अमरावती
तहसिल कार्यालयात दिव्यांग बांधवांसाठी 12 ऑगस्टला नोंदणी शिबीर;
उपयुक्त
साधने व शासकीय योजनांचा मिळणार लाभ
अमरावती,
दि. 07 (जिमाका): शासनाव्दारे जिल्ह्यात
महसुल पंधरवडानिमित्त दि. 1 ते 15 ऑगस्ट दरम्यान विविध उपक्रम राबविण्यात येत आहे.
त्याअनुषंगाने दिव्यांग बांधवांना उपयुक्त साधने व शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी
सोमवार दि. 12 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11 वाजता नवीन तहसील कार्यालय, संत ज्ञानेश्वर
सांस्कृतिक सभागृह, मोशी रोड, अमरावती येथे नोंदणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे,
या शिबिराचा दिव्यांग बांधवांनी लाभ घ्यावा, असे आवाहन तहसिलदार विजय लोखंडे यांनी
केले.
महानगरपालिका, जिल्हा समाज कल्याण जिल्हा
परिषद व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिराचे आयोजन
करण्यात आले आहे. शिबिरात शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी नोंदणी करुन नोंदणी झालेल्या
व पात्र ठरलेल्या दिव्यांग लाभार्थ्यांना येणाऱ्या काही कालावधीत उपयुक्त साधने नि:शुल्क
पुरविण्यात येणार आहेत. या शिबिरात योजनांचा लाभ मिळण्यासाठी दिव्यांग बांधवांनी दिव्यांगत्वाचे
वैद्यकीय प्रमाणपत्र, युडीआयडी कार्ड, आधार
कार्ड, जन्मतारखेचा दाखला, वार्षिक 2 लाख
50 हजार पर्यंत उत्पन्नाचा दाखला, पासपोर्ट आकाराचे दोन फोटो. इत्यादो कागदपत्रे सोबत
आणावे.
0000
No comments:
Post a Comment