावती व चौरंग संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने राज्य आपत्ती
व्यवस्थापन प्राधिकरण यांच्यामार्फत जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन जनजागृती मॅरथान रॅलीला
आज मान्यवरांच्या हस्ते मनीबाई गुजराती हायस्कूलच्या प्रांगणात हिरवी झेंडी दाखवून
रवाना करण्यात आले. यावेळी जिलहाधिकारी सौरभ कटियार, पोलीस अधीक्षक विशाल आनंद, निवासी
उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, मनीबाई गुजराती हायस्कूलचे मुख्याध्यापिका अंजली देव, तहसीलदार
डॉ. प्रशांत पडघन, अधीक्षक डॉ. निलेश खटके, विभागीय आपत्ती व्यवस्थापन समन्वयक अमरजीत
चोरपगार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. कटियार म्हणाले की,
आपत्तीच्या काळात आपण सदैव तयार असावे. आपत्तीमध्ये कोणतीही मदत लवकर मिळणे शक्य नाही.
अशावेळी सुरक्षित राहण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाविषयी सर्वांना माहिती असणे आवश्यक आहे. यासाठी शाळा, महाविद्यालयस्तरावर
व जनसामान्यपर्यंत आपत्ती व्यवस्थापनाबाबत व्यापक जनजागृती करणे आवश्यक असून प्रत्येकांनी
सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
मॅरथॉन रॅलीची सुरुवात मनीबाई गुजराती
हायस्कूलच्या प्रांगणापासून झाली. यावेळी मॅरेथॉनमध्ये विजयी स्पर्धकांना प्रमाणपत्र
व मेडल देऊन सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन मंगेश व्यवहारे यांनी केले. कार्यक्रमाच्या
यशस्वीतेसाठी धिरज शर्मा, जयंत मुंजे, अरुण पाठक, प्रफुल मेहता, मुकेश पाटणकर, सरिता
गायकवाड, जिल्हा शोध व बचाव पथकातील सर्व कर्मचारी शिक्षकांनी सहकार्य केले.
00000
No comments:
Post a Comment