अटल भुजल योजना; तालुकास्तरीय प्रशिक्षण चांदूर बाजार येथे संपन्न;
तज्ज्ञांनी
केले विविध विषयावर मार्गदर्शन
अमरावती, दि. 09 (जिमाका): अटल भूजल योजना,
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा अमरावती अंतर्गत गुरुवार दि. 8 ऑगस्ट रोजी चांदूर
बाजार तालुक्यातील तहसिल सभागृह येथे तालुकास्तरीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
यावेळी विषय तज्ज्ञांनी विविध विषयावर मार्गदर्शन केले.
प्रशिक्षणाचे प्रास्ताविक कनिष्ठ भूवैज्ञानिक हरीश
कठारे सादर करतांना अटल भूजल योजने अंतर्गत डिएलआय एक व पाच अंतर्गत केले जात असलेल्या
कामाबाबत माहिती दिली. तर एफपीओची संकल्पणा कृषी तज्ञ दिनेश खडसे यांनी सांगितली. एफपीओची
नोंदणीचे टप्पे व आवश्यक कागदपत्रे, व्यवसायाची संधी, उत्पादन, सेवा, व्यापार, संकरीत
- गट चर्चा सादरीकरण याविषयावर तालुका कृषी अधिकारी फाल्गुनी ननीर यांनी सादरीकरण केले.
नैसर्गिक शेतीची गरज व भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेत तालुक्यातील ग्रामपंचायतचा सहभाग
तसेच ग्रामपंचायत स्तरावर सुरु असलेल्या क्षमता बांधणी प्रशिक्षणाबाबत माहिती शिक्षण
व संवाद तज्ञ प्रमोद झगेकर यांनी सादरीकरण केले. गट विकास अधिकारी नारायण आमझरे यांनी
अटल भूजल योजनेतर्गत सुरु असलेल्या कामाची प्रशंसा केली. तर तहसिलदार प्रथमेश मोहोड
यांनी तालुका स्तरावर सुरु असलेल्या उपक्रमाचा आढावा घेतला व प्रशिक्षणाला शुभेच्या दिल्या. पंचायत समितीचे कृषी
विस्तार अधिकारी श्री. देशमुख एफपीओ स्थापनेतील
अडचणी याविषयावर मार्गदर्शन केले.
प्रशिक्षणाच्या सुरुवातीला पाहुण्यांच्या हस्ते
जल पूजन करण्यात आले. प्रशिक्षणाचे सूत्र संचालन
प्रमोद झगेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन नारायण फटिंग कृषी तज्ञ अश्वमेघ यांनी
केले. प्रशक्षणाला मृदा व जलसंधारण विभाग, वन विभाग , कृषी विभाग , जल संधारण, आत्मा
तसेच संलग्न विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचे सह भूजल मित्र, कृतिशील शेतकरी तसेच जिल्हा भागीदार संस्था अश्वमेध ग्रामीण पाणलोट
क्षेत्र विकास व शैक्षणिक संस्था मोर्शीचे समन्वयक, विषय तज्ञ व समूह संघटक उपस्थित
होते.
0000
No comments:
Post a Comment