जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी हतरु व चुरणी गावाला दिली भेट;
साथरोगाच्या नियंत्रणासाठी
प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याच्या दिल्या सूचना
अमरावती, दि.
14 (जिमाका):
प्राथमिक आरोग्य केंद्र हतरु व चुरणी या गावात सोमवार दि. 12 ऑगस्ट रोजी 24 रुग्णांना अचानक हगवन व पोटदुखी होत असल्याची
माहिती प्राप्त होताच जिल्हा आरोग्य अधिकारी व त्यांच्या टिमने गावाला तात्काळ भेट
देऊन रुग्णांची आस्थेने विचारपूस केली. भेटी दरम्यान तेथील आरोग्य व्यवस्था व रुग्णांची
स्व:त तपासणी करुन साथरोग नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याचे सूचना
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश असोले यांनी संबंधिताना दिले.
प्राथमिक आरोग्य
केंद्र हतरु येथील 17 रुग्ण व ग्रामीण रुग्णालय चुरणी येथे 7 असे 24 रुग्ण भरती करण्यात
आले होते. या घटनाची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश असोले यांना समजताच माता
बाल संगोपन अधिकारी डॉ.सुभाष डोले, अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रविण पारिसे
व जिल्हास्तरिय टिम यांनी ग्रामीण रुग्णालय चुरणी व प्राथमिक आरोग्य केंद्र हतरु येथे
भेट देऊन सर्व रुग्णांची तपासणी व विचारपुस करुन त्यांच्यावर योग्य ते उपचार करण्यात
आले. तसेच रात्र व दिवस पाळीसाठी 4 वैद्यकीय अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली. वैद्यकीय
अधिकारी यांना पुरेशा प्रमाणात औषधसाठा उपलब्ध करुन सर्व रुग्णांची जागेवरच देखभाल
करण्याच्या सूचना दिल्या. तसेच हतरु येथे संपूर्ण गावाचे सर्वेक्षण करुन साथरोग परिस्थिती
नियंत्रणात येईपर्यंत सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या.
हतरु व चुरणी या गावात आरोग्य विभागाने पिण्याच्या पाण्याचे
शुध्दीकरण करुन एकलन कक्ष उघडण्यात आले. गावात दैनंदिन सर्वेक्षण करुण सर्वेक्षणादरम्यान आढळलेल्या रुग्णांचे व्यवस्थापन
करण्यात आले. पिण्याच्या पाण्याचे नियमित शुध्दीकरण करण्याच्या सुचना देण्यात आल्या.
तसेच अशुद्ध पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत बंद करून टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत
आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात पुरेसा औषधी साठा उपलब्ध ठेवण्यात आले. तसेच या ठिकाणी
जनजागृती करुन समुपदेशन करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश
असोले यांनी दिली.
00000
No comments:
Post a Comment