चांदूर रेल्वे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय
मुलांचे शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु
अमरावती, दि. 5 (जिमाका): सामाजिक न्याय
व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत चांदूररेल्वे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय
मुलांचे शासकीय वसतिगृहात सन 2024-25 साठी व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रीया
सुरु झाली आहे. प्रवेशाबाबतचे अर्ज कार्यालयात विनामुल्य उपलब्ध असून वरिष्ठ महाविद्यालयातील
प्रवेश इच्छुक विद्यार्थ्यांनी दि. 30 ऑगस्टपर्यंत अर्ज करावा, असे आवाहन वसतीगृहाचे
गृहपाल यांनी केले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे
शासकीय वसतिगृहामध्ये व्यावसायिक महाविद्यालय विभागासाठी अनूसूचित जाती प्रवर्गासाठी
7 जागा, अनुसूचित जमातीसाठी 1 जागा, विजाभज करीता 1 जागा, आर्थिक दृष्ट्या मागास वर्गाकरीता
1 जागा रिक्त आहेत. दि. 31 जुलै 2024 च्या परिपत्रकानुसार शासकीय वसतिगृहाच्या प्रवेशाकरीता
विद्यार्थ्यांकडून प्राप्त होणारे अर्ज ऑनलाईनरित्या स्वीकृत करण्यासाठी
https://hmas.mahait.org हे पोर्टल सुरू झालेले आहे. या पोर्टलव्दारे विद्यार्थ्यांना
ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत. ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत दि. 30 ऑगस्ट 2024 ही
आहे. त्यामुळे इच्छुक विद्यार्थ्यांनी या पोर्टलव्दारे विहित कालावधीमध्ये ऑनलाईन अर्ज
करावा. तसेच त्याची प्रिंटआऊट वसतिगृहात आणून द्यावी, असे आवाहन वसतिगृहाचे गृहपाल
यांनी केले आहे.
000000
No comments:
Post a Comment