तेलबिया उत्पादकता वाढ व मुल्यसाखळी विकास योजनेंतर्गत महाडीबीटी प्रणालीवर
अर्ज करण्याचे आवाहन
अमरावती, दि. 02
(जिमाका): कृषि विभागामार्फत सन 2024-25 अंतर्गत राज्य पुरस्कृत सोयाबीन व इतर तेलबिया
उत्पादकता वाढ व मुल्यसाखळी विकास योजना राबविण्यात येत आहे. सन 2024-25 मध्ये या योजनेंतर्गत
चालू खरीप हंगामामध्ये मेटाल्डिहाईड, वॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप सोयाबिन व बॅटरी ऑपरेटेड
फवारणी पंप कापुस या निविष्ठेसाठी दि. 6 ऑगस्ट
तर कापूस वेचणी बॅगसाठी दि. 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येतील. इच्छुक शेतकऱ्यांनी
महाडीबीटी ऑनलाईन प्रणालीवर अर्ज करुन योजनेचा
लाभ घ्यावा, असे आवाहन कृषि विभागाचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी राहुल सातपुते यांनी
केल आहे.
कापुस, सोयाबिन व इतर तेलबिया आधारीत पिक
पध्दतीस चालना देवुन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या उद्येशाने राज्य पुरस्कृत
एकात्मिक कापुस व सोयाबिन आणि इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मुल्यसाखळी विकासासाठी विशेष
कृती योजना सन 2022-23 ते 2024-25 या तीन वर्षात
राबविण्यात येत आहे. या निविष्ठांचा पुरवठा करण्याकरीता लाभार्थ्यांची निवड
महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने करण्यात येणार आहे. त्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर
टाईल्स उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. औषधे व खते तसेच औजारे या टाईल्स अंतर्गत
शेतकऱ्याऱ्यांना अर्ज करता येतील. अर्ज करण्यासाठी mahadbt.maharashtra.gov.in या वेबसाईटच्या
फॉरमर लॉगीनवर जाऊन अर्ज करावेत, असे कृषि विभागामार्फत कळविण्यात आले आहे.
00000
No comments:
Post a Comment