अमरावतीच्या जिल्हा माहिती अधिकारी
पदी गजानन कोटुरवार रुजू
अमरावती,दि.30 (जिमाका):- जिल्हा माहिती कार्यालय, अमरावती येथील जिल्हा माहिती
अधिकारी या पदावर गजानन शेषराव कोटुरवार आज रुजू झाले आहेत. जिल्हा माहिती अधिकारी
या पदावर त्यांची प्रशासकीय बदली झाली असून त्यांनी आज दि. 30 ऑगस्ट 2024 रोजी माहिती अधिकारी श्रीमती अपर्णा
यावलकर यांच्याकडून जिल्हा माहिती अधिकारी या पदाचा कार्यभार स्वीकारला.
माहिती अधिकारी श्रीमती अपर्णा यावलकर, माहिती
सहायक सतिश बगमारे, वरीष्ठ लिपीक प्रतिक फुलाडी, योगेश गावंडे, छायाचित्रकार सागर राणे,
कनिष्ठ लिपीक गजानन परटके, कोमल भगत, वाहनचालक हर्षल हाडे, शिपाई राजश्री चौरपगार,
प्रतिक वानखडे आदी यावेळी उपस्थित होते.
जिल्हा माहिती अधिकारी श्री. कोटुरवार यांनी यापूर्वी
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या मुंबई व जिल्हा माहिती कार्यालय, यवतमाळ येथे
उपसंपादक पदावर तसेच विभागीय माहिती कार्यालय, अमरावती येथे सहायक संचालक तर जिल्हा
माहिती कार्यालय, बुलडाणा येथे जिल्हा माहिती अधिकारी या पदावर काम केले आहे. या कालावधीत
अनेक वैशिष्ट्यपूर्ण शासकीय उपक्रम राबवून त्यांनी योगदान दिले आहे.
00000
No comments:
Post a Comment