सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा 2024; जिल्ह्यातील मंडळांनी
सहभागी होण्याचे आवाहन
अमरावती, दि. 13 (जिमाका): सांस्कृतिक कार्य
विभागातर्फे, सन 2024 च्या गणेशोत्सवात सहभागी होणाऱ्या राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक
गणेशोत्सव मंडळांना पुररस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. राज्यातील पहिल्या तीन विजेत्या
क्रमांकांना अनुक्रमे पाच लाख, अडीच लाख आणि एक लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार
आहे. जिल्ह्यातील सर्व मंडळांनी सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेमध्ये दि. 31 ऑगस्टपर्यंत
अर्ज सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
गणेशोत्सवास दिनांक 7 सप्टेंबर रोजी सुरुवात
होत आहे. राज्य समितीकडे जिल्हास्तरीय निवड समिती मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, ठाणे या
4 जिल्ह्यातून प्रत्येकी 3 आणि अन्य जिल्ह्यातून प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण 44 प्राप्त
शिफारशींमधून गुणांकन आणि संबंधित कागदपत्रांच्या आधारे पहिल्या तीन विजेत्या सार्वजनिक
गणेशोत्सव मंडळांची निवड केली जाणार आहे. तर उर्वरित 41 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास
राज्य शासनाकडून प्रत्येकी 25 हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात
येईल.
या
स्पर्धेत धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलिसांकडे किंवा
स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांना सहभागी
होता येईल. महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in संकेतस्थळावरील पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या
दि. 31 जुलै 2024 च्या शासन निर्णयाच्या सोबत स्पर्धा निवडीचे निकष, अर्ज उपलब्ध करून
देण्यात आले आहे. या अर्जाच्या नमुन्यानुसार स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सार्वजनिक
गणेशोत्सव मंडळांनी पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या
Mahotsav.plda@gmail.com या ईमेलवर दि. 31 ऑगस्ट, 2024 या कालावधीत अर्ज सादर करावा.
00000
No comments:
Post a Comment