Friday, August 9, 2024

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या योजनाचा लाभ घेण्याचे आवाहन; जिल्ह्यात कर्ज-अनुदानाच्या 180 प्रकरणांचे उद्दिष्ट

 

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या योजनाचा लाभ घेण्याचे आवाहन;

जिल्ह्यात कर्ज-अनुदानाच्या 180 प्रकरणांचे उद्दिष्ट

 

        अमरावती, दि. 09 (जिमाका): महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध संवर्गातील व्यक्तींना व्यवसायासाठी कर्ज, अनुदान योजना राबवली जाते. यंदा 180 प्रकरणांचे उद्दिष्ट निश्चित केले आहे, अशी माहिती महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक माधुरी अवघाते यांनी दिली.

 

           पात्र अर्जदारांनी विहित नमुन्यातील अर्जासह जातीचे, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, पासपोर्ट फोटो, आधार कार्ड, रेशन कार्ड, दरपत्रक, बँक पासबुकची झेरॉक्स तसेच प्रशिक्षण घेवू इच्छिणाऱ्या पात्र व्यक्तींनी शैक्षणिक प्रमाणपत्रासह प्रस्ताव महामंडळाचे जिल्हा कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित अमरावती येथे सादर करावे

 

00000

No comments:

Post a Comment

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार

  ‘ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ ’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार